Posts

Showing posts from October, 2024

निवडणूक निरीक्षक संगीता सिंग (IAS) यांचा ७२ बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तयारीचा आढावा

Image
   निवडणूक निरीक्षक  संगीता सिंग (IAS) यांचा ७२ बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील  निवडणूक तयारीचा आढावा  दीपक देशपांडे  दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी मा. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने नियुक्त निवडणूक निरीक्षक आदरणीय संगीता सिंग (IAS) यांनी ७२ बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेट देण्याच्या अनुषंगाने  निवडणूक तयारीचा आढावा घेतला. मा. निवडणूक निरीक्षक शासकीय विश्रामगृह, मूल येथे पोहोचताच त्यांचे स्वागत मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री. अजय चरडे, सहायक निवडणूक अधिकारी मृदुला मोरे आणि मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी केले. स्वागतानंतर मा. निवडणूक निरीक्षकांनी मतदारसंघातील निवडणूक तयारी, मतदारांना उपलब्ध सुविधा आणि सुरक्षाव्यवस्था याबाबत प्राथमिक माहिती घेतली. यानंतर त्यांनी मूल शहरातील नवभारत विद्यालय, बालविकास शाळा आणि नगर परिषद कार्यालय येथील मतदान केंद्रांवर भेट देऊन किमान आश्वासित सुविधा (Minimum Assured Facilities) तपासल्या आणि मतदारांसाठीच्या सुविधांचा आढावा घेतला. आवश्यकता असल्यास काही सुधारणा करण्याच्या सूचना मा....

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून संतोष रावत यांचे नामांकन पत्र दाखल.

Image
  बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून संतोष रावत यांनी नामांकन पत्र मोठा गाजावाजा करीत दाखल केले. मूल ,दीपक देशपांडे  ७२  बल्लारपूर विधानसभा मतदारक्षेत्राची निवडणूक २०नोव्हेंबर २०२४ ला होऊ घातली आहे, त्यासाठी  श्री. संतोषसिंह रावत यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून 'नामांकन अर्ज  दिनांक २९/१०/२०२४ रोजी उपविभागीय अधिकारी मूल यांचेकडे  शेवटच्या क्षणी दूपारी तीन वाजता सादर केला,  संतोष रावत हे मूल नगरपरिषद चे सदस्य, नगराध्यक्ष , मूल क‌षी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ,चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सध्याचे चं. जि. मध्य. सह. बँक चंद्रपूर चे अध्यक्ष बनण्यापूर्वी ते भाजपचे सर्वसामान्य कार्यकर्ता  ते काॅंग्रेसचे वरीष्ठ नेते  असा राजकीय प्नवास करीत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नागपूर  रोड वरील रम्य ज्योत लॉन येथे आयोजित महासभेतून  संबोधून या सभेचे रूपांतर महारॅलीत होत ढोल ताशांच्या गजरात रॅलीने प्रशासकीय भवनापर्यंत पोहोचले, तेंव्हा प्...

निवडणूक आखाडा,आम्ही लढणारच. ! महाविकास आघाडीच्या चार इच्छुक उमेदवारांनी कथन केली आपली आपबिती.

Image
  निवडणूक आखाडा,  आम्ही लढणारच ! दीपक देशपांडे  बहुजनांच्या हक्क आणि अधिकारासाठी आम्ही बल्लारपूर विधानसभा  निवडणूक लढणारच ! महाविकास आघाडीच्या चार इच्छुक उमेदवारांनी कथन केली आपली आपबिती...... डॉ अभिलाषा राकेश गावतुरे.  प्रबळ दावेदारांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद,असे म्हणत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात मागील  लोकसभा निवडणुकीपूर्वी काॅंग्रेसच्या गोटात प्रवेश घेतलेल्या राकेश गावतूरे आणि अभिलाषा  गावतूरे यांना महाविकास आघाडीने बाहेरचा रस्ता दाखवला  आणि आजवर केलेल्या पायाभरणी चार असा सन्मान  केला याबाबत नाराजीचा सूर आवळत यांनी दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. आणि... प्रकाश पाटील मारकवार  महाविकास आघाडीने नाकारले असले तरीही आजवरचे आमचे प्रयत्न तसेच जनतेचे समर्थन आणि आम्ही केलेल्या जनसंपर्काची आणि त्यातून जनतेच्या समस्या जवळून बघितल्यावर त्या जनतेच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले आहोत ,असे म्हणत प्रकाश पाटील मारकवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर..... संदीप गिऱ्...

प्रकाश पाटील अपक्ष उमेदवार!

Image
  प्रकाश पाटील अपक्ष उमेदवार! ७२, बल्लारपूर विधानसभा - प्रकाश पाटील मारकवार यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारीचा अर्ज.. दीपक देशपांडे  २०  नोव्हेबर २०२४ रोजी होऊ घातलेल्या मूल बल्लारपूर विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रकाश पाटील मारकवार (माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद- चंद्रपूर) यांनी  अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. प्रकाश पाटील मारकवार यांनी या निवडणुकीसाठी मागील लोकसभा निवडणुकीपासून आपली पायाभरणी केली होती व जनसंपर्क करीत एकेक गाव पिंजून काढत,जनमन जोडले होते ,महाविकास आघाडीकडे आपल्या आजवरच्या कारकिर्दीत केलेल्या कामाच्या मोबदल्यात उमेदवारी मागितली होती परंतू काॅंग्रेससह आघाडीने उमेदवारी नाकारली असल्याने आपण केलेल्या जनसंपर्क व जनमताचा आदर करीत हार न मानता त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून आता आघाडीचा उमेदवार ठरविताना पक्षाने केलेली चुक पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आणुन देण्यासाठी ही उमेदवारी असल्याचे जनमताचा कौल घेतला असता लक्षात आले आहे. दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक       ✍️ Ddbatmi@m2m ✍️*

आखाडा निवडणुकीचा:- आधी विरोध मग पक्षांतर/पक्षप्रवेश आणि आता परस्पर सहकार्य?

Image
  आखाडा निवडणुकीचा:- आधी  विरोध मग पक्षांतर/पक्षप्रवेश आणि आता परस्पर सहकार्य? दीपक देशपांडे  चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारण दररोज नवनवीन वळणं घेत असतांनाच चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवारांच्या भाजपच्या पक्षप्रवेशाला  कडाडून विरोध करीत थेट दिल्ली दरबारात दाखल होणाऱ्या भाजपच्या हेवी वेट नेत्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेच उपस्थितीत आमदार किशोर जोरगेवारांना भाजपमध्ये पक्षप्रवेश देण्यात आला  आणि जिल् ह्याच्या राजकारणात एक नवीन अध्याय लिहिला गेला ,हा अध्याय इथेच थांबला नाही तर काॅंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा म्हणून भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर जातीयवादी राजकारणावरुन आरोप करणाऱ्या नम्रता आचार्य ठेमस्कर यांनाही भाजपमध्ये पक्षप्रवेश देण्यात आला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होऊन त्यांना  माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार यांचेसह जिल्ह्यातीलप्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश देण्यात आला. दोन दिवसांपूर्वी घडलेला प्रकार विसरुन ...

निवडणूक आयोगाने केले आवाहन!

Image
निवडणूक आयोगाने केले आवाहन! जेष्ठ नागरिक व दिव्यांगांनी तातडीने गृह मतदानासाठी अर्ज भरुन द्या. दीपक देशपांडे  ८५ वर्ष झालेल्या जेष्ठनागरिकांना आता घरातूनच मतदान करता येणार आहे. त्यासाठी २६ ऑक्टोंबर पर्यंत योग्यता फॉर्म  भरुन  BLO ऑफिसर कडे द्यायचे आहेत . जर आपल्या ओळखीत किंवा आपल्या घरी असे जेष्ठ नागरिक असतील तर निवडणूक आयोगाने केलेल्या या सुविधेचा लाभ घ्या .  ( वेळ कमी असल्याने हा मेसेज आपले कुटुंबीय , सोसायटीमधील मेंबर आणि मित्र मंडळींना पाठवावा ही विनंती ) १००% मतदान करा आणि राष्ट्रहित जपणाऱ्या व्यक्तीस मतदान करा,असे आवाहन  आम्ही Ddbatmi@m2m द्वारे जनतेला  व मतदारांना करीत आहोत. दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक      ✍️ Ddbatmi@m2m✍️

निवडणुकीमध्ये जबाबदारीची जाणीव ठेवून काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

