Posts

Showing posts from April, 2026

मूल शहरातील राजकीय वर्चस्व नाकारीत प्रशासनाची अतिक्रमण हटविण्याची कारवाई .

Image
  मूल शहरातील  राजकीय वर्चस्व नाकारीत प्रशासनाची अतिक्रमण हटविण्याची कारवाई  दीपक देशपांडे. मूल शहरातील गांधी चौक येथे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर काँग्रेसचे नेते संतोष रावत यांनी अवैध बांधकाम करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत हा प्रयत्न हाणून पाडला. मूल येथील अत्यंत मोक्याच्या गांधी चौकातील जागा बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळताच भाजपाचे शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले आणि नगरसेविका प्राची आक्केवार यांनी तात्काळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेने संतोष रावत यांना नोटीस बजावून काम तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवण्यात आल्याने अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने कडक पावले उचलली. प्रचंड पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने संबंधित अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईमुळे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यात यश आले अ...

महाराष्ट्राचे विभाजन: व्यवहार्य... की अव्यवहार्य....? भाग ३ हे विभाजन नव्हे तर कुटुंब विस्तार ठरावा..

Image
  महाराष्ट्राचे विभाजन: व्यवहार्य... की अव्यवहार्य....?  भाग ३. हे विभाजन नव्हे तर कुटुंब विस्तार ठरावा.. मागोवा महाराष्ट्राच्या वाटचालीचा... गेल्या लेखात मी आजच्या महाराष्ट्राचे पाच भागांमध्ये कसे विभाजन केले जाऊ शकेल याची मांडणी केली होती.इथे मला वाचकांना एक बाब स्पष्ट करायची आहे, मी सुरुवातीपासून विदर्भाचे वेगळे राज्य व्हावे या मागणीचा समर्थक राहिलेलो आहे. त्यामुळे त्या मागणीचा पर्यायाने वेगळ्या विदर्भाच्या सक्षमतेचा मी पुरेसा अभ्यास केलेला आहे. मात्र इतर भागांबाबत तितका सखोल अभ्यास मी केलेला नाही. तरीही जी काही तथ्ये उपलब्ध आहेत, त्या आधारे मी हा विषय मांडतो आहे.  या आधीच्या लेखात मी विदर्भाचे एक राज्य मराठवाड्याचे एक राज्य त्यानंतर खानदेश मग मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र अशा पाच राज्यात महाराष्ट्राचे विभाजन व्हावे आणि मराठीचे एकच राज्य ठेवण्यापेक्षा मराठीची पाच राज्ये असावीत अशी संकल्पना मांडली होती. तीच भूमिका घेऊन मी आज हा विषय मांडतो आहे.  या विषयावर मी संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थकांशी चर्चा सुरू केली की ते महाराष्ट्र हे एक कुटुंब आहे आणि ते कुटुंब तोड...

माझंही मत... भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी संघ परिवाराने "हे" करावे...

Image
माझंही मत... भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी संघ परिवाराने "हे" करा वे... भारत हे मुळातच हिंदू राष्ट्र आहे. त्याला हिंदू राष्ट्र म्हणून वेगळे घोषित करण्याची काहीही गरज नाही असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केले आहे. त्यांचे हे विधान निश्चितच स्वागतार्ह मानावे लागेल.  भारत हे हिंदू राष्ट्र आहे हे जरी डॉ. मोहन भागवत मान्य करत असले, तरी सरकार दरबारी असलेल्या नोंदणीनुसार मात्र हे हिंदू राष्ट्र नाही. जगात माझ्या माहितीप्रमाणे ५० च्या वर मुस्लिम राष्ट्रे आहेत. कदाचित तितकीच किंवा जास्तही ख्रिस्ती राष्ट्रे आहेत. काही बौद्ध धम्मियांची देखील राष्ट्रे आहेत. मात्र हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म मानला गेलेला असतानाही एकही हिंदू राष्ट्र नाही हे दुर्दैवी वास्तव नाकारता येत नाही. काही वर्षांपूर्वी पर्यंत नेपाळ हे हिंदू राष्ट्र होते. मात्र मधल्या काळात तिथे डाव्यांची सत्ता आली आणि त्यांनी देखील निधर्मिक भूमिका घेतली. पुरातन काळापासून भारतात हिंदू हेच कायम वास्तव्य करून होते. त्यावेळी हा देश अगदी थेट काबुल कंदाहार पर्यंत, इकडे खाली श्रीलं...

मूल तालुक्यातील गुणवंत...विवेकानंद विद्यालय बेंबाळ येथील नंदिनी देऊलवार.

