भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापनदिन.
प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न
याशिवाय
बाजार चौक मूल येथे सार्वजनिक, प़ंचायत समिती मूल येथे शासकीय तर कृषी महाविद्यालय मूल येथे आणि शूरवी महिला महाविद्यालय मुल येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
दीपक देशपांडे मूल.
दिनांक १५ ऑगस्ट २०२४ भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन म्हणजेच ७७वा वर्धापनदिन मूल शहरातील प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी मान.विशालकुमार मेश्राम यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करुन संपन्न करण्यात आला.
या कार्यक्रमाला मूल शहरातील सर्व विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी , सामाजिक व राजकीय नेतेमंडळी ,आजी माजी सैनिक आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहण, मानवंदना ,आणि महसूल पंधरवाडा सांगता समारंभ व त्यानिमित्ताने महसूल कर्मचारी यांचे अभिनंदन सोहळा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
स्थानिक बाजार चौकात मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी ध्वजारोहण केले, याप्रसंगी विविध शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी ,शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचायत समिती येथे संवर्ग विकास अधिकारी राठोड यांनी ध्वजारोहण केले, याप्रसंगी कर्मचारी , नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी महाविद्यालय मूल येथे प्राचार्य डॉ विष्णुकांत टेकाळे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शूरवी महिला महाविद्यालय मुल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या हर्षा खरासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच प्रा. विक्की बोंदगुलवार यांनी (मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन. स्वातंत्र्य सैनीक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन) अशी शपथ दिली.
याशिवाय वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालये व शासकीय, निमशासकीय कार्यालये या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले. विविध सामाजिक संघटनांनी यानिमित्ताने शहरातील विविध ठिकाणी डिजेच्या तालावर वातावरण भारून टाकत खाऊवाटप केले.
नगरप्रशासनाच्या वतीने कन्नमवार सभागृह मूल येथे देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि दिवस गीत गायनाने भारुन टाकला यानिमित्ताने आजी माजी सैनिकांच्या सत्कार सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते, भारतीय स्वातंत्र्याचा हा उत्सव एका वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात प्रशासनाला यश मिळाले .
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment