Posts

Showing posts from August, 2025

दिनविशेष:-अनुराधा नक्षत्री गौरी आवाहन .

Image
      दिनविशेष  :- अनुराधा नक्षत्री गौरी आवाहन           * हिरण्यवर्णां हरिणीं*         *सुवर्णरजतस्रजाम् ।*         *चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं*         *जातवेदो म आवह ॥*         *हे अग्ने (जातवेद), सोन्यासमान वर्ण असणाऱ्या, सर्व पातकांचे हरण करणाऱ्या (हरिणीसमान सुंदर,चपळ असणाऱ्या), सोन्या-चांदीच्या माळा धारण करणाऱ्या, चंद्राप्रमाणे (शीतल) असलेल्या सुवर्णमय लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर.*         *भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे 'अस्माकं भारत देशः उत्सवप्रियः अस्ति।' असे सांगितले जाते. गणेशोत्सव हा तर संपूर्ण जगाला प्रिय. देशातच नाही तर जगभरात प्रेमाने एकात्मता निर्माण करणारा.. भक्तीभावाने संपन्न होणारा हा उत्सव.*        *या उत्सवतील आजचा दिवस तर भक्तांचा आनंद व्दिगुणीत करणारा. वर्षभर भक्त वाट असते त्या गौरी.. महालक्ष्मी आज घरी येणार. शेकडो वर्षे घरोघरी परंपरेने संपन्न होणारा हा मोठा सण.*     *भक्तीचे ते ...

गुणवंतांचा सन्मान! डॉ.पल्लवी माढई ( कुलकर्णी) या आचार्य पदवीने सन्मानित..

Image
गुणवंतांचा सन्मान!   डॉ.पल्लवी माढई ( कुलकर्णी)  या आचार्य पदवीने सन्मानित.. चंद्रपूर  दीपक देशपांडे. डॉ. पल्लवी नितीन माढई (कुलकर्णी ) यांना  जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली द्वारे नुकतीच      आचार्य पदवी  प्रदान करण्यात आलेली आहे   मानव्य विज्ञान शाखेतून सामाजिक विज्ञान विषयातुन त्यांनी संशोधनासाठी निवडलेल्या  *"मानवी हक्क व सामाजिक न्याय "या विषयावर त्यांनी संशोधन कार्य केले  त्याचा उचित  सन्मान करण्यात आला आहे.  त्यांनी आपल्या यशाचे श्रेय  आपले मार्गदर्शक,  त्यांचे  पती श्री  नितीन माढई, तथा कुटुंबातील सदस्य  यांना दिले आहेत.   आचार्य पदवी प्राप्त झाल्यामुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक              9403285344      ✍️ Ddbatmi-m2M ✍️

ऊर्जानगरात चिमूर च्या ऑगष्ट क्रांती विषयावर व्याख्यान संपन्न : क्रांती विरांना श्रद्धांजली अर्पण

Image
  ऊर्जानगरात चिमूर च्या ऑगष्ट क्रांती विषयावर व्याख्यान संपन्न : क्रांती विरांना श्रद्धांजली अर्पण  चंद्रपूर (ऊर्जानगर) - दीपक देशपांडे. राष्ट्रसंतांनी " झाड झडूले शस्त्र बनेंगे,पत्थर सारे बॉम्ब बनेंगे या क्रांतिकारी भजनाने चिमुरकरांच्या मनात स्वातंत्र्याची  ज्योत पेटविली.दि. १६ ऑगस्ट १९४२ ला  चिमूर क्रांतीकारकांनी ब्रिटिश सरकारविरूध्द केलेल्या  संघर्षामुळे  चिमूर वासियांना गुलामीच्या  जोखडातून मुक्त केले होते. १९४२ च्या काळात   स्वतंत्र झालेले देशातील पहिले गाव म्हणजे चिमूर .  सन १९४२ च्या ऑगस्ट क्रांतीचे जनक  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि या  लढ्यातील  क्रांतिवीरांच्या  बलिदानाची आठवण येणाऱ्या नवीन पिढीला आठवण राहावी  या हेतूने श्रीगुरुदेव सेवा मंडळ, ऊर्जानगर चंद्रपूरच्या वतीने राष्ट्रसंत आगस्ट क्रांतीपर्व स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते तर सिटीपिएस चे उपमुख्य  अभियंता रविंद्र सोनकुसरे उद्घाटक   म्हणून लाभले होते. प्रमुख वक्ते ...

