गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार
चंद्रपुर गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभे तर्फे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळ्याचे आयोजन
चंद्रपूर दीपक देशपांडे
शैक्षणिक वर्ष २०२३--२०२४ मध्ये गुणवंत यादीत अव्वल दर्जा प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येत आहे .
कार्यक्रम रविवार तारीख:-०१/०९/२०२४
वेळ:-दुपारी ४.०० वाजता
स्थळ:-लोकमान्य टिळक विद्यालय हाॅल, जिल्हा स्टेडीयम जवळ,चंद्रपुर.
१० वी आणि १२ वी च्या बोर्ड परिक्षेमध्ये किमान ७० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांचे तसेच इतर टेक्नीकल बोर्ड परिक्षेत आणि पदवी परिक्षेत ६० टक्के मार्क प्राप्त केलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचे गुण प्रमाणपत्राची सत्यप्रत चंद्रपुर गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभेच्या सदस्यांपर्यत दि. २८/०८/२०२४ पर्यंत पोहोचेल असे पाठवावे.
असे आवाहन अध्यक्ष श्री सुनिल पुराणकर व सचिव सचिन सांबरे यांनी केले आहे
तसेच मार्कलिस्ट खालील पत्यावर पाठवता येईल.
१]श्री साई नागरी सहकारी पतसंस्था,नागपूर रोड,अंजीकर शोरूम च्या समोर चंद्रपुर.
वेळ:-११.०० ते ५.००
२]श्री लक्ष्मीकांत मेडिकल,श्वेता हाॅस्पिटल समोर सराई वार्ड चंद्रपुर.
वेळ:- ११.०० ते ८.००
३]आरोग्यम् फार्मसी
समाधी वार्ड चंद्रपुर
वेळ:- सकाळी १०.०० ते २.००
संध्याकाळी ५.००ते १०.००,असे सचिव सचिन सांबरे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment