Posts

Showing posts from November, 2025

राम'व्यथा' ३.✍️विनोद देशमुख 'तंबाखूची धमाल, हरकरेंची कमाल

Image
राम'व्यथा' ३.✍️विनोद देशमुख ' तंबाखूची धमाल, हरकरेंची कमाल 🚩 बाबरी मशिदीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आम्ही तिघेही (म्हणजे राजाभाऊ पोफळी, जयंतराव हरकरे आणि मी) घुटमळत होतो आणि संधीची वाट पाहत होतो. तेवढ्यात माझं सहज लक्ष गेलं- डाव्या घुमटालगत मागून असलेल्या मुख्य प्रवेशद्वारावर पहारा देणारा एकमेव जवान तंबाखू चोळत बसला आहे. (तिकडचे लोक याला खैनी म्हणतात.) आमच्या तिघांमध्ये एकटा मीच तंबाखू खाणारा ! माझ्या डोक्यात कल्पना चमकली- या जवानालाच आपण भुरळ घातली तर क्षणाचाही विलंब न करता मी त्या जवानाजवळ गेलो आणि खैनी मागून त्याच्याशी गप्पा मारू लागलो. छोटा कॅमेरा पोटापाशी लपवून हरकरे वाटच पाहत होते. गप्पा रंगात येताच मी इशारा केला अन् हरकरे, राजाभाऊ आत जाऊ लागले. जवानानं हटकताच मी म्हणालो- "हमारे साथीदार है !" त्यावर "जाइए सर, पर जल्दी वापस आइए" म्हणत त्यानं ओळखपत्र पाहून, पण झडती न घेताच (हेच आम्हाला हवं होतं ना !) आम्हाला आत सोडलं. खैनी-मैत्री अशी कामी आली. आम्ही अर्धी लढाई जिंकलो होतो. आमच्या सुदैवानं रामललाच्या आरतीची (सकाळी आणि सायंकाळी) वेळ नसल्यानं मधल्या घु...

आयुष्यातले सांगाती ४१ , कवी अनिल...

Image
  आयुष्यातले सांगाती ४१ दि २९ नोव्हेंबर २०२५  कवी अनिल... आत्माराम रावजी देशपांडे  उपाख्य कवी अनिल हे महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील एक गाजलेले नाव होते.   ते फक्त कवी म्हणूनच नव्हे तर चांगले वक्ते म्हणून आणि लेखक म्हणूनही विख्यात होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थानही त्यांनी भूषविले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ते अध्यक्ष म्हणून देखील काही काळ कार्यरत होते. इतकेच नव्हे तर साहित्य अकादमीने त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविले देखील होते.  नागपूरकर असलेले कवी अनिल हे साहित्य विश्वात जरी कवी अनिल म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांच्या मित्रमंडळींमध्ये ते अप्पा या नावानेच प्रसिद्ध होते. कवी म्हणून ते कितीही मोठे असले तरी सर्वांशी स्नेहबंध जपणारे ते एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व होते. योगायोगानेच त्यांचा माझा परिचय झाला आणि त्यानंतर जवळजवळ सहा वर्ष त्यांचा माझा नियमित संपर्क राहीला. त्यामुळे आज त्यांच्याच आठवणी लिहायच्या असे ठरवले आहे. कवी अनिल आणि त्यांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे ही दोन्ही नावे अगदी शालेय जीवनापासूनच ओळखीची होती. ...

राम'व्यथा' २.✍️विनोद देशमुख 'बंदिवान' रामलला देखवेना डोळा...

Image
  राम'व्यथा' २.✍️विनोद देशमुख 'बंदिवान' रामलला  देखवेना डोळा... 🚩 आजपासून ४० वर्षांपूर्वी, १९८४ साली अयोध्येत जाऊन बाबरी मशिदीच्या मधल्या घुमटाखाली 'बंदिवासा'त असलेल्या रामललाचं (बाल विग्रह मूर्ती) दर्शन घेतलं, तेव्हा आमचे डोळे आपोआपच पाणवले😭 आमचे म्हणजे, तरुण भारतातील माझे ज्येष्ठ सहकारी (स्व.) राजाभाऊ पोफळी आणि वृत्त छायाचित्रकार (स्व.) जयंतराव हरकरे अशा तिघांचेही.  आपल्या आराध्य दैवताची ही स्थिती पाहून आम्ही अश्रू आवरू शकलो नाही. १९४९ पासून आजपर्यंत किती लाख/कोटी रामभक्तांचे अश्रू असेच वाहिले असतील, या कल्पनेनं मन शहारलं. परंतु, लगेच आम्ही स्वत:ला सावरलंही. कारण, आम्ही होतो  कर्तव्यावर ! आणि, कर्तव्य होतं- कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या बाबरी मशीद परिसराची रामललासह छायाचित्रं काढणं आणि जास्तीत जास्त माहिती गोळा करणं. हे होतं संघाचं "मिशन अयोध्या"😷 हो. संघाच्या योजनेतूनच आम्ही अयोध्येला गेलो होतो. श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रमुख तीन शिलेदारांपैकी एक (स्व.) मोरोपंत पिंगळे यांनी आम्हा तिघांवर हे मिशन सोपवलं होतं. भारतीय श्रमिक पत्रकार संघाचं (I...

शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची छत्तीसवी बैठक संपन्न

Image
  शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची छत्तीसवी बैठक संपन्न  मूल २८: दीपक देशपांडे. कृषी  महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची  छत्तीसवी बैठक दिनांक २७/०९/२०२५ गुरुवार रोजी सायंकाळी ६.०० वाजता मौजा  मरेगाव* ता. मूल जि. चंद्रपूर  येथे  महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे* यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या प्रसंगी मरेगाव येथील सरपंच ज्योत्सना पेन्दोर, जागृत ग्राहक राजा चे सदस्य व  श्री.पुंडलिक जवादे (पोलीस पाटील), इतर शेतकरी बांधव तसेच कृषि महाविद्यालय, मुल येथील डॉ. शेलेंद्र कडू (सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या) व विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने रब्बी धान लागवड आणि भातपड क्षेत्रात तेलबिया व फळझाडांची लागवड आर्थिक विकासाचा मार्ग विषयावर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी डॉ. व्ही. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय, मूल यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शेतकऱ्यांनी शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी, रब्बी हंगामात घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये शेतकऱ्य...

राम'व्यथा' १ ✍️विनोद देशमुख.

Image
  अयोध्यापती श्रीरामाच्या जन्मभूमी मंदिरावर ४९६ वर्षांपर्यंत गुदरलेल्या बिकट प्रसंगांची कर्मकहाणी सांगणारी नवीन लेखमाला- रामकथा नव्हे, राम'व्यथा'च. राम'व्यथा' १ ✍️विनोद देशमुख अयोध्येचे रामलला ४५३ वर्षे वनवासात. 🚩 परवाच्या मंगळवारी, २५ नोव्हेंबर २०२५, मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, शके १९४७, राम-जानकी विवाह तिथी या दिवशी अभिजित मुहूर्तावर अयोध्येतील नवनिर्मित राममंदिराच्या शिखरावर समारंभपूर्वक धर्मध्वजारोहण करून ४९६ वर्षांचा काळा इतिहास अंतिमत: पुसण्यात आला आणि श्रीरामाचा वनवास एकदाचा संपला ! पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या हस्ते झालेल्या या उपक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात मोदीजी गहिवरले आणि त्यांचे जोडलेले हात काही सेकंद थरथरले, हे दृश्य थेट प्रक्षेपणात साऱ्या देशाने पाहिले. तथापि, सनातन हिंदू समाजाच्या प्रत्येक गोष्टीत खुसपट काढणाऱ्या मंडळींना या सोहळ्याने पुन्हा पोटशूळ उठणे स्वाभाविक होते. या समारंभावर एक प्रतिक्रिया अशी आली- "आधी देशातील अस्तित्वात असलेल्या राम मंदिरांची दुरुस्ती करा, मग अयोध्येच्या गप्पा करा !" यातील दुरुस्तीचा स...

