कर्मवीर महाविद्यालय मुल येथे क्रांती दिन साजरा -
कर्मवीर महाविद्यालय मूल येथे क्रांती दिन साजरा ---
मूल,दीपक देशपांडे.
मूल: शिक्षण प्रसारक मंडळ मूल जिल्हा चंद्रपूर द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे दिनांक ९ऑगस्ट २०२४ रोजी क्रांती दिन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.अनिता वाळके ह्या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिवीरांना आदरांजली व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.डॉ. अनिता वाळके यांनी क्रांती दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगून प्रत्येकाने राष्ट्रहितासाठी आपण काय योगदान देऊ शकतो याचे आत्मपरीक्षण करायला पाहिजे असे आवाहन केले. याप्रसंगी डॉ.उज्वला कापगते,प्रा.प्रवीण उपरे, डॉ.गणेश गायकवाड, डॉ. केवल कऱ्हाडे ,डॉ. संदीप मांडवगडे, पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर , प्रा. डोंगरवार यांनी क्रांतीदिना विषयी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. गणेश आगलावे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सिकंदर लेनगुरे यांनी केले. याप्रसंगी प्रा. अनिल शेलेकर, प्रा. नीरज चन्ने, प्रा. सागर मासीरकर, प्रा.निखिल दहिवले, प्रा. राहुल बोधे उपस्थित होते. तसेच सर्व प्राध्यापक वृंद,कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment