Posts

Showing posts from November, 2026

प्रकृती सांभाळण्यासाठी पत्रकारांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे - बनवारीलाल पुरोहित यांचे प्रतिपादन

Image
  पत्रकारांच्या आरोग्याकरिता नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सचा पुढाकार, डॉ. पिनाक दंदे यांच्याकडे 'आरोग्य मेंटॉर'चे दायित्व प्रकृती सांभाळण्यासाठी पत्रकारांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे - बनवारीलाल पुरोहित यांचे प्रतिपादन नागपूर, दि. १५ दीपक देशपांडे. पत्रकारांचे आयुष्य कायम धावपळीचे आणि दगदगीचे असते. सर्वच बाबतीत अनिश्चिततेला तोंड देत त्यांना काम करावे लागते. अशावेळी त्यांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेऊन योग्य ते उपचार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल आणि भारतीय विद्या भवनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष  ज्येष्ठ संपादक-पत्रकार बनवारीलाल पुरोहित यांनी केले.  नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, विदर्भ प्रांत, डॉ. दंदे फाउंडेशन आणि भानूताई गडकरी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय दंत महाविद्यालयाच्या सहकार्याने पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवाजीनगर येथील शिवाजी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ख्यातनाम उद्योजक निखिल मुंडले, नगरसेविका धनश्री देशपांडे, डॉ. दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिन...

सहज सुचलं म्हणून.... रस्ते सुरक्षा समितीने हे मुद्दे देखील लक्षात घ्यावे.

Image
सहज सुचलं म्हणून.... रस्ते सुरक्षा समितीने हे मुद्दे देखील लक्षात घ्यावे. जर डोक्यात हेल्मेट नसेल तर पेट्रोल पंपावर वाहन घेऊन आलेल्या दुचाकी चालकांना पेट्रोल देणे बंद करावे, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी दिले असल्याचे वृत्त आहे. नागपुरात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत बोलताना सप्रे यांनी माहिती दिली की देशात दरवर्षी सुमारे पाच लाख रस्ते अपघात होतात. त्यात दोन लाख लोकांना जीव गमवावा लागतो. ते थांबवायचे आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने धोरणे आखली आहेत. पण त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे असे या बातमीत म्हटले आहे.  ही बातमी वाचल्यावर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली ही समिती खरोखरीच रस्त्यावर होणाऱ्या अपघातांच्या मुळाशी गेलेलीच नाही, असे नाईलाजाने म्हणावे लागते. दुचाकीचालकाच्या डोक्यात हेल्मेट असावे. ते असले तर रस्त्यावर अपघात झाल्यास त्या दुचाकीचालकाचे डोके वाचते आणि परिणामी मृत्यूपासून तो बचावतो. मात्र अशा अपघातात काही वेळा दुचाकीचालकाचे हात पाय कंबर हे अवयव देखील दुखावू शकतात. त्यातूनह...

"एक...कहाणी"... दमलेल्या बाबाची..."

Image
"एक...कहाणी"... दमलेल्या बाबाची..." दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर एक पोस्ट वाचण्यात आली. त्यात माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात शरद पवारांच्या पॅनलच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांची राजकीय शक्ती संपत आली असल्याचे नमूद केले होते. आपल्या म्हणण्याच्या  पुष्ट्यर्थ प्रस्तुत लेखकाने विविध दाखले देखील दिले होते. बारामती मतदारसंघातील या दोन साखर कारखान्यांशिवाय नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये देखील पवारांच्या उमेदवारांना चांगलाच फटका बसला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या होत्या, त्याच मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत अजितदादा आणि त्यांच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. हे बघता पवारांचा राजकारणातला दबदबा आता संपला असा दावा प्रस्तुत लेखकाने केला होता.  प्रस्तुत दाव्यातील वास्तव एकदम नाकारता देखील येत नाही. या बाबतीत सविस्तर बोलायचे झाल्यास आपल्याला शरद पवारांच्या राजकीय वाटचालीचा मागोवा घेणे आवश्यक ठरते. ऐन तरुण वयात पुण्यात शिक्षणासाठी आलेले शरद पवार काँग्रेसच...

लोकवर्गणीतून बेंबाळ येथे दीपोत्सव महोत्सव उत्साहात; गरजू कुटुंबांचीही साजरी झाली दिवाळी!

Image
लोकवर्गणीतून बेंबाळ येथे दीपोत्सव महोत्सव उत्साहात; गरजू कुटुंबांचीही साजरी झाली दिवाळी! बेंबाळ, मूल : दीपक देशपांडे.   ग्रामपंचायत कार्यालय बेंबाळच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 'एक दिवा आपुलकीचा, एक दिवा आपल्या गावाचा' या संकल्पनेवर आधारित दीपोत्सव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळी हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, उत्साह आणि प्रकाश घेऊन येतो. मात्र गावातील कोणतेही गरजू कुटुंब दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहू नये, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लोकवर्गणी जमा करून गावातील गरजू कुटुंबांना दिवाळीचा फराळ व वस्त्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि खऱ्या अर्थाने माणुसकीचा दीप प्रज्वलित झाला. या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच चांगदेव केमेकार, ग्रामपंचायत सदस्य राकेश दहिकर, आशाताई मडावी, आशाताई शेंडे, अरुणाताई गेडाम, प्रतिभाताई भडके तसेच ग्राम पंचायत कर्मचारी तुषार वनकर, गोविंदा कोम्मावार,यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशांत उराडे, दिपक वाढई, प्रविण वाळके सर,अजित येरोजवार, माणिक भडके, प्र...

दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात पत्रकार संघाने फुलविला दिवाळीचा आनंद!

Image
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम; किराणा, शैक्षणिक साहित्य, मिठाई, दैनिक सह्याद्रीचा राखणदार दिवाळी विशेषांक व भेटवस्तूंचे वाटप मूल  : दीपक देशपांडे. दिवाळी म्हणजे आनंद,आपुलकी आणि माणुसकीचा सण! या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या संवेदनशील भावनेतून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने मूल येथे दिव्यांग बांधवांसाठी विशेष स्नेहभेट वितरण उपक्रम राबविण्यात आला. केवळ शुभेच्छा न देता प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करीत दिव्यांग बांधवांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा ठरला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे व जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांच्या सूचनेनुसार आयोजित या उपक्रमात दिव्यांग बांधवांना किराणा साहित्य, शैक्षणिक साहित्य, मिठाई, दैनिक सह्याद्रीचा राखणदारचा दिवाळी विशेषांक तसेच विविध भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. सणासुदीच्या काळात आपुलकीची विचारपूस, स्नेहाची भेट आणि मदतीचा आधार मिळाल्याने उपस्थित दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा...

माझंही मत कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नेमण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेचा विचार व्हावा.

Image
माझंही मत  कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नेमण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेचा विचार व्हावा. शासकीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी महागाई भत्ते वेतन आजीवन पेन्शन आणि इतर सेवाविषयक लाभ मिळत असतानाही त्यांच्या कामाच्या कार्यक्षमतेबाबत आणि उत्तरदायित्वाबाबत फारशी जबाबदारी निश्चित केली जात नाही. सर्वत्र लाल फितीचा आणि काळ्या फितीचाच कारभार सुरू आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे उत्तरदायित्व कुठे आहे हा प्रश्न पडतो. म्हणूनच यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील कंत्राटी पद्धतीने केली पाहिजे. तरच त्यांच्या उत्तरदायित्वाची भावना निर्माण होईल असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने थकीत महागाई भत्त्याची मागणी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना चपराक लगावली आहे. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना प्रलंबित महागाई भत्ता आणि सवलती न दिल्या प्रकरणी शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेने दाखल केलेल्या एका न्यायालयीन अवमान याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान हे मत व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या न्यायमूर्ती द्वयांनी व्यक्...

घ्या समजून राजेहो, राष्ट्रवादी काँग्रेसचे कथित विलीनीकरण: एक चिंतन...

Image
  घ्या समजून राजेहो  राष्ट्रवादी काँग्रेसचे कथित विलीनीकरण: एक चिंतन... गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये आजारी असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पार्थ पवार त्यांना दोनदा भेटायला गेले आणि दीड तास चर्चा केली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक नेते सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण ठरले आहे आणि १२फेब्रुवारीला त्याबाबत निर्णय घेऊ असे अजितदादा माझ्याशी बोलले होते असे विधान केल्यामुळे त्या चर्चांना पुन्हा एकदा जोर चढला आहे. तिथे मुळात प्रश्न असा उपस्थित होतो की खरोखरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होईल काय? आणि झाले तर ते कशाप्रकारे होईल? आणि त्यातून कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतील? याचा अशा चर्चा करणारे कोणीच विचार करताना दिसत नाही. त्यामुळे काही वेळा या चर्चा देखील वांझोट्या तर नाहीत ना, अश...

"कालचक्र" गोकुळचा गोंधळ आणि टीकाटिपणींचा सुकाळ...

Image
  "कालचक्र"  गोकुळचा गोंधळ आणि टीकाटिपणींचा सुकाळ... सध्या कोल्हापुरातील गोकुळ शेतकरी सहकारी कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून आणि त्यानंतर होणाऱ्या पदाधिकारी निवडणूक बैठकीवरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. आता आम्ही रस्त्यावरच लढाई लढणार अशी घोषणा सध्या कारखान्यात बहुमतात निवडून आलेल्या संचालकांचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे आणि रस्त्यावर संघर्ष देखील सुरू झालेला दिसतो आहे. मात्र नेमके हे का घडते आहे आणि त्यासाठी कायद्यातल्या कोणत्या तरतुदी जबाबदार आहेत याचा विचार फारसा करताना दिसत नाहीत.  गोकुळ सहकारी संस्थेवर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांचे वर्चस्व होते. त्यांचा मुलगाच इथे अध्यक्ष होता. हसन मुश्रिफ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. त्यांना गोकुळ मधली सत्ता टिकवायची होती. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील दुसरे वजनदार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची देखील मदत घेतली. सध्या भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हे द...