मूल चे नवनियुक्त मुख्याधिकारी संदीप दोडे यांची औपचारिक भेट
मूल चे नवनियुक्त मुख्याधिकारी संदीप दोडे यांची औपचारिक भेट
मूल, दीपक देशपांडे
मूल नगरपरिषदेचे नवनियुक्त पूर्ण कालीन मुख्याधिकारी संदीप दोडे यांची दीपक देशपांडे यांचे नेतृत्वात ग्राहक पंचायत मूल च्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषद कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करीत पदाधिकारी यांची ओळख करून दिली व नगरातील विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी मुख्याधिकारी यांनी आपण पुन्हा निश्चितच भेटणार असून तुमच्याकडून सुद्धा आम्हाला सहकार्य मिळेल ही अपेक्षा व्यक्त करीत सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी , ग्राहक पंचायत मूल चे उपाध्यक्ष अशोक मैदमवार, सचिव , रमेश डांगरे, प्रमोद मशाखेत्री,बादल करपे,प्रणय बांगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment