फोटो चुकला : निकाल हुकला आणि रजत कलेक्टर झाला
फोटो चुकला : निकाल हुकला... आणि रजत कलेक्टर झाला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील रजत कालपरवाच्या निकालामध्ये आयएएस ही परीक्षा पास झाला आहे. धामणगाव हे तसे व्यापारी गाव. अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध गाव. हे नाव विद्यानगरी म्हणून ओळखले जाते. कारण इथली धामणगाव एज्युकेशन सोसायटी खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या बाबतीत सशक्त आहे . या संस्थेच्या आदर्श महाविद्यालयात मी मराठीचा प्राध्यापक म्हणून काम केले आहे.या गावातला रजत नावाच्या एक मुलगा गावातच शकतो आणि आयएएस होतो. खर म्हणजे तो दोन वर्षांपूर्वीच आय ए एस झाला असता .पण फोटो चुकला आणि निकाल हुकला असेच म्हणावे लागेल. पहिल्यांदा आयएएस पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तो आयएएसची मुलाखत द्यायला गेला. फॉर्म भरताना त्याने दाढीवाला फोटो फॉर्म वर लावला होता. प्रत्यक्ष मुलाखत देताना मात्र तो दाढी काढून व दाढी करून मुलाखतीला गेला होता. समितीला फोटोमध्ये आणि त्याच्यामध्ये अंतर जाणवले. आणि त्याच्या नशिबी अपयश आले. दाढीवाला फोटो व प्रत्यक्ष उमेदवार यामध्ये कमिटीला तफावत आढळली. पण प्रत्यक्षात तसे नव्हते . पण रजत खचला नव्...