Posts

Showing posts from August, 2026

Column 🎯PAPERLESS -@विनोद देशमुख

Image
  Column 🎯PAPERLESS -@विनोद देशमुख गेल्या शनिवारी सायंकाळी नागपुरात डॉ. दंदे फाऊंडेशननं आयोजिलेल्या न्या. अभय ओक यांच्या व्याख्यानानंतर दोन जुने मित्र भेटले- आकाशवाणीचे बबन नाखले आणि विद्यापीठाचे डॉ. पूरण मेश्राम. तेव्हाचा हा संवाद... बबनराव : सोशल मीडियावर तू सतत लिहितो. पण ते कुठं छापून येतं का ? तुझा पेपर कोणता ? मी : ठरावीक पेपर नाही. कोणी मागितलं तर त्यांना देतो आणि ते छापून आल्यावर व्हायरल करतो. अन्यथा, डायरेक्ट पोस्ट. ती पाहून कोणी स्वत:च छापतात. एरवी लिखाण प्रामुख्यानं आँनलाईन, पेपरलेस चाललं आहे. मेश्राम : (मध्येच हस्तक्षेप करीत) पेपरलेस हा छान शब्द आहे. याच नावाचा पेपर काढला तर...! मी : तू काढ. नाव- "डेली पेपरलेस", संस्थापक संपादक- पूरण मेश्राम, संपादक- विनोद देशमुख. इंग्रजी नावाचा मराठी पेपर ! (आम्ही तिघंही खळखळून हसलो...) या प्रसंगातून मला सुचलं- Column Paperless नावाचा मराठी स्तंभ लिहिला तर...? त्याचा आज एक आठवड्यानंतर शुभारंभ👏📲 पवित्र शब्द फक्त धार्मिक नाही ------------------------- डॉ. दंदे फाऊंडेशनचे कर्तेधर्ते डॉ. पिनाक दंदे यांना धन्यवाद दिले पाहिजे. त्यां...

माझंही मत विदर्भ साहित्य संघ लोकाभिमुख होईल अशी घटनादुरुस्ती डॉ गिरीश गांधींनी करावी.

Image
  माझंही मत... विदर्भ साहित्य संघ लोकाभिमुख होईल अशी घटनादुरुस्ती डॉ गिरीश गांधींनी करावी. विदर्भ साहित्य संघाची घटना तपासून त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या जातील अशी घोषणा विदर्भ साहित्य संघाचे नवे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी केली आहे. डॉ गिरीश गांधी यांची ही घोषणा निश्चितच स्वागतार्ह आहे, मात्र ही घटना दुरुस्ती करताना भविष्यात कोणत्याही दुर्घटना घडणार नाहीत आणि आता तरी सर्व कारभार सुरळीत आणि  पारदर्शी पद्धतीने चालावा यासाठी घटनेत बदल केले जातील अशी साहित्य संघाच्या आजीवन सदस्यांची आणि विदर्भातील साहित्य प्रेमींची अपेक्षा आहे. अशी अपेक्षा व्यक्त होण्याचे कारण असे की १९८० पासून च्या कालखंडात विदर्भ साहित्य संघात निव्वळ एकाधिकारशाही सुरू होती, परिणामी तिथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. जसा जसा काळ पुढे जात गेला तशी तशी दहशत अधिकाधिक वाढत गेली. ज्यांनी साहित्य संघात जे काही घडत होते त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यांना तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी चक्क बाहेरचाच रस्ता दाखवला होता. परिणामी दहशत अधिकाधिक वाढत गेली होती. आता थोडी दहशत कमी झा...

दिनविशेष. आज नारळी पौर्णिमा

Image
दिनविशेष.          आज नारळी पौर्णिमा             पौर्णिमा.. शुक्ल पक्षाची ही शेवटची तिथी. पौर्णिमेस चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये १८० अंशाचे अंतर असते. भारतीय संस्कृतीत याचे धार्मिक.. सामाजिक महत्त्व अपरंपार. पूर्ण चंद्राच्या प्रकाशामुळे.. ऊर्जेमुळे मनाला शांतता प्राप्त होते. अनेक सण या तीथीला येतात.         आज तर श्रावणाचे आकर्षण अशी 'नारळी पौर्णिमा'.. आणि 'राखी पौर्णिमा' उद्या दि. २८ ला सकाळी ९.४९ मिनिटापर्यंत पौर्णिमा असल्याने सूर्योदय तीथीप्रमाणे रक्षाबंधन मुहुर्त उद्या आहे.         पौर्णिमा समाज जीवनाशी निगडित आहे. कोळी बांधवाना तर खूपच प्रतीक्षा असते ती नारळी पौर्णिमेची.         मनुष्याच्या कामाला अंत नाहीच. मग निसर्गच सक्तीची विश्रांती घ्यायला भाग पाडतो. कोळी बांधव आणि समुद्र हे अतूट नाते. मान्सूनचे आगमन होताच समुद्रावर गडगडाट करणारे ते आकाशातील काळे ढग धडकी भरवतात. विजा चमकतात.. समुद्रावर वादळे निर्माण होतात. मासेमारीसाठी हे प्रतिकूल.. असुरक्षित वातावरण असते. शिवाय ह...