Image
  निवडणुकीमध्ये जबाबदारीची जाणीव ठेवून काम करा  – जिल्हाधिकारी विनय गौडा क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय पोलिस अधिका-यांचे प्रशिक्षण चंद्रपूर ,   दि.  २४ :   दीपक देशपांडे  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ही निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वांचे लक्ष आपल्यावर राहणार आहे, त्यामुळे यात कोणतीही चूक होणार नाही, याची काळजी घ्या. तुम्ही सर्वजण सक्षम आहात, मात्र अतिआत्मविश्वास बाळगू नका. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत जबाबदारीची जाणीव ठेवून काम करा, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.  प्रियदर्शनी सभागृह येथे जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित क्षेत्रीय अधिकारी तथा क्षेत्रीय पोलिस अधिका-यांच्या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी मंचावर अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, परिवेक्षाधीन जिल्हाधिकारी डॉ. अपूर्णा भासूर, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, वरोराच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम उपस्थित होते. निवडणूकआयोगाच्यामार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपण...

दुसऱ्या दिवशी शुन्य नामांकन दाखल परंतू नामांकन पत्राची उचल ४ डझनांवर!

Image
  आखाडा निवडणुकीचा:- ७२,  बल्लारपूर विधानसभा मतदार संघ दुसऱ्या दिवशी  शुन्य नामांकन दाखल परंतू नामांकन पत्राची उचल ४ डझनांवर! दीपक देशपांडे  दिनांक- २३/१०/२०२४ रोजी बल्लारपूर मतदारसंघात निवडणूक संबंधाने बरीच चहलपहल बघायला आणि ऐकायला मिळाली,काल सायंकाळी इंडी आघाडीत येथील उमेदवारी शिवसेना उबाठा गटाला मिळणार अशी चर्चा ऐकायला मिळाली आणि ती सिट शिवसेनेच्या  वाट्याला गेल्याने काॅंग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली होती . कारण ती आज सकाळी सकाळी येथील उमेदवारी  काॅंग्रेसच्या वाट्याला आल्याच्या चर्चेने शिवसेना गटात अस्वस्थता घेऊन आली तर  काॅंग्रेसच्या एका गोटात आनंद तर दुसऱ्या गोटात अस्वस्थता निर्माण करुन गेली, विविध माध्यमांतून ही बाब प्रसारीत झाल्याने काॅंग्रेसच्या वरीष्ठांशी संपर्क करणाऱ्यांनी आपापली बाजू पुढे ठेवायचा प्रयत्न केला आणि पुन्हा सायंकाळी एक नवीनच बाब पुढे आली आणि या दोन्ही गटातील अस्वस्थता शिगेला पोहोचली असून या निर्णयामुळे इंडी आघाडीतील बिघाडीच काय तो चर्चेचा विषय ठरला आहे. अशा स्थितीत राजकीय वातावरण ढवळून निघाले असून  आज एकूण वितरित अर्जाची ...

७२,बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात आज ०नामांकनपत्र दाखल!

Image
निवडणूक आखाडा:- ७२,  बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात आज ० नामांकनपत्र दाखल!  मात्र २१व्यक्तींकडून ५६अर्जांची उचल! दीपक देशपांडे  महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी आज दिनांक २२/१०/२०२४ रोजी पहिल्या दिवशी ० उमेदवारांनी शुन्य उमेदवारी अर्ज दाखल केले परिणामी ही निवडणूक  आपसुकच या निवडणुकीत अंतिम दिवसापर्यंत रंगत भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुती कडून सुधीर मुनगंटीवार यांचे नाव जाहीर झाले असून महाविकासाघाडी अजूनही तूतूमीमी चा खेळ खेळत असून या खोखो च्या खेळातील बरेच इच्छुक मुंबई - दिल्ली दरबारात आपली भूमिका पटवून देत उमेदवारी पदरी पाडून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत तर अनेक जूने नवे चेहरे आपणही एक उमेदवार बनण्यासाठी मैदानात उतरण्याची तयारी करीत आहेत. ५६ फॉर्म २१ व्यक्तींनी नेल्याची माहिती पुढे येत आहे याचाच अर्थ आमच्या म्हणण्याला खरी पुष्टी मिळते आहे आणि जसजशी शेवटची तारीख जवळ येईल तसतशी यांतील स्पर्धा वाढून नवनवे चेहरे निवडणुकीत दंड थोपटून आणि बंड करून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले बघायला मिळण्याची शक्यता आहे. दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक  ...

तालुका क्रीडा संकुलात आंतर महाविद्यालयीन विविध स्पर्धा

Image
तालुका क्रीडा संकुलात आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि बॉडीबिल्डिंग स्पर्धा मूल: दीपक देशपांडे  शिक्षण प्रसारक मंडळ मूल संचालित आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्न कर्मवीर महाविद्यालय, मूल यांच्या वतीने तालुका क्रीडा संकुलात आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि बॉडीबिल्डिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी आपली क्षमता दाखवत सहभाग नोंदवला. या क्रीडा स्पर्धांचे अध्यक्षपद माननीय वैरागडे मॅडम यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुण्या म्हणून आयोजक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके मॅडम उपस्थित होत्या. याशिवाय शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. अतुल पारखी आणि इतर मान्यवर देखील कार्यक्रमात सहभागी झाले.  या स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयातील क्रीडा गुणवंत विद्यार्थी कु.श्रुती चंद्रकांत लोणबले, करण सुरेश कोसरे, आणि आकाश प्रवीण चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला आणि त्यांच्या कामगिरीबद्दल विशेष कौतुक करण्यात आले. या स्पर्धा विविध वजनी गटांमध्ये घेण्यात आल...

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूरमध्ये 1250 घरकुल

Image
 ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूरमध्ये १२५० घरकुल शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत बल्लारपूर, मूल पोंभुर्णासाठी उद्दिष्ट्य निश्चित चंद्रपूर - दीपक देशपांडे  राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारमुळे शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत सन २०२४-२५या आर्थिक वर्षाकरीता बल्लारपूर तालुक्याकरिता १२५० घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. बल्लारपूर, मूल व पोंभुर्णा येथील शहरी भागात योजनेची अंमलबजावणी होणार आहे. बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा येथील गरीब व कष्टकऱ्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी ना. श्री. मुनगंटीवार सदैव तत्पर असतात. याची प्रचिती पुन्हा एकदा या निर्णयातून आली आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःच्या हक्काची घरे नाहीत. अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कच्च्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पूरत्या निवाऱ्यात राहतात. अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासन...

आरोप!, बातमी !,प्रेस नोट.आणि पत्रपरिषद

Image
  आरोप!, बातमी!,प्रेस नोट आणि पत्रपरिषदेतून खंडणीचा आरोप, तडीपारीची मागणी. दीपक देशपांडे  मूल पोलिसांनी एक प्रेस नोट प्रसिद्धी माध्यमांना पुरविली, व गुन्हा दाखल केला असून संबंधित आरोपी फरार असल्याचे यात नमूद केले आहे तर  सत्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न असल्याचे जाहीर करीत बातमी प्रसिद्ध करीत असल्याचा दावा मूल येथील एका पत्रकाराने केला आहे . याबाबत तक्रार कर्त्याने पत्रपरिषदेत या पत्रकाराने माझे विरोधात  एक कट रचला व खंडणीची मागणी केली व ती न केलेल्या  कृत्याबाबत ,अवास्तव व  मनघडंत व मनाला न पटणारी असल्याने याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून समाजात माझी इमेज खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे जाहीर करीत या पत्रकारावर खंडणी मागणे व बदनामी करणे यासाठी  तातडीने कठोर कारवाई करण्याची  व तडीपार  करण्याची  मागणी मूल येथील राईस मिल व्यवसायी जीवन कोंतमवार यांनी एका पत्रपरिषदेतून केली आहे. मूल पोलिसांनी पुरवलेली प्रेस नोट:- प्रेस नोट:- पोलीस स्टेशन मूल येथे दिनांक १५/१०/२४ रोजी फिर्यादी नामे जिवन भैय्याजी कोन्तमवार वय ५६ वर्ष, व्यवसाय. राईस मिल ...

निवडणूक आखाडा भाग१:-अखेर उमेदवारी कोणाला मिळणार?

Image
  निवडणूक आखाडा २०२४भाग१ अखेर उमेदवारी कोणाला मिळणार? चर्चेला उधाण! दीपक देशपांडे  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अखेर दिनांक १५/१०/२०२४रोजी दूपारी चारचे दरम्यान अधिकृत घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली,व आचारसंहिता लागू झाली. कालपर्यंत संगीत खुर्चीचा खेळ खेळणाऱ्या राजकीय पक्ष व निवडणूक पूर्व राजकीय आघाडी वा युतीतील रस्सीखेच अंतिम टप्प्यात आली आणिआता आपल्या वर्चस्वाची लढाई सुरू झाली व उमेदवारांची निवड प्रक्रिया अंतीम रुप घेऊ लागण्यापूर्वी एक शेवटचा प्रयत्न करण्याची जणू अहमहमिका सुरू झाली आहे. राजकीय नेतेमंडळी राजकीय विश्लेषक व पत्रकारांशी संवाद साधून नक्की उमेदवारी कोणाला मिळणार?याची शहानिशा करु लागले आहेत अगदी कालपर्यंत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेले आणि आमदारकीची स्व प्ने बघणारे धुरंधर नेतेही काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने युती व आघाडीचा आधार घेणारेही आता पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची वाट बघत आपली उमेदवारी मिळण्याची शक्यता चाचपडत जनसंपर्क साधत आहेत ,तर काही स्वतंत्रपणे लढण्याची भाषा वापरत दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही अन...

संतांनी जात विरहित समाजाची संकल्पना मांडली ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

Image
संतांनी जात विरहित समाजाची संकल्पना मांडली सकल कुणबी समाजाकडून ना. मुनगंटीवार यांचा हृद्य सत्कार मूल, दि.१० दीपक देशपांडे. मानवतेची शिकवण देताना आपल्या संतांनी जात पाहिली नाही. संत तुकाराम यांचे अभंग काहींनी बुडविले. ते अभंग संत जगनाडेजी महाराज यांनी बाहेर काढले. हे करताना जगनाडे महाराजांनी जातीपातीच्या विचार केला नाही. संतांनीही कधी जातीला थारा दिला नाही. अगदी त्याचप्रमाणे आपणही फक्त भारतीय आहोत एवढी एकच बाब लक्षात ठेवली पाहिजे. संतांचा हाच वारसा सकल कुणबी समाज जोपासत आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. कुणबी समाजाचा मेळावा मूल येथे पार पडला. यावेळी गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने डी.लिट. (मानद डॉक्टरेट) मिळाल्याबद्दल कुणबी समाजाच्या वतीने ना. श्री. मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजक प्रशांत बोबाटे , प्रशांत वाघरे गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष, रामपाल सिंग भाजपा महामंत्री,अमोल चुदरी माजी उपसभापती पंचायत समिती मूल,मांडवकर सर, विद्याताई  बोबाटे, भावनाताई चौखुंडे,संजय घोगरे...

कराटे अँड फिटनेस क्लब मूल ची खेळाडू प्रीती भंडारे चे सुयश

Image
  कराटे अँड फिटनेस क्लब मूल ची खेळाडू प्रीती भंडारे चे सुयश राज्यस्तरीय शालेय वूशू क्रीड़ा स्पर्धेसाठी निवड मूल: दीपक देशपांडे  क्रीड़ा व युवक सेवा संचलनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीड़ा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तरीय शालेय वूशू क्रीड़ा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.भंडारा येथील बॅडमिंटन हॉल,जिल्हा क्रीडा संकुल मध्ये पार पडलेल्या सदर स्पर्धेमध्ये नागपुर विभागतील गडचिरोली, भंडारा, गोंदिया,वर्धा,चंद्रपूर आणि नागपूर ह्या जिल्ह्याचा व नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिका चा सहभाग होता. स्पर्धेत मूल येथील नवभारत कन्या विद्यालय ची प्रीती नीलकंठ भंडारे हिने १७ वर्ष आतील वयोगटात व -४५ ह्या वजनगटात उत्तम खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकाविले व होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत आपली जागा निश्चित केली आहे ती राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या वय आणि वजनगटात नागपूर विभागाचे नेतृत्व करेल.तर माउंट कॉन्वेंट एंड ज्यू. कॉलेजऑफ़ सायंस,मूल चा विद्यार्थी नैतिक चंदू धोबे ह्याने १७ वर्ष आतील (मुले) वयोगटात द्वितीय स्थान...

शासनाला सफाई कामगार संघटनेच्या अल्टिमेटम् ,,,,,,,,,,

Image
  शासनाला सफाई कामगार संघटनेच्या अल्टिमेटम् ,,,,,,,,,, कामगार संघटनेच्या वतीने आगामी विधानसभा निवडणूक म तदानावर बहिष्कार टाकणार.... दीपक देशपांडे  प्रलंबित मागण्याची त्वरित पूर्तता करा अशी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस स्वतंत्र कामगार संघटना रजि.न.७२६२ इंडियन ट्रेड युनियन ऍक्ट १९२६ अंतर्गत कामगार संघटनेची मागणी . राज्यातील मेहतर, वाल्मिकी , डुमार , मखियार , रुखी , मादगी , डोम या रास्त मागण्या तथा राज्यातील समस्त सफाई कामगारांच्या इतर अन्य मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे या मागण्याची तातडीने पूर्तता करून न्याय देण्यात यावा अशा मागण्या कामगार संघटनेच्या वतीने चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी विनय गौड़ा साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे  दिनांक ८/१०/२०२४ करण्यात आली असून उपरोक्त रास्त मागण्याची तातडीने पूर्तता न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर सहपरिवार बहिष्कार टाकण्याचा इशारा सदरहून कामगार संघटनेने सादर केलेल्या एका लेखी निवेदनातून प्रशासनाला दिला आहे. यावेळी राज्य संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष,विजय मोगरे चंद्रपूर शाखेचे जिल्ह...

वन्यजीव सप्ताह समारोपीय कार्यक्रम..

Image
  वन्यजीव सप्ताह समारोपीय कार्यक्रम.. दीपक देशपांडे  वन्यजीव सप्ताह निमित्त आज समारोपीय कार्यक्रम पंडीत दिनदयाल उपाध्याय ईको पार्क मूल येथे संपन्न झाला. मान. विभागीय वनाधिकारी चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर श्री प्रशांत खाडे सर व मान.वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली प्रियंका वेलमे मॅडम यांचे मार्गदर्शनात १ आक्टोंबर ते ७ आक्टोंबर या सप्ताहात चिचपल्ली वनपरिक्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  आज वन्यजीव सप्ताह चा शेवट चा दिवस..त्या निमित्ताने चिचपल्ली रेंज ऑफिस मधून सर्व वनकर्मचारी यांची चिचपल्ली ते मूल अशी बाईक रॅली निघाली.. मूल येथील इको पार्क मधुन वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सर्व सदस्य यांची संयुक्त रॅली वन्यजीव वाचवण्याचा संदेश देत मूल शहरातुन काढण्यात आली..इको पार्क मूल येथे समारोपीय कार्यक्रमात क्षेत्र सहाय्यक पी.डी. खनके, क्षेत्र सहाय्यक चवरे, संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे, सचिव, मनोज रणदिवे , सर्व वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते... कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शना द्वारे करण्यात आली. दीपक देशपांडे...

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. केंद्र सरकारचा निर्णय

Image
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. केंद्र सरकारचा निर्णय. दीपक देशपांडे.  केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे  मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. 'माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके....' असं मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे. मराठी भाषेला जवळपास २००० वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचं सांगितलं जातंय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी २०१३ सालापासून प्रयत्न केले जात होते. त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली होती.  अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात  १) संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान १५००-२००० वर्षे प्राचीन असावा. २) या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे, मौल्यवान असावे.    ...

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे तीन तालुक्यांच्या १४०२० शेतकऱ्यांना दिलासा

Image
  ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे तीन तालुक्यांच्या १४०२० शेतकऱ्यांना दिलासा मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याचे १८.७६ कोटी रुपये मंजूर शेतकऱ्यांनी मानले ना. मुनगंटीवार यांचे आभार काॅंग्रेसच्या गोटात अस्वस्थता  चंद्रपूर, दि.०३- दीपक देशपांडे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती संवेदनशील असलेले राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तीन तालुक्यांमधील १४०२० शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मूल, पोंभुर्णा व बल्लारपूर तालुक्यातील या शेतकऱ्यांना पिकविम्याचे उर्वरित १८.७६ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला.*  चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ची उर्वरित रक्कम मिळण्यासाठी ना. श्री. मुनगंटीवार सातत्याने पाठपुरावा करीत होते. राज्यशासनाने अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, शेतकऱ्य...

