Posts

Showing posts from December, 2024

*घ्या समजून राजेहो...* ही टीका करण्याचा कॉंग्रेसला नैतिक अधिकार नाही....

Image
 *घ्या समजून राजेहो...* ही टीका करण्याचा कॉंग्रेसला नैतिक अधिकार नाही.... दि.३१ डिसेंबर २०२४.. ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे गेल्या आठवड्यात दुःखद निधन झाले. माजी पंतप्रधान असल्यामुळे संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे अंत्यसंस्कार दिल्लीतील निगमबोध स्मशानभूमीत करण्यात आले. यावरून आता राजकीय वाद सुरू झाले असून ते अजून तरी थांबण्याचे नाव घेत नाहीत. सर्वसाधारणपणे पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा माजी पंतप्रधान, माजी राष्ट्रपती यांचे निधन झाले तर दिल्लीत यमुना नदीच्या काठी राजघाट परिसरात अंत्यसंस्कार करण्याची प्रथा आहे. १९४८ साली स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम या परिसरात महात्मा गांधींच्या पार्थिवावर तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर १९६४ मध्ये पंडिंत नेहरूंच्या तर १९६६ मध्ये लालबहादूर शास्त्रींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आतापर्यंत इथे ज्या ज्या मान्यवरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या समाधी तेथेच बांधण्यात आलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत त्या परिसरात १८ मान्यवरांच्...

लक्षवेधी:-३.अल्पवयीन मुलांच्या हातात दूचाकी, आणि भरधाव वेगाने गाडी चालवणे, आता कुणाच्या खिशाला कात्री लावणार?.

Image
लक्षवेधी:-३. अल्पवयीन मुलांच्या हातात दूचाकी आणि भरधाव वेगाने गाडी चालवणे,आता कुणाच्या खिशाला कात्री लावणार? दीपक देशपांडे  वाहतुक नियंत्रण शाखा ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर ४४२४०१  यांचे एक पत्र शाळा/महाविद्यालयाच्या प्राचार्य यांचेसाठी आणि  पालकांसाठी ..... जाक वानिशा/अल्पवयीन विद्यार्थी / दुचाकी चालक / कारवाई / २०२४- दिनांक: २७/१२/२४ प्रति, प्राचार्य / मुख्याध्यापक ........ आपल्याला यापत्राव्दारे सुचित करण्यात येते की, आपल्या  शाळा   /  कॉलेज  मध्ये १८ वर्षाखालील अल्पवयीन विद्यार्थी हे दुचाकीवरून येतात. ही बाब आमच्या निर्दशनास आलेली आहे. अल्पवयीन (१८ वर्षाखालील मुलाला) वाहन चालविण्यास दिल्यास मोटार वाहन सुधारीत अधिनियम २०१९ कलम १९९ A अन्वये पालकांस / मोटार वाहन मालकांस तीन महिण्यापर्यंत कैद / २५,००० रू दंड इतक्या शिक्षेची तरतुद करण्यात आलेली आहे. तरी आपण आपल्या शाळा / कॉलेज मध्ये वर्ग शिक्षकांमार्फत सर्व विद्यार्थ्याना याची जाणीव करून दयावी, तसेच पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती सदरची सुचना प्रसारीत करावी. आपल्या शाळा / कॉलेज ला सुचना पत्र प्राप्त...

आशिष रैच व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या जिल्हाध्यक्ष पदावर अविरोध

Image
  आशिष रैच व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या जिल्हाध्यक्ष पदावर अविरोध लवकरच होणार जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड. दीपक देशपांडे  भारतातील सर्वात मोठी व जवळपास तेरा देशांत पसरलेली पत्रकार संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाची चंद्रपूर येथिल चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या आमसभेला जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. मराठी पत्रकार सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर ह्यांच्या प्रतीमेस व्हॉईस ऑफ मिडियाचे राज्य कार्याध्यक्ष मंगेश खाटीक, राज्य उपाध्यक्ष संजय पडोळे, विदर्भ अध्यक्ष किशोर करांजेकर, वर्धा जिल्हाध्यक्ष नरेंद्र देशमुख ह्यांच्या शुभहस्ते माल्यार्पण करून आमसभेची सुरुवात झाली. मान्यवरांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधुन त्यांना व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्याचे तसेच उद्देशांचे अवलोकन करून देण्यात आले. मावळते जिल्हाध्यक्ष तसेच राज्य उपाध्यक्ष संजय पडोळे ह्यांनी मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील पत्रकारांचे मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करताना ह्या कालावधीत जिल्ह्यात राबविलेल्या विविध उपक्रमांची ...

