प्रसाद रोटकर सन्मानीत !

 प्रसाद रोटकर सन्मानीत!

दीपक  देशपांडे 

भारतीय स्वातंत्र्याचा ७७वा वर्धापनदिन म्हणजेच १५ऑगस्ट २०२४रोजी चंद्रपूर येथील प्रसाद सुधाकरराव रोटकर यांचा एलआयसी (आयुर्विमा महामंडळ) च्या मेरा देश मेरा अभिमान या  योजनेअंतर्गत सन्मान करण्यात आला.

एलआयसी ने राबविलेल्या स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल चंद्रपूर मंडळातील 99V शाखेत  कार्यरत सर्व विमा प्रतिनिधींमधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या काही निवडक विमा प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला,  विभागीय अधिकारी नमिष पशीने व आयुर्विमा व्यवस्थापक अलोक बोरकर यांच्या हस्ते एक रोपटे व सन्मानचिन्ह देऊन या विमा प्रतिनिधींना गौरविण्यात आले.

 याप्रसंगी या शाखेत कार्यरत अधिकारी व एलआयसी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक*

*✍️Ddbatmiportalm2m✍️*



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.