शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावी.
शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावी:- जागृत ग्राहक राजा संघटना (मूल) चंद्रपूर यांचे शेतकरी बांधवांना कळकळीचे आवाहन मूल , दीपक देशपांडे महाराष्ट्र राज्य, विदर्भ प्रांत , व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना जागृत ग्राहक राजा संघटना (मूल) चंद्रपूर जिल्हा कार्यालयाच्या वतीने कळविण्यात येते की, केंद्र शासनाच्या डिजीटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत AgriStack हा प्रकल्प संपूर्ण देशामध्ये राबविणे बाबत कृषी विभागाने १४ ऑक्टोबर २०२४ ला शासन निर्णय पारित केला आहे. त्या अनुषंगाने सर्व शेतकरी जनतेला AgriStack संकल्पनेच्या शेतकरी ओळख क्रमांक (FARMER ID) निर्मिती प्रक्रियेस गतीमान करण्यासाठी शासनाच्या AgriStack सुकानु समितीने ०९ जानेवारी २०२५ रोजीच्या बैठकीमध्ये संपुर्ण राज्यात नागरी सुविधा केंद्राची मदत घेवून शेतकरी ओळख क्रमांक निर्मीतीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपले शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्याकरीता https://mhfr.agristack.gov.in या वेबसाईटवर आपण स्वतः आपले ...