कर्मवीर महाविद्यालय मूल येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला –

Image
  कर्मवीर महाविद्यालय मूल येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला  मूल –दीपक देशपांडे.   कर्मवीर महाविद्यालय मूल व राष्ट्रीय सेवा योजना+2 यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके मॅडम यांनी भूषविले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.दिनेश बनकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाला प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिता वाळके मॅडम यांनी संविधान दिनाचे महत्व सांगत उद्देशपत्रिकेचे वाचन केले तसेच सर्वांना संविधानाची शपथ देत राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, समानता व बंधुता यांची जाणीव करून दिली. त्यांनी आपल्या मनोगतात संविधान रचनेची प्रक्रिया, बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, तसेच विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये आचरणात आणण्याची गरज यावर विशेष प्रकाश टाकला. शैक्षणिक संस्थांचे मूलभूत कार्य म्हणजे सज्ञान, उत्तरदायी...

फणस लागवड : शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा किरण

Image
  ग्रामीण कृषि कार्यानुभव    कार्यक्रम  (RAWE)  (रावे) विद्यार्थ्यांकडून फणस लागवड : शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा किरण. दीपक देशपांडे  कृषि महाविद्यालय, मूल येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यातील कनेरी, इंदाळा, कोटगल, गोगाव, मुरझा व पुलखल या गावांत सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम  (RAWE)     यशस्वीरीत्या राबविण्यात आला. सदर गावे महाविद्यालयापासून सुमारे ४० ते ५० किलोमीटर अंतरावर असून हा कार्यक्रम ९ जून ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील कृषि कार्यपद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव मिळवणे तसेच गावपातळीवरील कृषि गरजा व समस्यांवर कार्य करणे हा होता. हा परिसर प्रामुख्याने धान पिकावर आधारित असून हवामान बदल व पर्जन्यमानाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांसमोर विविध अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन रावे (RAWE) विद्यार्थ्यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित मार्गदर्शक शेतकऱ्यांना फणसांची रोपे वितरित क...

मूल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीला गती, २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन.

Image
  मूल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीला गती, २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन. नागरिक, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा चंद्रपूर ,डीडिबातमी वृत्तसेवा. मूल बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मूल–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग (एन.एच. ९३०) दुरुस्तीचे काम वेगाने सुरू झाले आहे आणि  येत्या २५ डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती पूर्ण होणार असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भातील कामाच्या प्रगतीबाबतची माहिती राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. केळकर यांनी, मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी आमदार श्री. मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिली. यापूर्वी आमदार मुनगंटीवार यांनी नागपूर येथे विकासपुरुष केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन महामार्ग दुरुस्तीची आग्रही मागणी केली होती. त्यानंतर तात्काळ केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले, याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कृतज्ञता व...

पोस्टवुमन ते कलेक्टर अमरावतीच्या रसिकाची उंच भरारी .

Image
  पोस्टवुमन ते कलेक्टर  अमरावतीच्या रसिकाची उंच भरारी  केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस परीक्षा म्हणजे सर्वांचा चर्चेचा विषय. आयएएस ही देशातील सर्वोच्च परीक्षा आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या परीक्षेचा दर्जा दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिला क्रमांकवर फ्रान्स सिविल सर्विसेस आहेत. या परीक्षेला दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात .पण मोजकेच उत्तीर्ण होतात आणि हजारच्या जवळपास विद्यार्थी आयएएस आयपीएस आयएफएस व तत्सम परीक्षेला पात्र ठरतात. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण फारच अल्प आहे पण तरीही या परीक्षेचे आकर्षण कालही होते आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. लेटर एंट्रीमुळे थोडा उमेदवारांमध्ये नाव उमेदीचा सूर आलेला आहे. पण तरीही या परीक्षेकडे वळणाऱ्या उमेदवारांची संख्या ही लाखांच्या घरातच आहे.  अमरावतीच्या इतिहासात नमूद करण्यासारखी गोष्ट २८ ऑक्टोबर २०२५ रोजी घडलेली आहे. २०२४ चे आयएएस चे निकाल जाहीर झाले. काही निकाल राखून ठेवण्यात आले होते. आणि ते निकाल उपरोक्त दिवशी जाहीर झाले. आणि अमरावतीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात झळकले. कारण अमरावतीच्या पोस्ट खात्या...

मूल येथे भारतीय संविधान सन्मान दिन कार्यक्रमाचे आयोजन

Image
मूल येथे भारतीय संविधान सन्मान दिन कार्यक्रमाचे आयोजन . दीपक देशपांडे        भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पूर्व तालुका अंतर्गत शहर शाखा  वॉर्ड शाखा मूल चे वतीने संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते, केंद्रीय शिक्षक शिक्षिका, बौध्दाचार्य, समता सैनिक दलाचे सैनिक, बौद्ध उपासक उपासिका सर्वांना विनंती करण्यात येते की, दिनांक २६/११/२०२५ ,, बुधवार ला सकाळी ८.०० वा. भारतीय *संविधान सन्मान दिन*  हा कार्यक्रम,  बोधिसत्व बुद्ध विहार ताडाळा रोड मूल येथे डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन व मानवंदना आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.      तरी सर्व पदाधिकारी केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य, समता सैनिक दलाचे सैनिक, बौद्ध उपासक, उपासिका सर्वांनी उपस्थित राहावे.       सर्वांनी शुभ वस्त्र परिधान करून, समता सैनिक दलाच्या सैनिकांनी सैनिकाच्या गणवेशात  वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन,भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर श...

स्वर्गीय कन्नमवार पुण्यतिथी निमित्ताने काॅंग्रेसभवनात कार्यक्रमाचे आयोजन .

Image
  स्वर्गीय कन्नमवार पुण्यतिथी निमित्ताने काॅंग्रेसभवनात कार्यक्रमाचे  आयोजन  मूल : दीपक देशपांडे. मूल शहरात बेलदार समाजाचे ४५७ घर आणि ३००० च्या वर मतदार असतांना होवु घातलेल्या मूल नगर परीषद निवडणुकीत  काँग्रेस पक्षाने एक नव्हे तीन बेलदार समाज बांधवांना उमेदवारी देवुन समाजाचा सन्मान केला ,मात्र भाजपचे वतीने एकही उमेदवार दिला नाही या बाबीचा बेलदार समाजाने गांभीर्याने विचार केला पाहीजे. असे मत बेलदार समाजाचे जिल्हा संयोजक राजेंद्र कन्नमवार यांनी व्यक्त केले.     स्थानिक काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या कर्मवीर स्व. मा.सां.कन्नमवार यांच्या पुण्यतिथी निमित्य आयोजित श्रध्दांजली कार्यक्रमात राजेंद्र कन्नमवार बोलत होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तालुका व शहर काँग्रेस पार्टीच्या वतीने स्थानिक काँग्रेस भवन येथे आज स्व. कर्मवीर कन्नमवार यांचा पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा स्थानिक काँग्रेस नेतृत्व संतोषसिंह रावत यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात बोलतांना राजेंद्र कन्नमवार यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगतांना स्व. मा.सा...

खलबत्ता:-विनोद देशमुख,अन्नदाता दु:खी भव"

Image
  खलबत्ता:-विनोद देशमुख. " अन्नदाता दु:खी भव" - -साठ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले शेतकरीविरोधी कायदे रद्द करून त्यांच्या जागी सुटसुटीत कृषी कायदे आणण्याचा चंग बांधूनच नरेन्द्र मोदी २०१४ मध्ये सत्तेवर आले.‌ शरद जोशी आणि डॉ. स्वामीनाथन यांचे पडून असलेले अहवाल नीती आयोगाला सोपवून त्यांनी नव्या कृषी कायद्यांच्या दृष्टीने आयोगाकडून शिफारशी मागवल्या. नीती आयोगानं ५ वर्षे सखोल अभ्यास करून पंतप्रधानांना अहवाल सादर केला. त्याआधारे २०२० मध्ये ३ नवे कृषी कायदे तयार झाले, संसदेत पारित झाले, राष्ट्रपतींची मान्यताही मिळाली. परंतु, पंजाब-हरयाणाचे बडे शेतकरी विरोधात उभे राहिले, त्यांनी दिल्लीच्या सीमेवर सव्वा वर्ष आंदोलन केलं, विरोधी पक्षांनी त्यांना साथ दिली, यात हिंसाचार झाला आणि शेवटी नाईलाज म्हणून मोदींनी तीनही कायदे मागे घेतले. (राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरही कायदे लागू न होण्याचा हा बहुदा पहिलाच प्रसंग असेल.) विरोधकांना हा मोदींचा पराभव वाटतो, तर सत्ताधारी मात्र संधीच्या शोधात असल्याचं सांगितलं जातं.  हे विचार डोक्यात घोळवतच पाटील गुरुजी शाळेत पोहोचले. त्यांच्याच मागे ते नेहमीचे चार...