कालचक्र . असे गैरमुद्यांचे राजकारण काँग्रेसने करणे टाळायला हवे.
कालचक्र . असे गैरमुद्यांचे राजकारण काँग्रेसने करणे टाळायला हवे. दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काल तिन्ही निवडणूक आयुक्तांची संयुक्त बैठक झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने प्रसारित केलेल्या निवेदनात निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या एकमताने झाले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विशेषतः मतदार यादी पुनरीक्षण म्हणजेच एस आय आर च्या संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि उर्वरित दोन निवडणूक आयुक्तांचे मतभेद होते, तरीही ज्ञानेश कुमार यांनीच आपले मत उर्वरित दोघांवर लादले आणि हा निर्णय राबवला असा जो आरोप झाला त्यावर खुलासा झाला आहे. एस आय आर संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी उर्वरित दोन आयुक्तांचे मतभेद होते आणि ज्ञानेश कुमार यांनीच हा निर्णय लादला अशा आशयाची बातमी इंडियन एक्सप्रेस नमक राष्ट्रीय दैनिकाने तीन दिवसांपूर्वी प्रकाशित केली होती. त्यावरून देशातील विरोधी पक्षांनी चांगलाच गदारोळ केला होता. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर कारवाई केली जावी अशीही मागणी केली ...