आयुष्यातले सांगाती २५ विकास सिरपुरकर

Image
  आयुष्यातले सांगाती २५   न्याय.विकास सिरपुरकर आपल्या देशातील लोकशाही व्यवस्थेत राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो. त्यानंतर मग पंतप्रधान मग उपराष्ट्रपती मग सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असा मान्यवर नागरिकांचा प्रशासनाने प्रोटोकॉल ठरवला आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे पहिल्या १० मध्येच येतात. तर अशा पहिल्या दहा मध्ये असणाऱ्या एखाद्या मान्यवर व्यक्तीने चार चौघात "हा माझा जुना जवळचा मित्र आहे" असे सांगितले तर ज्याच्याबद्दल बोलले त्याची छाती अभिमानाने निश्चितच फुलून येईल यात शंका नाही.  वाचकहो माझ्या आयुष्यात असा प्रसंग घडला तेव्हा मला भारतरत्न पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला होता, आणि माझी अशी ओळख करून देणारे मान्यवर व्यक्ति होते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर. न्या. विकास सिरपूरकर यांचा आणि माझा परिचय १९७९-८० या कालखंडातला आहे. त्यावेळी सिरपूरकर सर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एडवोकेट म्हणून प्रॅक्टिस करत होते. १९७९ च्या डिसेंबर महिन्यात माझ्या वडिलांची अकोल्याला बदली झाल्यामुळे त्यांची एक केस मुंबई उच्च न्यायालयाच्य...

दिनविशेष हर्षोल्लासी पर्व "श्री" च्या आगमनाचे"

Image
                दिनविशेष  हर्षोल्लासी पर्व   "श्री" च्या आगमनाचे"            ॐ नमोजी आद्या ।            वेद प्रतिपाद्या           जय जय स्वसंवेद्या ।         आत्मरुपा         देवा तूंचि गणेशु ।         सकलमति प्रकाशु         म्हणे निवृत्ति दासु ।         अवधारिजो जी         ...... संत ज्ञानेश्वर       'मोरया मोरया, गणपती बाप्पा, मोरया'. आज आसमंतात हा एकच जय घोष निनादणार. भाविकच नाही तर भारतीय संस्कृतीतील मंगल वाद्याचे सुरेल सूर 'श्री' चे स्वागतास सिद्ध आहेत.         चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे दूर करणाऱ्या.. तुमच्या जीवनात चैतन्य निर्माण करणाऱ्या लाडक्या बापाचे आज आगमन.. जल्लोषात आनंदोत्सवाचा प्रारंभ.         श्री गणराया भक्तगणांच्या घरात.. मंदिरे.. सार्वजनिक मडळाचे मांडवात आण...

दिनविशेष. श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व

Image
  दिनविशेष. श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणाऱ्या व्रताविषयीचे शास्त्र आणि कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन करण्याचे महत्त्व  संकलित केलेल्या या लेखात समजून घेऊया.  कुटुंबात गणेश मूर्ती कोणी बसवावी ? :श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे सिद्धीविनायक व्रत या नावाने ओळखले जाते. वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्त आहे. सर्व भाऊ एकत्र रहात असतील म्हणजेच त्यांचा ...

शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची तेहेतीसावी बैठक संपन्न

Image
  शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची तेहेतीसावी बैठक संपन्न. मूल २५: दीपक देशपांडे. कृषी महाविद्यालय, मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची तेहेतीसावी बैठक दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी बेलगटा, ता. मूल, जि. चंद्रपूर येथे संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी कृषी महाविद्यालय, मूल येथील शास्त्रज्ञांची चमू तसेच गावातील शेतकरी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  लाभला. प्रस्तुत सभा डॉ. व्ही. जी. अतकरे , सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, मूल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी सर्वप्रथम कीटकशास्त्रज्ञ  डॉ. भुषण ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धान व कापूस पिकांमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी रसशोषण करणाऱ्या किडींसाठी पिवळे चिकट सापळे, अळ्यांसाठी कामगंध व प्रकाश सापळे याबद्दल माहिती दिली. तसेच इतर किडींसाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी जैविक बुरशीजन्य कीटकनाशकांचा (वर्टिसिलियम लेकॅणी, मेटारायझियम ऍनिसोप्लाए, बेव्हेरिया बेसीआना) वापर कसा करावा हे सांगितले. यानंतर वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. गीतांशु डिंकवार यांनी कापूस, धान आणि भाजीपाला पिकांमध्ये सध्या येणाऱ...