मूल तालुक्यातील गुणवंत!
मूल तालुक्यातील गुणवंत! यशस्वी येनुगवारचे सुयश. दीपक देशपांडे मूल तालुक्यातील बोरचांदली येथील कु.यशस्वी(निधी) येनुगवार हिने *धुळे* येथे झालेल्या *राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत* १४ वर्ष वयोगटातील कांस्यपदक पटकावले. संदिप कवडू येनुगवार (शिक्षक) व सुजाता संदीप येनुगवार ह्यांची ती मुलगी आहे सध्या वर्ग ८ वी मध्ये सेंट अन्स हायस्कूल मूल येथे शिकत असून *विभागीय कराटे स्पर्धेत (वर्धा)* प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला , तिथे तीने हे यश संपादन केले आहे. मूल तालुक्यासाठी ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. तीच्या यशाबद्दल सर्वच क्षेत्रात कौतुक केले जात आहे. दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️ Ddbatmi@m2m ✍️