भाजप मंडळ अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या जाहीर – संघटनेला नवे बळ मिळणार : आमदार किशोर जोरगेवार.
भाजप मंडळ अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या जाहीर – संघटनेला नवे बळ मिळणार : आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर,(डीडिबातमी न्युज ब्युरो) : भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरातील विविध मंडळ अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई येथे आयोजित विशेष बैठकीत या नावांवर अंतिम निर्णय घेण्यात आला. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश महामंत्री माधवी नाईक, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार किशोर जोरगेवार, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर आदींची उपस्थित होती. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी महामंडळ अध्यक्ष पदाकरिता दिलेल्या नावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांचा अनुभव, पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य यावर आधारित विचार करून या नावांना प्रदेश नेतृत्वाकडून मान्यता देण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये तुकूम मंडळासाठी स्वप्नील डुकरे, बाजार वार्ड मंडळासाठी सुभाष अदमाने, सिव्हिल लाईन मंडळासाठी र...