राष्ट्रीय सेवा योजनेच्या साप्ताहिक शिबिरात ग्राहक जागृती कार्यक्रम.

Image
  ग्राहक जागृती सप्ताह! राष्ट्रीय सेवा योजनेच्या साप्ताहिक शिबिरात ग्राहक जागृती कार्यक्रम. दीपक देशपांडे मूल  मूल तालुक्यातील चितेगाव येथे  मागील आठवड्यात कर्मवीर महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे  वार्षिक साप्ताहिक शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात दररोज दूपारी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येत होता,याच निमित्ताने ग्राहक पंचायत मूल तालुका शाखा मूलच्या वतीने ग्राहक जागृती सप्ताह पाळला जात होता , परिणामी शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे दृष्टीने ग्राहक जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.केवळ कऱ्हाडे यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी दीपक देशपांडे मूल तालुका ग्राहक पंचायत मूल हे प्रमुख अतिथी तर , अशोक मैदमवार उपाध्यक्ष, रमेश डांगरे सचिव, तुळशीराम बांगरे संघटक,मुक्तेश्वर खोब्रागडे कार्य.सदस्य आदी अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक गीत गायनाने करण्यात आली ,तर रमेश डांगरे यांनी प्रास्ताविकातून ग्राहकांची फसवणूक व फसवणू...

मराठी शाळा टिकविण्यांचे समाजासमोर आव्हान! आमदार सुधाकर अडबाले

Image
  मराठी शाळा टिकविण्यांचे समाजासमोर आव्हान! आमदार सुधाकर अडबाले मूल,दीपक देशपांडे  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला आहे.  मात्र मराठी शाळा टिकली तरच मराठी भाषा टिकणार आहे, बहुजनांच्या लेकरांना शिक्षणाची दारे उघडी ठेवायची असेल तर, मराठी शाळा टिकविण्यांचे समाजासमोर आव्हान असणार आहे असे मत आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.   आमदार अडबाले हे शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या वतीने आयोजीत नवभारत विद्यालय व नवभारत कन्या विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत स्नेहसम्मेंलनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल वैरागडे होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे चंद्रपूर जिल्हयात शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे, येथील शिक्षकांचा दर्जाही चांगला आहे, असे मतही आमदार अडबाले यांनी व्यक्त केले. चांगल्या दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यांचा आमचा प्रयत्न आहे, शालेय अध्यापनासोबतच विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाकरीता स्नेहसम्मेलनाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे अध्यक्षस्थानावरून ॲड. अनिल वैरागडे यांनी बोलतांना सा...

लक्षवेधी:-२ ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली?

Image
  लक्षवेधी:-२. ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली?  मरेगाव ग्रामसेवकांची मनमानी कुणाच्या भरवशावर? कशासाठी?  मूल, दीपक देशपांडे              मूल तालुक्यातील  मूल नागपूर मार्गावरील मरेगाव ग्रामपंचायत ही पंचायत समिती मूल अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील एक छोटी ग्रामपंचायत असून गावाची लोकसंख्या ८००-८५० आहे. या गावाचा कारभार पाहण्यासाठी ग्रामसेवक म्हणून श्री.बि.टि.बारसागडे यांची नियुक्ती केली आहे. मात्र ग्रामसेवक बारसागडे हे आपली मनमानी करीत ग्रामपंचायतीचा कारभार चालवित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे, त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत सदस्य  आणि कमेटी कोणताही निर्णय घेत असताना त्यांना कुठलाही पाठिंबा देत नाही, याउलट ते आपणच खरे आहोत असे म्हणत कमिटीने घेतलेले निर्णय  धुडकावून  लावतात तसेच मानसीक सभेचे ठराव रजीस्टर हे कार्यालयात न ठेवता घरी घेऊन जात असतात तसेच विकास  कामांचे प्रस्ताव लिहून मागीतले असता लिहून देण्यास नकार करुन आता वेळ नाही नंतर लिहून देतो असे म्हणत प्रस्ताव देण्यास विलंब करतात असा  आरोप करीत त्यांना म...

ग्राहकांनी आपल्या अधिकारांप्रती जागरुक होणे काळाची गरज:-संदीप पानमंद तहसीलदार सिंदेवाही.

Image
सिंदेवाही तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा. ग्राहकांनी आपल्या अधिकारांप्रती जागरुक होणे काळाची गरज:-संदीप पानमंद तहसीलदार सिंदेवाही. ग्राहक संरक्षण अधिनियमाची व्याप्ती आता अनुचित व्यापारी प्रथेला अंकुश लावण्यात समर्थ:-दीपक देशपांडे. सिंदेवाही,डीडिन्यूजब्यूरो. २४डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नुकताच सिंदेवाही येथील प्रशासकीय भवन सभागृहात संदीप पानमंद तहसीलदार सिंदेवाही यांचे अध्यक्षतेखाली ग्राहक पंचायत मूल तालुका अध्यक्ष दीपक देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, अशोक मैदमवार उपाध्यक्ष ,रमेश डांगरे सचिव, डॉ आनंदराव कुळे कार्य.सदस्य आणि अनिल कंठिवार कार्य.सदस्य यांचे उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सौ.कविता जावके आणि सौ.सुनिता येनुकवार यांनी ग्राहक गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात केली, अतिथींच्या स्वागताने कार्यक्रम सुरु झाला, श्री .लोखंडे, पुरवठा निरीक्षक यांनी सुत्रसंचालन केले. आपल्या प्रास्ताविकात अशोक मैदमवार यांनी ग्राहक म्हणजे काय?, ग्राहक संरक्षण कायदा आणि त्याची गरज याबाबत आपले विचार व्यक्त केले व या कार्यक्रमाचे आयोजनाची आवश्यकता स्पष्ट...

लक्षवेधी:-१.मूल तालुक्यातील अनेक गाव खेड्यात गुटखाविक्री जोमात,प्रशासन कोमात!

Image
वर्ष संपता-संपता. ... .....   लक्षवेधी:-१. मूल   तालुक्यातील अनेक गाव खेड्यात गुटखाविक्री जोमात,प्रशासन कोमात!              गुटखा विक्री बंदीचा कायदा नावालाच दिसून येत आहे काय? गुटखाबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा:-ग्राहक पंचायत मूलची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. दीपक देशपांडे. अन्न व सुरक्षा  कायदा  २००६ कलम ३ चा आधार घेत तांत्रिक मुद्दा उपस्थित करून व्यावसायिक यातून सुटका करून घेत होते. परंतु सर्व तरतुदींचा विचार केल्यानंतर खंडपीठाने  गुटखा  व्याख्येत बसणाऱ्या सर्व पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक यासाठी भादंवि कलम ३२८ लागू राहील, असे स्पष्ट केले आहे. मूल शहरां सोबत गावागावांत खुलेआम पानटपऱ्यांसह किराणा दुकानात तंबाखू व गुटख्याची विक्री होत आहे. एवढेच नव्हे तर शाळा परिसरालगत ही दुकाने खुलेआम सुरू आहेत. त्यामुळे प्रशासन धडक मोहीम राबविणार काय? असा प्रश्न आहे. ```  राज्यात २० जुलै २०१२ रोजी गुटखा बंदीचा निर्णय झाला, त्याला बारा वर्षे पूर्ण झाली आहेत ो,पण ना त्याची कडक अंमलबजावणी झाली, ना गुटखा विक्री थांबली.शहर क...

मूल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह??? पण.... मूल येथील खुनाचे गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्याचे साथीदार २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे ताब्यात

Image
  मूल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह??? पण.... मूल येथील खुनाचे गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्याचे साथीदार २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे ताब्यात मूल दीपक देशपांडे  धक्कादायक! मूल शहर कडकडित बंद,कारण, किरकोळ वाद विकोपाला गेला आणि २८ वर्षीय युवकाची हत्या. मूल शहरातील किरकोळ वादातून युवकाची चाकूने वार करीत निर्घृण हत्या केली.  शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास ऋतिक शेंडे वय २८ वर्ष याची चाकूने वार करीत निर्घृण हत्या करण्यात आली होती. ऋतिक शेंडे मूल येथील विहीरगाव परिसरात राहत असून पंचायत समिती समोरील महामार्गावर  काही युवकांनी त्याच्यावर चाकूने वार करुन त्याची हत्या केली,अशी चर्चा होती. मारेकरी गांजाच्या व्यवसायात गुंतल्याचे बोलले जात आहे,त्यांनी ऋतिक ला थांबवून वाद केला व विरोध केला असता त्याच्यावर ठिकठिकाणी चाकूने वार करण्यात आले. त्याला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अधिक तपास मूल पोलीसांनी सुरू केला होता व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सुद्धा आरोपीच्या मागावर होते. पोलीस स्टेशन मूलने गुन्हा नोंद करीत प्रक...

व्यापाऱ्यांचा ग्राहकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे तसाच आता ग्राहकांना आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज:-दीपक देशपांडे,

Image
  व्यापाऱ्यांचा ग्राहकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे तसाच आता ग्राहकांना आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज:-दीपक देशपांडे, सावली येथे राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम. सावली,डीडिन्यूजब्यूरो.   जून्या काळात  दुकानांमध्ये पाट्या  असायच्या , ग्राहक देवो भव:  आजही पाट्या  असतात पण त्या   *आपण सिसिटिव्हीच्या निगराणीत आहात* म्हणजे कुठेतरी  विश्वासार्हतेला  तडा जाऊ लागल्याचे हे  स्पष्ट संकेत असून व्यापाऱ्यांनी  आपल्या ग्राहकांकडे बघण्याचा त्यांचा   दृष्टीकोन बदलला त्या चे स्वरूप बदलले तसेच आज आपल्याला कोणतीही वस्तू खरेदी करताना आपलाही दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे आणि ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेल्या हक्कासाठी लढा देण्यासाठी सजग ग्राहक बनून डोळसपणे व्यवहार करण्याची गरज आहे, परंतू आपण नेहमीचा दुकानदार , संबंधातील व्यावसायिक ,नेहमीचा सेवा देणारा म्हणून त्यांना झुकते माप न देता व्यवहार करण्याची व आपली फसवणूक टाळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दीपक देशपांडे यांनी आपल्या प्रबोधनातून उपस्थित प्रेक्षकांना केले. तहसील कार्यालय सावली येथील प्रश...

वाघाच्या हल्यात शेतकरी? /की गुराखी गंभीर जखमी

Image
  आजची मोठी बातमी. वाघाच्या हल्यात शेतकरी ?/की... गुराखी गंभीर जखमी  मूल, दीपक देशपांडे मूल तालुक्यातील  मौजा मरेगाव येथील अल्प भूधारक शेतकरी? की गुराखी...... श्री.महात्मा जनार्धन दुधकोवर अंदाजे वय वर्ष ५३  हे नेहमी प्रमाणे आज सुध्दा आपली जनावरे चराई करिता शेतशिवारत नेले असता दबा धरुन बसलेल्या वाघाने आज दुपारी १ वाजताच्या दरम्यान त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.  सदर घटनेची माहिती गावात कळताच नागरिकांनी घटनास्थळी एकच धाव घेतली त्यांना प्रथामोपचाराकरिता ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय मूल येथे दाखल करण्यात आले असून पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.  मरेगाव येथे अशाप्रकारच्या घटना घडत असून त्या हिंसक वाघाचा  त्वरित बंदोबस्त करण्यात यावा व शेतकऱ्याला?/गुराख्याला.   आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.              ✍️Ddbatmi@m2M✍️

ग्राहक म्हणून असलेल्या हक्कांची माहिती आपल्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता:-प्रा.अशोक झाडे.

Image
  ग्राहक म्हणून असलेल्या हक्कांची माहिती आपण मिळविली आहे ती आपल्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता:-प्रा.अशोक झाडे. मूल, दीपक देशपांडे  २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन त्यानिमित्ताने  १६ ते २४डिसेंबर मूल तालुका ग्राहक पंचायत शाखा मूलच्या वतीने ग्राहक जागृती सप्ताह साजरा करण्यात आला, या सप्ताहात ग्राहक पंचायत मूल तर्फे वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना ग्राहक  हक्क व ग्राहक संरक्षण अधिनियम समजावून देत जागृती करण्यात आली. याच अनुषंगाने मूल शहरातील नवभारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयमूल येथेएका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक झाडे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्राहक पंचायत मूल चे अध्यक्ष दीपक देशपांडे, उपाध्यक्ष अशोक मैदमवार सचिव रमेश डांगरे, तालुका संघटक तुळशीराम बांगरे, मुक्तेश्वर खोब्रागडे, सहाय्यक शिक्षक गुरुदास चौधरी, विजय मेश्राम, सहाय्यक शिक्षिका वर्षा भांडारकर , निलेश माथनकर आदी मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक  करताना रमेश डांगरे यांनी...

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागृती कार्यक्रमाचे आयोजन!

Image
  राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागृती कार्यक्रमाचे सावली व सिंदेवाही येथे    आयोजन! ग्राहक राजा जागा हो! दीपक देशपांडे  चंद्रपूर जिल्ह्यातील सावली आणि सिंदेवाही येथे महसूल प्रशासन आणि ग्राहक पंचायत यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त वेगवेगळ्या दोन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला कार्यक्रम दिनांक  २७/१२/२०२४ रोज शुक्रवारी सावली येथे दूपारी १२वाजता आणि दुसरा कार्यक्रम  शुक्रवार  दिनांक २७/१२/२०२४रोजी सिंदेवाही येथे दूपारी ३ वाजता असे दोन्ही  कार्यक्रम तहसील कार्यालय सभागृहात आयोजित  करण्यात आले आहेत. या दोन्ही कार्यक्रमांना ग्राहक पंचायत(म) चे पदाधिकारी उपस्थित राहून ग्राहक संरक्षण अधिनियम व ग्राहक हक्क याबाबत मार्गदर्शन करणार आहेत,या संधीचा फायदा या दोन्ही तालुक्यातील जनतेने घ्यावा असे आवाहन ग्राहक पंचायत चे वतीने रमेश डांगरे सचिव ग्राहक पंचायत मूल यांनी आणि सावली व सिंदेवाही तालुक्यातील तहसीलदार  यांचे वतीने ता लुका पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेले आहे. दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.      ...

नगरप्रशासनाने शोधले त्या दुर्गंधीचे कारण....कार्यवाही व्हावी ही जनतेची मागणी.

Image
  नगर प्रशासनाने शोधले त्या दुर्गंधीचे कारण.... कार्यवाहीची जनतेची मागणी. दीपक देशपांडे मूल  मागील तीन दिवसांपासून मूल बसस्थानक परिसरात शिरकाव करताच एक उग्र दर्प प्रवाशांना प्रवेश करण्यापासून रोखत होता, याबाबत प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता ग्राहक पंचायत मूल शाखेकडे आलेल्या तक्रारींची दखल घेत ग्राहक पंचायत पदाधिकारी यांनी या प्रकाराबाबत मूल तालुका  प्रशासन व  मुख्याधिकारी यांना ही बाब कळविली व यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. नगरप्रशासनाने याबाबत कार्यवाही करताना प्रथमदर्शनी बसस्थानकावर असलेली सांडपाण्याची पाइपलाइन चोक झाल्याने ही दुर्गंधी पसरली असावी असा कयास बांधत ती पाइपलाइन स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला ,परत दुसऱ्या दिवशी दुर्गंधी पसरु लागल्याने अधिक चौकशी करता काही प्रमाणात तलावातील मासे मृत्यूमुखी पडत असल्याचे आढळून आले परिणामी काही किटकनाशके वापरली गेली आहेत की काय याचाही शोध घेतला गेला आणि सरतेशेवटी बसस्थानकावर असलेल्या कॅंटिन चालकांच्या भाजीपाला, उर्वरित अन्न तलावात  फेकल्या मुळे  व भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरलेले वाशिंग पावडर व तेल या...

कर्मवीर महाविद्यालय मूल च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिराचा समारोप समारोह मौजा चितेगांव येथे संपन्न “

Image
  कर्मवीर महाविद्यालय मूल च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिराचा समारोप समारोह मौजा चितेगांव येथे संपन्न   दीपक देशपांडे मूल  गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित व शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मूल अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष वार्षिक शिबिर दिनांक १८/१२/२०२४  ते २४/१२/२०२४ पर्यंत मौजा चितेगांव येथे “Youth for my Bharat and Youth for digital literacy ” या संकल्पनेवर आधारित सात दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  शिबिराचा समारोप सोहळा दिनांक २४/१२/२०२४ ला सौ. शुभांगीताई वैरागडे माजी मुख्याध्यापक नवभारत कन्या विद्यालय मूल यांच्या अध्यक्षतेखाली  व कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्य व रासेयो विभागाच्या संयोजक  डॉ.अनिता वाळके, सौ.कोमल रंदये सरपंच चितेगांव, श्री. बट्टे सर मुख्याध्यापक ऊ.प्रा.शाळा,चितेगांव, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप मांडवगडे, डॉ. केवळ कऱ्हाडे व प्रा. कमलेश नागोसे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.  सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयोजक...

ग्राहक म्हणून आपल्या हक्कांप्रती जागरुक होत नाही तोपर्यंत फसवणूक होतच राहणार:-दीपक देशपांडे.

Image
  ग्राहक म्हणून आपल्या हक्कांप्रती जागरुक होत नाही तोपर्यंत फसवणूक होतच राहणार:-दीपक देशपांडे. मूल तालुक्यातील राजगड येथे ग्राहक जागृती सप्ताहाची सांगता. मूल ,डीडिन्यूजब्यूरो. ग्राहक हा राजा असला तरी तो आज नावापुरताच राजा असून पावलोपावली त्यांचे शोषण होत आहे कारण एकतर तो संघटीत नाही आणि त्याला आपल्या अधिकारांची जाणीव नाही, त्यामुळे जे पुढे दिसते ते सत्य मानून तो आपल्या गरजा भागवतांना आपली फसवणूक होत आहे याची त्याला कल्पना नसते आणि फसवणूक झाल्यानंतर नेमकं काय करायचं ह्याचा तो शोध घेतांना त्याला योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने तो खचून जातो व मोठे आर्थिक नुकसान करुन बसतो , त्यामुळे ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेल्या हक्कासाठी जागृती निर्माण करण्यासाठी आम्ही अशा कार्यक्रमांचे आयोजन करुन ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत, यासाठी शासनाने कायदे केले आहे फक्त त्याची माहिती आपल्याला नाही आणि म्हणूनच आपली फसगत होते आहे असे स्पष्ट करीत छोट्या छोट्या उदाहरणातून पटवून देण्याचा प्रयत्न दीपक देशपांडे, अध्यक्ष ग्राहक पंचायत मूल यांनी आपल्या प्रबोधनातून...