आठवणींच्या हिंदोळ्यावर..१४. नागपूरच्या पत्रकारांनी घातला होता पंतप्रधानांच्या नागपूर भेटीवर बहिष्कार

Image
  आठवणींच्या हिंदोळ्यावर...१४ नागपूरच्या पत्रकारांनी घातला होता पंतप्रधानांच्या नागपूर भेटीवर बहिष्कार आज पत्रकारितेत वेगवेगळे आयाम आलेले आहेत. सुमारे ४५ वर्षांपूर्वी फक्त मुद्रित माध्यमेच होती. मात्र आता मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, डिजिटल माध्यमे, युट्युब चॅनेल्स, पोर्टल्स, समाज माध्यमे असे सर्वच माध्यम जगतात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे एकाची बातमी सुटली तरी दुसरा ती बातमी देतोच आणि आपलीच बातमी एक्सक्लुझिव्ह असावी असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.  मात्र ४५-५० वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. बातमी चुकली की सगळ्यांची ठरवून चुकायची. त्यामुळे पत्रकारांची देखील एकी होती. जर एकाने ठरवले की आज या नेत्यावर बहिष्कार टाकायचा, तर सर्वच त्याच्या सोबतीला जात असत. आज तशी परिस्थिती नाही. कारण स्पर्धा वाढली आहे. आज इथे मी सुमारे ४४ वर्षांपूर्वीचे पत्रकारांच्या एकीची आठवण इथे वाचकांना सांगणार आहे. विशेष म्हणजे त्या प्रकरणात मी देखील एक महत्त्वाची व्यक्ती ठरलो होतो. त्यामुळे ही आठवण माझ्या खास लक्षात राहिली आहे.  ही घटना डिसेंबर १९८२ ची आहे. त्या काळात विमानतळावर छायाचित्रण करण्...

कालचक्र राहुल गांधींनी तरुणाईला असे बालिश सल्ले देऊ नये..

Image
  कालचक्र  राहुल गांधींनी तरुणाईला असे बालिश सल्ले देऊ नये.. सध्या जंतर-मंतरच्या जेन झी च्या आंदोलनानंतर देशात सर्वांचीच तरुणाईशी संवाद साधण्याची धडपड सुरू आहे. त्यात राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत यांनी सुरुवातीला तरुणाईशी संवाद साधला. आता भारतीय जनता पक्षाने तर त्यासाठी टीमच तयार केली आहे. काल काँग्रेसी नेते राहुल गांधी यांनी पुण्यात तरुणींशी संवाद साधला. त्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राहुल गांधींनी पुण्यातील त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांच्या कॉलेजमधील मुलींना बोलावून त्यांच्याशी संवाद साधला असा आरोप विरोधी पक्ष भाजप करतो आहे. मात्र वृत्तवाहिन्यांवर तिथे उपस्थित मुलींचे जे बाईट्स दाखवले, त्यात कोणी मुली मराठवाड्यातून तर कोणी विदर्भातून आल्या असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे नेमके खरे काय हे हळूहळू सत्य बाहेर येईल.  अर्थात ठराविक महाविद्यालयांमधील मुलींशी जरी संवाद साधला असेल, तरी त्यातून जायचा तो संदेश जाणार आहेच. फक्त याला अधिक व्यापक स्वरूप देता आले असते तर ते उचित झाले असते. दुसरे असे की जेन झी मध्ये फक्त मुलीच आहेत असे...

पटतंय का बघा तरुणाईला विश्वासात घेऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक करणे गरजेचे...

Image
  पटतंय का बघा तरुणाईला विश्वासात घेऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक करणे गरजेचे... नीट परीक्षेतील पेपरफुट प्रकरणातून दिल्लीतील जंतर-मंतरवर चे तरुणांचे आंदोलन झाले, आणि त्यातून केंद्रातील एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, तेव्हापासून देशातील सर्वच राजकीय पक्ष तरुणाईबाबत एकदमच जागे झालेले दिसत आहेत. सर्वांनीच आता आजपर्यंत दुर्लक्षित ठेवलेल्या तरुणाईकडे लक्ष पुरवायचे ठरवलेले दिसते आहे.  त्याचाच एक भाग म्हणून सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी मुंबईत एका कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधला. त्या पाठोपाठ काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी काश्मीरमध्ये जाऊन तरुणांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर १०० तिरंगा यात्रा काढण्याचा निर्धार केला असून त्यातून ते तरुणांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेत त्याचे शासकीय स्तरावर निराकरण कसे करता येईल हा प्रयत्न करणार आहेत.  काल पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छात्रो की गुंज या कार्यक्रमात तरुणाईशी बातचीत केली. त्याचवेळी भाजपतर्फे स्थानिक मंत्री मुरलीधर मोहोळ यांन...

"सहज सुचलं म्हणून.... वंदे मातरम् ची सहाही कडवी पाठ व्हायला विशेष वेळ लागणार नाही.

Image
 "सहज सुचलं म्हणून....  वंदे मातरम् ची सहाही कडवी पाठ व्हायला विशेष वेळ लागणार नाही.  सध्या वंदे मातरमची दोन कडवी म्हणावी की सहा यावर राजकीय पक्षांचा वाद सुरू आहे. त्याच विषयावर चर्चा करताना एक पत्रकार मित्र म्हणाला "अविनाश खरोखरी सहा कडवी लोकांना पाठ होणार आहेत का?" त्यावर मी उत्तरलो "लहानपणापासून जर नियमित सहा कडवी कानावर पडली तर पाठांतर होणे अशक्य नाही. आपल्याला लहानपणी जनगणमन हे गीत कुठे येत होते? पण रोज म्हणून ते पाठ झालेच ना?" यावर माझा मित्र काहीसा बॅक फुटवर गेला होता.  खरोखरीच जर एखादे गीत, एखादे स्तोत्र, किंवा एखादा मंत्र नियमित कानावर पडत राहिला किंवा रोज म्हणत राहीलो तर पाठ होत नाही का? आता साधं उदाहरण घेऊ या. आपण शाळेत जातो. तिथे जी दररोजची प्रार्थना असते ती पहिल्या दिवशी आपल्याला नीट म्हणता देखील येत नाही. मात्र एक आठ ते पंधरा दिवसात दररोज कानावर पडल्याने आणि इतरांबरोबर म्हटल्याने ती पूर्ण पाठ होऊन जाते. मग एकट्याने सुद्धा आपण म्हणू शकतोच ना.  पाठांतराचे असेच आहे. आपण पुस्तकातले गद्य दहादा वाचले तरी बरेचदा पाठ होत नाही. मात्र तालासुरात गायलेले काना...

स्पष्ट आणि परखड. नाना पटोलेंचे रिकामटेकडे उद्योग

Image
स्पष्ट आणि परखड. नाना पटोलेंचे रिकामटेकडे उद्योग अमेरिकन सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे असा दावा काँग्रेसचे नेते आणि प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी टीव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीवर बोलताना केला आहे. त्यांच्या या विधानामुळे सहाजिकच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमेरिकन सरकारने खरोखरी असा निर्णय घेतला असेल तर आतापर्यंत सर्व वृत्तवाहिन्यांवर तो प्रसारित व्हायला हवा होता. इतकेच काय पण देशातील सर्व प्रमुख दैनिकांमध्ये ती हेडलाईन असायला हवी होती. मात्र टीव्ही नाईन वर नाना पटोले यांनी सांगितले याव्यतिरिक्त कुठेही बातमी आलेली नाही. हे बघता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाना पटोले यांना खाजगीत फोन करून ही माहिती दिली की काय अशी शंका येण्यास वाव निश्चित आहे.  दुसरे असे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अमेरिकेला किंवा त्यांच्या सरकारला आज तरी काही उपद्रव असल्याचे कोणाच्याच कानावर नाही. त्यामुळे अमेरिकन सरकार उगाचच ही नसती उठा ठेव कशाला करेल हा देखील प्रश्न येतो. तरीही भारत आपला मित्र देश आहे, त्यामुळे भारतात काही उपद्...

माझंही मत लोकसभा सदस्यांची संख्या गोठवण्याची काँग्रेसची मागणी आत्मघातकी

Image
  माझंही मत लोकसभा सदस्यांची संख्या गोठवण्याची काँग्रेसची मागणी आत्मघातकी भारताच्या लोकसभेत सध्या च्या ५४३ खासदारांच्या जागा आहेत. त्या पुढील २५ वर्षे गोठवण्यात याव्या आणि त्यात कोणतीही नवीन वाढ केली जाऊ नये असा ठराव काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला असल्याचे वृत्त आज काही वृत्तपत्रांमध्ये आले आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती आहे.  माझ्या माहितीप्रमाणे देशातील लोकसभा मतदारसंघाचे निर्धारण १९७० च्या दरम्यान कधीतरी झाले होते. त्यानंतर २००७-८च्या दरम्यान या मतदारसंघाची फेररचना झाली.मात्र त्यात वाढ कोणतीही झाली नाही. ही संख्या  ५४३ इतकीच राहिली होती.  राज्यातील लोकसभा आणि देशातील लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले जावे असा प्रस्ताव संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात समोर आला होता. वस्तुतः महिलांना लोकसभा आणि विधानसभा मध्ये ३३ टक्के आरक्षण मिळावे ही जुनीच मागणी होती. मात्र हा ठराव ज्यावेळी आला त्यावेळी समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, आणि डाव्या पक्षांनी त्याला विरोध केला होता. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये हे सर...