Posts

Showing posts from June, 2024

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत ज्यांचेवर विश्वास त्यांनीच दगाफटका केलाय.....भाग२.

Image
  चंद्रपूर   लोकसभा निवडणुकीत   ज्यांचेवर विश्वास त्यांनीच दगाफटका केलाय.....भाग २. दीपक देशपांडे  निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले गेले , आणि खऱ्या अर्थाने मतदारांचा कौल आपल्याला मिळावा यासाठी, उमेदवार,आघाडीचे कार्यकर्ते, राष्ट्रीय पातळीवरील नेते, राज्यातील महत्वाचे नेते यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. या रणधुमाळीत कुणी "आयेगा तो मोदीही" असे म्हणत बिनधास्तपणे फक्त "झलक दिखला जा"करीत आपल्याच तोऱ्यात वावरताना दिसले ,तर कुणी ,काहीही झाले तरी,"भाजपा सत्तेत येता कामा नये"या ध्येयाने प्रेरित होऊन "रात्रीचा दिवस करून" स्वयंस्फूर्तीने प्रचाराची धुरा सांभाळत होते. कुठे कुणाचा कुणाशी ताळमेळ बसत नव्हता तर कुठे ताळमेळ नसला तरीही विरोधात राजकारण पेटवायचे आणि त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपापसातील द्वेष दूर सारून आपण एकसंघ असल्याचे चित्र उभे करीत आपली भूमिका वठवीत आपला पाया तयार करायचा ही संकल्पना राबविण्यात मग्न होते. कुणी वरुन मदतीचा हात दिला नाही म्हणून सायंकाळी बार रेस्टारंटमध्ये "गम भुलानेकी कोशिश* करताना दिसलेत तर कुणी "घरात प्रवे...

*निराधारांच्या रखडलेल्या अनुदानाबाबत ना.सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र*

Image
  निराधारांच्या रखडलेल्या अनुदानाबाबत ना.सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र योजनेतील आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी घेतला पुढाकार चंद्रपूर, दि. 23 दीपक देशपांडे  संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत राज्यातील निराधार व्यक्तिंना शासनाकडून दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांचे अनुदान एप्रिल महिन्यांपासून  प्राप्त न झाल्यामुळे निराधार व्यक्तिंना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात येताच राज्याचे वने,  सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांना अनुदान तातडीने वितरित करण्यासाठी कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.   ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. निराधार व्यक्तींचे रखडलेले अनुदान लवकरात लवकर वितरीत करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना एप्रिल २०२४ ते आजतागायत संजय ...

कृषी महाविद्यालय मुल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची अठरावी बैठक संपन्न

Image
 कृषी महाविद्यालय मुल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची अठरावी बैठक संपन्न दीपक देशपांडे    कृषी  महाविद्यालय मुल द्वारा आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची अठरावी बैठक दिनांक १८ जून २०२४ रोजी श्री. नामदेव चलाख यांच्या शेतावर संपन्न झाली. याप्रसंगी कृषी महाविद्यालय, मुलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. एस. टेकाळे, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष मा. विजय गुरनुले, शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मुल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यत्वे *“ धान, सोयाबीन व भाजीपाला लागवड तंत्रज्ञान ”* या विषयावर चर्चा करण्यात आली.  या प्रसंगी सहयोगी अधिष्ठाता *डॉ. विष्णुकांत टेकाळे* यांनी शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने बघावे तसेच शेतीतील येणाऱ्या अडचणींना खचून न जाता त्याला खंबीरपणे सामोरे जाण्याची जिद्द ठेवावी असे शेतकऱ्यांना आवाहन केले. केवळ धान पिकावर अवलंबून न राहता ओवा, जिरे, सोप या पिकांची सुद्धा प्रायोगिक तत्वावर लागवड करून आपल्या उत्पादनात वाढ करावी.  *प्रा. मोहिनी पुनसे,* विषयतज्ञ कृषिविद्या, यांनी माती परीक्षण का व...

अखेर मान्सून बरसला आणि.... बळीराजा सुखावला.

Image
  अखेर मान्सून बरसला आणि... बळीराजा सुखावला. दीपक देशपांडे  २५मे रोहीणी नक्षत्र लागले ,पावसाची आणि पावसाळ्याची जाणीव झाली मात्र पाऊस आलाच नाही ,७ जून मृग नक्षत्र लागले, पावसाची आतुरतेने वाट बघत आमचा बळीराजा कामाला लागला, शेतीच्या मशागतीसाठी प्रयत्न सुरू झाले ,१५जून उलटूनही पावसाने दडी मारलेली , दरवर्षीप्रमाणे यंदाही हवामान खात्याच्या    मोसम विभागाचे अंदाज खोटे ठरवीत पावसाने दडी मारली आणि सूर्यदेव आग ओकू लागले, त्यामुळे आमच्या बळीराजाच्या डोळ्यासमोर दिवसाही काजवे चमकू लागले होते. मात्र १८जूनच्या रात्री पावसाने दस्तक दिली आणि आपल्या आगमनाची चाहूल करुन दिली,आज१९जूनला सकाळपासून खऱ्या अर्थाने आमचा बळीराजा सुखावला होता आणि  पावसाच्या आगमनाने प्रफुल्लित झाला होता लगबगीने शेतातील कामे पूर्ण करण्यासाठी धडपडत होता .बी-बीयाणे,खते यांची जुळवाजुळव  करीत होता. सकाळपासून आच्छादलेल्या आकाशात अधेमधे होणाऱ्या काळ्या ढगांची दाटी पावसाच्या आगमनाची ग्वाही देत होती आणि.... दूपारी दाटलेल्या मेघांनी गडगडाट सुरू केला आणि पावसाच्या सरी कोसळू लागल्या , आमच्या बळीराजाच्या चेहऱ्यावर ह...

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत ज्यांचेवर विश्वास त्यांनीच दगाफटका केलाय.....भाग१.

Image
  चंद्रपूर   लोकसभा निवडणुकीत  ज्यांचेवर विश्वास त्यांनीच दगाफटका केलाय.....भाग१. दीपक देशपांडे  १८व्या लोकसभा निवडणुकीत १३ चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या सहचारिणी प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपाचे उमेदवार म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात चुरशीची पण एकतर्फी लढत झाली. खरेतर  ही लढत भाजपच्या  बाजूने एकतर्फीच व्हायला हवी होती पण बाजी पलटली आणि ती इंडी आघाडीच्या  बाजूने एकतर्फीच झाली असे म्हणायला काही हरकत नसावी.,  या क्षेत्राचे माजी खासदार हंसराज अहिर ही निवडणूक लढण्यास तयार होते मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी कधी कसा दावा केला होता माहिती नाही पण त्यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तबच केले नाही तर पहिल्या यादीत त्यांचे नावाची घोषणा करुन टाकली  आणि   जिल्ह्यात विकासाचा झंझावात आणणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात कुणी टिकाव धरुच शकणार नाही ही वस्तुस्थिती दिसत होती त्यामुळे   त्यादिशेने  नाव जाहीर होताच प्रचारात आघाडी घेतली गेली तरीही...

कर्तव्य! कर्तृत्व!! आणि... सजा!!!

Image
  कर्तव्य! कर्तृत्व!! आणि... सजा!!! अंधेर नगरी चौपट राजा आणि परेशान प्रजा...आणि नेमकं... को ण   भोगतोय सजा. दीपक देशपांडे,मूल. महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील एक ऐतिहासिक शहर मूल ,या शहराची कथाच काही न्यारी आहे. महाराष्ट्र राज्याच्या दुसऱ्या मुख्यमंत्र्यांचे गाव , महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे नाते सांगणारे ..म्हणजे त्यांचे बालपण ज्या मातीशी नातं दर्शविते ते त्यांचे आजोळआणि महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची कर्मभूमी, माजी खासदार दलितमित्र वि.तू नागपूरे यांचीही कर्मभूमी , बाबा आमटेंच्या कार्याने पावन झालेली ही भूमी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पावन स्पर्शाची आजही ओळख करुन देणारे हे शहर चंद्रपूर चे विकासपुरुष अशी  ओळख निर्माण करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभा मतदारसंघातील एक महत्वपूर्ण शहर.....(नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा झटका देणारेही हेच महत्वाचे शहर)...मूल. मूल शहराचा विकास सुधीर मुनगंटीवार यांच्या मुळे झाला हे मान्यच करावे लाग...

प्रशासनाकडून युध्दपातळीवर तयारी

Image
 चंद्रपूर जिल्हाधिका-यांकडून स्ट्राँग रुमसह मतमोजणी व्यवस्थेची पाहणी एकूण मतमोजणी टेबल १०१, उपलब्ध कर्मचा-यांची संख्या ३७९ प्रशासनाकडून युध्दपातळीवर तयारी मूल, चंद्रपूर, दीपक देशपांडे   दि. ३ : निवडणूक प्रक्रियेमधील अतिशय महत्वाचा समजला जाणारा मतमोजणीचा टप्पा, येत्या मंगळवारी (४ जून) होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची युध्द पातळीवर तयारी सुरू आहे. मतमोजणीकरीता प्रशासन पूर्णपणे सज्ज असून या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी वखार महामंडळाच्या गोडावून येथील स्ट्राँग रुमसह मतमोजणी केंद्राची पाहणी केली व सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आज संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून उद्या सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ होत आहे. १३- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल २०२४ रोजी पार पडली. जवळपास दीड महिन्याच्या कालावधीनंतर येत्या ४ जून रोजी पडोली एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडावून येथे मतमोजणी होणार आहे. या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मतमोजणी केंद्राला भेट दिली. प्रत्यक्ष मत...

घ्या समजून राजे हो...झारीतील शुक्राचार्यांना चाप लावण्यासाठी पत्रकारांना....

Image
  घ्या समजून राजे हो... झारीतील शुक्राचार्यांना चाप लावण्यासाठी पत्रकारांना विधीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे,.  अविनाश पाठक नागपूर. ऑगस्ट २०१९ पासून महाराष्ट्रात राज्य शासनाची बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान निधी योजना सुरू झाली आहे. मात्र सरकारमध्ये बसलेल्या झारीतल्या शुक्राचार्यांनी लादलेल्या जाचक अटींमुळे अनेक लायक जेष्ठ पत्रकारांना या सन्मान योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. या अटी दूर करून सर्व लायक पत्रकारांना हा लाभ मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र शासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या  जाचक अटींच्या तिरडीवरूनच अनेक लायक ज्येष्ठ पत्रकारांना या योजनेचा लाभ न घेताच आपले आयुष्य संपवावे लागणार काय? अशा आशयाचा उद्विग्न सवाल ज्येष्ठ मराठी पत्रकार आणि राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी नुकताच मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित जेष्ठ पत्रकारांच्या मेळाव्यात बोलताना केला आहे .  योगेश त्रिवेदी यांचा हा सवाल खरोखरीच फक्त पत्रकारांचेच नाही, तर या राज्यातील प्रत्येक सुजाण नागरिकाचे मन उद्विग्न करणारा असाच आहे. तसे पाहिले तर आजच्या सुशिक्षित आणि स...