माजी सभापती कृष्णा राऊत यांचेसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश

Image
  माजी सभापती कृष्णा राऊत यांचेसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश सावलीत भाजपला खिंडार - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश मूल सावली:-दीपक देशपांडे  राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सामाजिक बांधिलकी, सर्व समाजाला न्याय देण्याहेतू सुरु असलेले अथक प्रयत्न, सामान्यांप्रती असलेली आपुलकी, सामान्य कार्यकर्त्यांची जाण, व क्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांचा झंजावत तसेच भोई समाजाला  यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत हजारोंच्या संख्येने मिळवून दिलेले घरकुले अशा विविध कार्यामुळे प्रेरित होऊन भाजपाचे सावली पंचायत समिती माजी सभापती तथा भोई समाज नेते कृष्णा राऊत यांचे सह भाजयुमो आदिवासीं सेल तालुका अध्यक्ष रुपेश दडमल व शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र...

मूल तालुक्यातील निराधार योजनेच्या १९७प्रकरणांना मंजुरी

Image
    मूल तालुक्यातील निराधार योजनेच्या १९७प्रकरणांना मंजुरी. कुणाच्या सांगण्यावरून कुणी केले ते कृत्य? न उमगलेले कोडे. सखेद पूर्णविराम. मूल , दीपक देशपांडे  निराधार योजना समितीच्या  अध्यक्षा वंदना अगरकाटे यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय,मूल येथे   दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी दूपारी  १.०० वाजता संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ  योजना समितीच्या मासिक सभेचे   आयोजन करण्यात आले होते.  सदर सभेमध्ये  संजय गांधी निराधार योजनेची पात्र प्रकरण ७८ नामंजूर प्रकरण ० एकूण मंजूर प्रकरण ७८ , इंदिरा गांधी विधवा योजना पात्र  प्रकरण ०९ नामंजूर प्रकरण ० एकूण मंजूर प्रकरण ०९, इंदिरा गांधी अपंग योजना पात्र प्रकरण ०,  श्रावण बाळ योजना  पात्र प्रकरण ११२ मंजूर प्रकरण १०१ नामंजूर प्रकरण ११ एकूण प्रकरण ११२ , वृध्दापकाळ योजना ०९ पात्र प्रकरणं०९ नामंजूर प्रकरण ० एकूण  मंजूर प्रकरण ०९ अशी   एकुण  पात्र प्रकरण२०८, त्यापैकी मंजूर  प्रकरणे १९७ नामंजूर प्रकरणे ११. या सभेला समितीचे अध्यक्ष व इतर सदस्य यांनी उपस्थित राहून...

पालकांचा कल मराठी शाळेकडे असला पाहिजे - पालकमंत्री नाम. सुधिर मुनगंटीवार

Image
  पालकांचा कल मराठी शाळेकडे असला पाहिजे - पालकमंत्री नाम. सुधिर मुनगंटीवार  सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे पार पडला  आजी माजी विद्यार्थी व पालकांचा भव्य स्नेहमिलन सोहळा  मूल/ दीपक देशपांडे    मराठी आपली मायबोली असुन मराठी भाषेचे महत्व मोठया प्रमाणात आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत न शिकवता मराठी शाळेत शिकविणे आवश्यक आहे. माझे देखील शिक्षण चंद्रपूरच्या ज्युबली या मराठी शाळेत  झाले असुन त्याचा मला स्वार्थ अभिमान आहे. त्यामुळे पालकांचा इंग्रजी शाळेचा ओढा मराठी शाळेकडे वळला पाहिजे. मराठीची अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी पालकांचा कल मराठी शाळेकडे असला पाहिजे असे मत राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधिर भाऊ मुनगंटीवार यांनी मूल येथे विद्या प्रसारण मंडळ मूल द्वारा संचालित सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल च्या वतीने आजी माजी विद्यार्थी व पालकांचा भव्य स्नेहमिलन सोहळ्याच्या प्रसंगी पालकांना आवाहन केले.  यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नरसिंगभाऊ गणवेनवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ...