महसूल विभागात बदल्यांचे सत्र! विधानसभा निवडणुकपूर्व तयारी सुरू
मोठी बातमी:-महसूल विभागात बदल्यांचे सत्र! विधानसभा निवडणुकपूर्व तयारी सुरू.
मूल चे,नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी यशवंत पवार यांचेसह , उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात कार्यरत अनेक कर्मचारी बदलून जाणार?
मूल नगरपरिषद पुन्हा एकदा पोरकी होणार?
चंद्रपूर दीपक देशपांडे
येत्या काही दिवसांत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून ,या निवडणुकीची मुख्य जबाबदारी असणाऱ्या महसूल विभागात ऐन महसूल पंधरवाड्यामध्ये, महत्वाची जबाबदारी असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाल्याने,आणि एक-एक अधिकारी,कर्मचारी, यांच्या बदलीचे आदेश प्राप्त होत असून त्यांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याने महसूल पंधरवाड्याच्या आयोजित कार्यक्रमांत आता कुणालाच स्वारस्य उरले नसल्याची बाब उजागर होऊ लागली आहे.
बदली होऊ घातलेल्या अधिकारी , कर्मचाऱ्यांमध्ये ,जिल्ह्यात वा तालुक्यात तीन वर्षं पूर्ण झालेल्या अनेकानेक अधिकारी व कर्मचारी यांच्या नावाचा समावेश असल्याने आज कोणाचा नंबर लागणार आणि कोणाची कुठे बदली होणार?त्या रिक्त जागेवर कोण येणार? ह्याबाबत महसूल विभाग ,नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात हे फेरबदल संभावित असून उच्च पदाधिकारी जिल्ह्याबाहेर तर कर्मचारी जिल्ह्यातील वेगळ्या तालुक्यात बदलून गेलेले असणार आहेत.
मूल चे उपविभागीय अधिकारी, नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी यांचेसह , उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात कार्यरत अनेक कर्मचारी बदलून जाणार अशी शक्यता विश्वस्त सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
विशेष सुत्रांकडून प्राप्त सुचनेनुसार मूलचे मुख्याधिकारी व नायब तहसीलदार निवडणूक यशवंत पवार यांची बदली झाली असून ते काटोल नागपूर येथे बदलून जाणार आहेत ,हे नक्की, त्यामुळे आधिच पूर्णवेळ मुख्याधिकारी नसलेली नगरपरिषद कशीबशी नायब तहसीलदार यशवंत पवार सांभाळत होते तीचा पुन्हा कोणी वाली नसल्याने नगरपरिषद आता पुन्हा एकदा पोरकी होते की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याचाच अर्थ बहुतांश,उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयात तसेच नगरपरिषद मध्ये नवा गडी नवा राज सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येत्या आठवडाभरात हे सर्व आदेश संबंधितांना प्राप्त झाले असतील व ऑगस्ट च्या अंतिम आठवड्यात नवीन लोकांनी आपला पदभार स्वीकारला असणार आहे.त्यानंतर कधीही निवडणुकीचे बिगुल वाजणार अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment