मा.राष्ट्रपतींचे मा. स्वीय सहाय्यक रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशनचे उद्घाटन थाटात संपन्न.
मा.राष्ट्रपतींचे मा. स्वीय सहाय्यक रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशनचे उद्घाटन थाटात संपन्न पुणे दि.३१ : न्यूज ब्युरो. भारताच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक श्री रवींद्र जाधव यांच्या स्मृति निमित्त उभारण्यात आलेल्या श्री रविंद्र जाधव ग्लोबल फाउंडेशन या बहुप्रतिक्षित संस्थेचे भव्य उद्घाटन पुण्यात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या संस्थेची स्थापना आरोग्य सेवा, शिक्षण आणि शाश्वत विकास या तीन मुख्य क्षेत्रांमध्ये सकारात्मक योगदान देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. उद्घाटनाच्या प्रस्तावनेत सुचेता रवींद्र जाधव यांनी त्यांच्या वडिलांचे धन्यवाद व्यक्त करत मिळालेल्या नावाबद्दल आम्हा सर्व बहिनींना अभिमान वाटतो असे नमूद केले. याप्रसंगी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी रवींद्र जाधव ग्लोबल फाऊंडेशन साठी पाठविलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन त्यांच्या कन्या सौ ज्योती राठौर यांनी केले तसेच जाधव साहेब यांच्या स्मरणार्थ गौरवोद्गार काढले. प्रतिभाताई पत्रात म्हणाल्या रवींद्र जाधव साहेब अत्यंत शिस्तबद्ध आणि कर्तृत्ववान...