निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण मातोश्री विद्यालयात संपन्न: विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्तीपर चित्रप्रदर्शनी
निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण मातोश्री विद्यालयात संपन्न: विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्तीपर चित्रप्रदर्शनी चंद्रपूर, दीपक देशपांडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्यात सर्वांगीण विकासाचा विचार दिसून येतो. म्हणून समाजव्यवस्थेने राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात करावे , असे मत गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी प्राचार्य सूर्यकांत खनके यांनी व्यक्त केले. श्रीगुरुदेव सेवाश्रम नागपूर अंतर्गत राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळ आयोजित आणि राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या सहकार्याने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण मातोश्री विद्यालयात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी श्रीगुरुदेव सेवाश्रम नागपूरचे अध्यक्ष अँड. अशोक यावले, राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाचे दिलीप सुरकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , आनंद माथने, महाराष्ट्र अंनिसचे पी.एम.जाधव, नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक संदीप कटकुरवार , पर्यवेक्षक पी.एम. रोकमवार, प्राथमि...