सेवा म्हणून शाळा चालवणे व्रतच : डॉ. मोहनजी भागवत

Image
  सेवा म्हणून शाळा चालवणे व्रतच : डॉ. मोहनजी भागवत -सन्मित्र सैनिकी शाळेचा वार्षिकोत्सव उत्साहात           चंद्रपूर, दीपक देशपांडे  सेवा म्हणून शाळा चालवणे सोपे काम राहिले नाही. शिक्षण व आरोग्य या दोन्ही गोष्टी आता महाग झाल्या आहेत. त्यातही काही जण पैसा कमवण्यासाठी शाळा चालवतात. सेवा म्हणून शाळा चालवणे हे व्रत आहे. व्रत हे नेटाने आणि तेवढ्याच निष्ठेने चालवावे लागते. सन्मित्र सैनिकी शाळा तसा प्रयत्न करीत आहे ही आनंदाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.   बुधवार, २५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी येथील सन्मित्र सैनिकी शाळेच्या ३० व्या वार्षिकोत्सवा- प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. परमानंद अंदनकर, सचिव अ‍ॅड. निलेश चोरे, शाळेच्या प्राचार्य अरुंधती कावडकर, कमांडंट सुरेंद्रकुमार राणा व्यासपीठावर उपस्थित होते.  डॉ. भागवत पुढे म्हणाले, सेवा म्हणून शाळा चालवणे ही केवळ शाळा व्यवस्थापनाचीच जबाबदारी नाही, तर ती समाजाचीही आहे. पोट भरण्यासाठी शिक्षण ह...

*ब्रेकिंग न्यूज* बिबट्याच्या पिल्लाला जीवन दान ?

Image
*ब्रेकिंग न्यूज* बिबट्याच्या पिल्लाला जीवन दान ? दीपक देशपांडे    दिनांक २४/१२/२०२४ ला सावली वनपरिक्षेत्रातील कवठी या गावातील शेतकरी अनिल घोटेकर यांचे शेतात कापूस वेचणा-या महिला मजुरांना एक बिबट चे पिल्लु आढळले. ही माहिती सावली चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री व्ही. सी. धुर्वे यांना देण्यात आली,ही माहिती मिळताच वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पहाणी केली असता एक वीस ते पंचवीस दिवसाचे बिबट्याचे पिल्लु आढळले..त्या पिल्ल्याची आई त्याला रात्री सोबत घेऊन जाणार या हेतूने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी त्या पिल्ल्याला तिथेच ठेवण्याचा संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांसोबत चर्चा करुन सकाळ पर्यंत प्रतिक्षा करण्याचा निर्णय घेतला ,त्या ठिकाणी चार कॅमेरे पण लावण्यात आले. परंतु आज सकाळी वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांनी पहाणी केली असता ते पिल्लु त्याच ठिकाणी होते व थोडे कमजोर ही वाटत होते.ही माहिती विभागीय वनाधिकारी, चंद्रपूर श्री. प्रशांत खाडे , सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) श्री व्ही.एस.तरसे यांना देण्यात आली व यांचे मार्गदर्शनात व डॉक्टर कुं...

ग्राहक संरक्षण अधिनियमात समाविष्ट हक्काची माहिती मिळवून आपली फसवणूक टाळता येऊ शकते:- मूलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे.

Image
  ग्राहक संरक्षण अधिनियमात समाविष्ट हक्काची माहिती मिळवून आपली फसवणूक टाळता येऊ शकते:- मूलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम. दीपक देशपांडे मूल. ग्राहक संरक्षण अधिनियमात समाविष्ट हक्काची माहिती मिळवून आपली फसवणूक टाळता येऊ शकते असे प्रतिपादन मूलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमातून उपस्थितांना केले. मूल प्रशासकीय भवनातील सभागृहात तहसील कार्यालय मूल आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम नुकताच पार पडला,या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी अजय चरडे हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मूलच्या तहसीलदार मृदूला मोरे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल चे तालुका अध्यक्ष दीपक देशपांडे, सचिव रमेश डांगरे, तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार,पुरवठा निरीक्षक राजेश शिरभाते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. विविध उदाहरणांसह ग्राहक संरक्षण अधिनियमानुसार वस्तू व सेवा घेतल्यानंतर काही त्रुटी आल्या तर त्याविरुद्ध दाद मागता येते हे आवर्जून सांगताना ग...