Image
मूल तालुक्यातील गुणवंत...   विवेकानंद विद्यालय बेंबाळ येथील नंदिनी देऊलवार    एन.एम.एम.एस. परीक्षेत उत्तुंग भरारी NT-C प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम  मूल :-दीपक देशपांडे. महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (NMMS) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला .यामध्ये मूल तालुक्यातील विवेकानंद विद्यालय बेंबाळ येथील विद्यार्थिनी नंदिनी शंकर देउलवार हिने घवघवीत यश संपादन केले.नंदिनीने चंद्रपूर जिल्ह्यातून जनरल प्रवर्गातून पाचवे मेरिट स्थान पटकाविले असून NT-C प्रवर्गातून ती जिल्ह्यातून पहिली आली आहे. नंदिनी ही मूळची जुनासुर्ला  येथील असून तिने इयत्ता आठवीमध्ये असताना ही परीक्षा दिली होती.एकूण १८० गुणांच्या या परीक्षेत तिने १२४ गुण मिळवून गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले.या यशामुळे तिला आता इयत्ता ९ ते १२ वी पर्यंत पुढील ४ वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.ग्रामिण भागात राहून व गरिबीचे चटके सोसून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर तिने हे यश खेचून आणले आहे.नंदिनीच्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेचे मुख्...

गुणवंत विद्यार्थी... वल्लरी अविकांत पाल.

Image
गुणवंत विद्यार्थी... वल्लरी अविकांत पाल. मूल, दीपक देशपांडे.   महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा केंद्र सरकारमार्फत आयोजित करण्यात येते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे, हा या योजनेचा उद्देश आहे. शिष्यवृत्तीप्राप्त प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. या शिष्यवृत्ती परीक्षेत नवभारत विद्यालय मूल येथील कुमारी वल्लरी अविकांत पाल ही विद्यार्थिनी पात्र ठरली. याचे संपूर्ण श्रेय नवभारत विद्यालय मूल चे मुख्याध्यापक, शिक्षक आणि तिचे पालकांना देते. नवभारत विद्यालय मूल चे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले तसेच पुढील यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या . जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे आणि जागृत ग्राहक राजा मूल त...

माझंही मत... काँग्रेस पक्ष आता नवे प्रवक्ते नेमणार...?

Image
माझंही मत... काँग्रेस पक्ष आता नवे प्रवक्ते नेमणार...? साधारणपणे प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रवक्त हा त्या पक्षाचा चेहरा असतो असे म्हटले तरी वावगे ठरू नये. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे अगदी विभाग स्तरावर प्रवक्ते हे असतातच. त्यातले अनेक प्रवक्ते हे आपल्याला सातत्याने वृत्तवाहिन्यांवर दिसत असतात.  काँग्रेस पक्षाचे अतुल लोंढे, अनंत गाडगीळ, सचिन सावंत, हनुमंत जगताप असे प्रवक्ते आपण नेहमी बघतो. मात्र पक्षाला ते सध्या पुरेसे वाटत नाहीत अशी माहिती कानावर आली आहे. त्यामुळेच पक्षाने आता पक्षाबाहेरचे पत्रकार आणि अभ्यासक प्रवक्ते म्हणून नेमायचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे, नव्हे अशी कुजबुज कानावर आली आहे. त्यासाठी पक्ष लवकरच समाजमाध्यमांवर जाहिरातही देणार असल्याची माहिती कानावर आली आहे.  काँग्रेस पक्ष हा देशातला सर्वात जुना पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या पक्षाला अतिशय समृद्ध अशी परंपरा आहे. या पक्षाचे अनेक नेते हे देशाला नेतृत्व देणारे असे नेते होते. ते अभ्यासू होते बहुश्रुत आणि हजरजबाबी देखील होते. त्यामुळे पक्षाची बरेच वर्ष एकहाती सत्ता राहिली.  मात्र गेल्या काही व...

मूल तालुक्यातील गुणवंत... NMMS परीक्षेत तेजस्विनी दीपक बांगरे हिचे सुयश

Image
  मूल तालुक्यातील गुणवंत....  तेजस्विनी दीपक बांगरे . दीपक देशपांडे.   सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेत पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल नांदगावची विद्यार्थिनी तेजस्विनी दीपक बांगरे गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त करून शाळेचे नाव रोशन  केले आहे त्याबद्दल मुख्याध्यापक श्री बी .एल. चरपे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  तसेच सर्व सदस्य व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि गावकऱ्यांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन केलेले आहे . डीडीबातमी चे संपादक दीपक देशपांडे यांनी तीचे अभिनंदन केले असून आजही आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक सोयीसुविधांचा अभाव असतांनाही, स्वमेहनत आणि  शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपली गुणवत्ता सिद्ध करीत असल्याचा आनंद व्यक्त केला आहे. दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक              9403285344      ✍️ Ddbatmi-m2M ✍️

