मूल तालुक्यातील गुणवंत..... दिव्या कोरडे सेट परीक्षा उत्तीर्ण
मूल तालुक्यातील गुणवंत.....
दिव्या कोरडे सेट परीक्षा उत्तीर्ण
मूल, दीपक देशपांडे
मूल शहरातील वार्ड नंबर ०९ येथील दिव्या कोरडे ही होम सायन्स विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात दिव्याने हे यश प्राप्त केले. दिव्या हिने प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा सिंदेवाही, ८वी ते१२वी नवभारत विद्यालय मूल. पदवी बी.टेक.(फूड टेक्नॉलॉजी) अमरावती.आणि पदव्युत्तर शिक्षण ,एम.टेक.(फूड टेक्नॉलॉजी) इंद्रकुमार गुजराल युनीव्हरसिटी पंजाब. येथे पूर्ण केले असून ती सध्या बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
वडील तुळशीराम कोरडे ह्यांची पोलीस खात्यात नुकतीच उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झालेली असून ते चंद्रपूर येथे नौकरीवर कार्यरत आहेत. तसेच हीची मोठी बहीण मागील वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक्साइज उपनिरीक्षक (सबइन्स्पेक्टर) पदासाठी निवड झाली आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आई, वडीलांना आणि सहकाऱ्यांना देते.
एकाच घरातील तिघांच्या यशाबद्दल ,मूल शहरातील , सामाजिक , राजकीय शैक्षणिक संस्थांद्वारा तसेच नातेवाईक आणि मित्रमंडळी व बिआयटी बल्लारशा कॉलेज मधील विद्यार्थी व प्राध्यापक आणि व्यवस्थापन समिती नी कौतुक केले आहे.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment