वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारून त्याचा प्रचार व प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.:-पी एम जाधव

 वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारून त्याचा प्रचार व प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.:-पी एम जाधव   


चंद्रपूर:-दीपक देशपांडे 

 प्रियदर्शिनी कन्या विद्यालय बगड खिडकी, चंद्रपूर येथे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सर्प विज्ञान, चमत्कारामागिल विज्ञान व जादूटोणा विरोधी कायदा यावर महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष पी एम जाधव यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली भलमे व कार्यक्रमाच्या आयोजिका गाईड शिक्षिका रूपलता धोटे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. बिना वातीच्या पाण्याने पेटणाऱ्या दिव्याचे प्रज्वलन मुख्याध्यापिका भलमे यांचे हस्ते करून कार्यक्रम सुरू करण्यात आला. शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ९ ऑगस्ट १९८९ ला स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त ९ ऑगस्ट ला समितीचा इतिहास व तिचे कार्य या बाबत जाधव यांनी माहिती दिल्यावर पोस्टर्स च्या सहाय्याने जाधव यांनी सर्प विज्ञानावर सविस्तर माहिती दिली. जो मांत्रिक विषारी सापाने दंश केलेल्या व्यक्ती चे विष मंत्राने उतरवील त्याला समीती कडून २५ लाख रुपये बक्षीस देण्यात येईल असे समितीचे आवाहन असल्याचे जाधव यांनी सांगितले. जादूटोणा, भुत, भानामती, करणी काढणे, मंत्राने विषारी सापाचे विष उतरविणे, मंत्राने कोणताही आजार किंवा समस्या दूर करणे, नरबळी दिल्याने धन प्राप्ती होणे या भ्रामक कल्पना आहे. ढोंगी लोकांनी आपल्या स्वार्थासाठी समाजामध्ये पेरलेल्या अफवा आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. अंधश्रद्धा मुक्त समाज निर्मिती साठी पुरोगामी संत व समाजसुधारक यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे विचार अंगीकारून त्याचा प्रचार व प्रसार करा. हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असल्याचे जाधव यांनी सांगितले. ढोंगी लोक दाखवित असलेल्या तथाकथित चमत्काराबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी विविध चमत्कारिक प्रयोगांचे सादरीकरण करून प्रत्येक प्रयोगामागील वैज्ञानिक कारण जाधव यांनी स्पष्ट करून सांगितले. या प्रसंगी गणितावर आधारित चमत्कारिक प्रयोगांचे सादरीकरण करून त्यामागील तंत्र जाधव यांनी सांगितले. या कार्यक्रमात सादर केलेल्या चमत्कारिक प्रयोगांचे सादरीकरणामध्ये मुलींनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रूपलता धोटे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उमाकांत पिसे, शरद घुबडे, धनंजय जिराफे,अमीत अडेट्टीवार, राहुल चव्हाण, समीर सलामे, रंजना धुर्वे, कर्मवती बांबोळे, ज्ञानदेव साटोणे,संजय लखपती,सतीश पालकर,जोगी नैताम , आशा गजर्लावार व बंडु वाघाडे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला २०० चे वर विद्यार्थीनी हजर होत्या.

दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक

✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.