कृषी महाविद्यालय मूल येथे अँटी रॅगिंग सप्ताहाचे आयोजन व अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा
कृषी महाविद्यालय मूल येथे अँटी रॅगिंग सप्ताहाचे आयोजन व अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा
मूल,दि. १२-०८-२०२४- दीपक देशपांडे
कृषी महाविद्यालय, मूल येथे अँटी रॅगिंग सप्ताह दिनांक १२ ते १८ ऑगस्ट, २०२४ चे औचित्य साधून दिनांक १२ ऑगस्ट, २०२४ रोजी अँटी रॅगिंग दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंग व त्याचे दुष्परिणाम या विषयी जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे यांनी भूषविले. या प्रसंगी आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थांना रॅगिंग घेण्याचे दुष्परिणाम, रॅगिंगला आळा बसवण्यासाठी असणारे नियम व कायदे या विषयी सविस्तर माहिती दिली व कोणत्याही विद्यार्थ्यांनी कोणाचीही रॅगिंग घेऊ नये असे आवाहन याप्रसंगी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक उद्यानविद्या यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम हा एक सप्ताह दिनांक १२ ते १८ ऑगस्ट, २०२४ या कालावधीत साजरा होणार असून महाविद्यालयाने दिनांक १३ ऑगस्ट या दिवशी अँटी रॅगिंग व त्याचे दुष्परिणाम या विषयावर निबंध स्पर्धा, १४ ऑगस्ट प्रश्नमंजुषा, १६ ऑगस्ट ला पोस्टर बनवणे,१७ ऑगस्ट ला लोगो डिझाइनिंग व १८ ऑगस्टला बक्षीस वितरण व कार्यक्रमाची सांगता अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. या विविध कार्यक्रमामध्ये विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे.
आज दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी महाविद्यालयामध्ये नशामुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थ विरोधी कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. अंमली पदार्थाचे सेवन विद्यार्थ्यांनी करू नये व यापासून दूर राहावे. अंमली पदार्थाचे सेवन केल्यास माणूस हा माणसासारखा राहत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत सतत सतर्क रहावे असे आवाहन याप्रसंगी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहयोगी अधिष्ठाता यांनी अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा दिली. विद्यार्थ्यांनी आपले कुटुंब, समाज, मित्र, राज्य, देश व स्वतः नशामुक्त राहील याबाबत सतत प्रयत्न करा असे आवाहन सहयोगी अधिष्ठाता यांनी केले. सदर कार्यक्रमास कृषी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी वृंद व विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. देवानंद कुसुंबे, सहायक प्राध्यापक तर आभार प्रदर्शन डॉ. गितांशु डिंकवार सहायक प्राध्यापक यांनी केले.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment