मूल येथील प्रशासकीय भवनात ॲग्रीस्टॉक संदर्भात आढावा सभा संपन्न!
मूल येथील प्रशासकीय भवनात ॲग्रीस्टॉक संदर्भात आढावा सभा संपन्न! तहसीलदार मृदूला मोरे यांचे आवाहन. मूल :—दीपक देशपांडे. मूल तालुक्यातील ॲग्रीस्टॉक योजने संदर्भात तालुका प्रशासनाच्या वतीने आढावा सभा घेण्यात आली. या सभेला मार्गदर्शक म्हणून तहसीलदार मृदुला मोरे, नायब तहसीलदार कुंभारे हजर होते. ॲग्रीस्टाक योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतीला आधार लिंक करायचे आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती मिळणार असून सर्व शेतकऱ्यांना आग्रिस्टाक पोर्टल वर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले. मूल तालुक्यातील एक लाख २५ हजार शेतकरी नोंदणीस पात्र आहेत. परंतु ॲग्री स्टाक वर तालुक्याची नोंदणी संख्या फार अल्प प्रमाणात असल्याने तालुका प्रशासनाच्या वतीने सीएससी केंद्र संचालक तसेच ग्राम पंचायत संगणक परिचालक,आधार ऑपरेटर यांना माहिती देण्याकरिता प्रशासनाकडून माननीय तहसीलदार यांच्याकडून आढावा सभा घेण्यात आली. आढावा सभेत शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टाक वर नोंदणी विहित कालावधीत पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली. ॲग्रीस्टॅक आढ...