आठवणींच्या हिंदोळ्यावर....६. आठवण संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याची...
आठवणींच्या हिंदोळ्यावर....६. आठवण संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याची... दोन दिवसांपूर्वी युट्युबवर धुरंधर हा चित्रपट बघत होतो. त्यात १३ डिसेंबर २००१ ला देशाचे सार्वभौम सभागृह असलेल्या संसदेवर हल्ला झाला तो प्रसंग दाखवण्यात आला होता. तो प्रसंग पाहिल्यावर त्या दिवशीच्या माझ्या सर्व आठवणी एकदम जाग्या झाल्या. त्या दिवशी दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते, तसेच नागपुरात देखील महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. या अधिवेशनाचे वृत्त संकलन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे १३ डिसेंबर २००१ रोजी मी दुपारी नागपूरच्या विधान भवन परिसरातच होतो. नागपुरात साधारणपणे दुपारी बारा ते एक विधान परिषदेत प्रश्नोत्तरांचा तास असतो. तसा त्यादिवशी देखील होता. प्रश्नोत्तरांचा तास संपल्यावर मग लक्ष्यवेधी सूचना सुरू होण्यापूर्वी कागदपत्रे पटलावर ठेवणे, सदस्यांच्या काही सूचना, औचित्याचे मुद्दे हरकतीचे मुद्दे, नियम ९३ च्या सूचना असे प्रकार सुमारे १५ ते २० मिनिटे चालतात. त्या दिवशी देखील प्रश्नोत्तरांचा तास नुकताच संपला होता आणि असे कागदपत्रे पटलावर ठेवणे औचित्त्याचे मुद्दे हेच कामकाज सुरू होते. कशावरून तरी...