प्रशासकीय कारणास्तव २३ ऑगस्टचा रोजगार मेळावा पुढे ढकलला
*महत्त्वाची सूचना*
*प्रशासकीय कारणास्तव २३ ऑगस्टचा रोजगार मेळावा पुढे ढकलला*
चंद्रपूर दि. २१ :-दीपक देशपांडे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने २३ ऑगस्ट रोजी घेण्यात येणारा रोजगार मेळावा प्रशासकीय कारणास्तव तसेच बंदच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रोजगार मेळाव्याची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
*दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक*
*✍️Ddbatmi@m2M✍️*
Comments
Post a Comment