कृषी महाविद्यालय मूल येथे स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा ५०० वा टप्पा उत्साहात साजरा

Image
  कृषी महाविद्यालय मूल येथे स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा ५०० वा टप्पा उत्साहात साजरा. डीडीबातमी वृत्तसेवा. कृषि  महाविद्यालय मूलच्या वतीने आयोजित ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचा ५०० वा टप्पा उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ विलास अतकरे यांच्या अध्यक्षतेखाली,  श्री. चंद्रशेखर गलगलीकर, आर्ट ऑफ लिव्हिंग, वरिष्ठ प्रशिक्षक व समाजसेवक , डॉ. जयश्री गलगलीकर, आर्ट ऑफ लिव्हिंग, वरिष्ठ प्रशिक्षक नागपूर, श्री. दीपक देशपांडे अध्यक्ष, जागृत ग्राहक राजा, नागपूर  विदर्भ प्रांत,   प्रा. चंद्रकांत मणियार, वरिष्ठ पत्रकार, मूल , श्री. विनोद इंगोले वरिष्ठ विदर्भ प्रतिनिधी, ॲग्रोवन , श्री. सोहम बुटले, अध्यक्ष युवा वॉरियर्स चंद्रपूर,  यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथींचे स्वागत शाल, श्रीफळ व तुळशीवृंदावन देऊन करण्यात आले आणि वृक्षलागवड व जतन करण्याचा मुलमंत्र अतिथींच्या स्वागत समारंभातूनच दाखविला गेला. या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. चंद्रकांत मणियार, वरिष्ठ पत्रकार,...

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर गोंडवाना आदिवासी आंदोलन चळवळ आणि भाजपाची सत्ता स्थापन

Image
  आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर गोंडवाना आदिवासी आंदोलन चळवळ आणि भाजपाची सत्ता स्थापन.   पोंभुर्णा  डीडीबातमी वृत्तसेवा. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित पोंभुर्णा येथील संस्थेवर पहिल्यांदाच गोंडवाना आदिवासी आंदोलन चळवळ आणि भाजपाची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. या घडामोडींमुळे तालुक्यातील राजकीय व सहकार क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे. अनेक वर्षांनंतर सत्ता बदल झाले आहे. दिनांक २२ एप्रिल रोज बुधवारला दुपारी १२ वाजता सहायक निबंधक पोंभुर्णा यांच्या कार्यालयात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून राजेंद्र कुळमेथे तर उपाध्यक्षपदी बालाजी पेंदोर यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी संचालक ईश्वर नैताम, दिलीप मॅकलवार, श्रीकांत वडस्कर, निमचंद्र कोवे,विस्तारी टेकाम आणि चतुर ऊईके तसेच ईतर संचालक उपस्थित होते. निवडणूक अत्यंत चुरशी असुन सुद्धा शांततेत पार पडली. नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सर्व संचालक मंडळाचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, गोंडवाना आदिवासी आंदोलन चळवळीचे जगण येलके महाराज,भाजपा जिल्हाध्यक्ष ह...

माझंही मत... हर्षवर्धन सपकाळांनी अभ्यास करून बोलणेच उचित ठरेल...

Image
माझंही मत... हर्षवर्धन सपकाळांनी अभ्यास करून बोलणेच उचित ठरेल... एक काळ असा होता की काँग्रेसमध्ये नेते सुद्धा अभ्यास करून बोलायचे. कोणतेही हवेत विधान करणारे नेते काँग्रेसमध्ये नव्हते. मला आठवते स्वर्गीय वसंतराव नाईक, वसंतराव साठे, शंकरराव चव्हाण, वसंत दादा पाटील, डॉ. श्रीकांत जिचकार, यशवंतराव चव्हाण, विठ्ठलराव गाडगीळ या नेत्यांची भाषणे ऐकणे ही एक पर्वणी असायची. कोणत्याही विषयाचा साद्यंत अभ्यास करून ते बोलायचे. ना बुडखा ना शेंडा असे निराधार वक्तव्य हे करायचे नाहीत.  मात्र आज परिस्थिती बदलली आहे. आज काँग्रेसचे नेते तोंडाला येईल ते बोलतात. मग त्यात तथ्य आहे की नाही हे ते कधीही बघत नाहीत. बोलण्यापूर्वी अभ्यास करून यावे हे तर त्यांच्या गावीही नसते.  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल महिला आरक्षण विधेयक संदर्भात एक पत्र परिषद घेतली. त्यात बोलताना त्यांनी टीका केली की नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला महिलांना संसदेत आरक्षण द्यावे असे वाटते, तर त्यांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वोच्च पद असलेल्या सरसंघचालकपदावर महिलेला का न...