Posts

Showing posts from September, 2025

नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा सिद्धीदात्री.

Image
   नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा  सिद्धीदात्री       *विश्वविख्यात विद्यानगरीच्या*        *तांबडी जोगेश्वरी मंदिरातून*                          *आजची नवदुर्गा..'सिद्धीदात्री'*               *आजचा रंग 💖*         *हिरण्यवर्णां हरिणीं*         *सुवर्णरजतस्त्रजाम् ।*         *चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं*         *जातवेदो म आ वह ॥*         *नवरात्र. देवीच्या मंदिरात पहाटे संबळ.. चौघडा वाजतोय. पोतराज.. गोंधळी मंदिरात देवीची कवने गात आहेत. नित्य नव्या रंगाच्या वेशभूषेत अलंकारासह नटून थटून.. सुगंधी फुलांचे गजरे माळून.. प्रसन्नचित्त भाविक महिलांची पहाटेपासून देवीची ओटी भरायला गर्दी होत आहे.*         *घरोघरच्या देवीची नित्य पूजा.. आरती.. उपवास.. आराधना, कुमारीका पूजन यामुळे भक्तमन प्रसन्न झालेय. घटाभोवती उगवलेली हिरवी सप्तधान्ये बघू...

नवरात्रिचा आध्यात्मिक अर्थ.

Image
  🪔नवरात्रिचा आध्यात्मिक अर्थ🪔 नमस्कार मंडळी, सगळीकडे नवरात्रीच्या उत्सवात आपण सगळे मश्गूल असतांनाच कधीकधी आपल्याला हा पर्वकाळ कां पाळायचा?त्यांचे महत्त्व काय? याबाबत माहिती नसते,ती माहिती आमच्या नित्य वाचक , चाहत्यांसाठी घेऊन आल्या आहेत आमच्या चाहत्या आणि नित्य वाचक ,सहकारी.......वर्षा मदनकर, चंद्रपूर. आम्ही नेहमीच नवलेखकांना /नवलेखिका आणि कवी यांना संधी देण्याचा प्रयत्न करीतच असतो तोच हा एक प्रयत्न. लेखिकेच्या मताशी संपादक सहमत असतीलच असे नाही,मात्र त्यांच्या  आग्रहास्तव एक संधी  देत आहोत. बघा, आपल्याला त्यांचे मत पटतंय का? दीपक देशपांडे, मुख्य संपादक. सर्वत्र नवरात्रिची धामधूम आहे. गरबा, जागरण, उपवास, इत्यादीमध्ये सगळे मग्न आहेत. चला, याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे, ते जाणून घेऊया. देवींच्या मूर्ती पाहिल्यानंतर लक्षात येते की त्या आपल्यासारख्याच आहेत म्हणजे हात, पाय, कान, नाक, मुख आहेत. पण त्या पूजनीय आहेत. पूजा कशाने होते? श्रेष्ठ कर्मांमुळे, पवित्रता धारण केल्यामुळे! या नऊ देवींनी कोणते श्रेष्ठ कर्म केले? श्रेष्ठ कर्माचे ज्ञान देणारा कोण? कधी केले हे श्रेष्ठ कर्म? तो...

नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा महागौरी

Image
   नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा  महागौरी     अंबाजोगाईच्या           योगेश्वरी मंदिरातून                       आजची नवदुर्गा..'महागौरी'            आजचा रंग 🦚     *पद्मप्रिये पद्मिनि पद्महस्ते*     *पद्मालये पद्मदलायताक्षि ।*     *विश्व (विष्णु) प्रिये*     *विष्णुमनोऽनुकूले*      *त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व ॥*        *या हिरण्यवरणीं महालक्ष्मीचे रूप मन मोहक सुंदर आहे. या देवीला कमळे आवडतात, हिच्या हातात कमळ आहे, कमळ हेच तिचे घर आहे. कमळाच्या पाकळीप्रमाणे देवीचे डोळे आहेत, ही सर्व विश्वाला (विष्णूला) प्रिय आहे. ही श्रीविष्णूंच्या मनाला अनुकूल आहे. हे श्रीलक्ष्मी तू तुझे चरणकमल मजजवळ ठेव.*         *नवरात्रात भक्तांना ज्या दिवसाची वर्षभर प्रतिक्षा असते तो दिवस. आज संध्याकाळी अष्टमी तिथी सुरू होणार. आज महागौरी पूजन होणार आणि उद्या उपवासाची अष्टमी आहे.*...

घ्या समजून राजेहो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आजची स्वीकारार्हता प्राप्त होण्यामागची कारणे.

Image
 घ्या समजून राजेहो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आजची स्वीकारार्हता प्राप्त होण्यामागची कारणे   २७ सप्टेंबर २०२५ रोजी इंग्रजी कालगणनेनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षाचा झाला. येत्या २ ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर हिंदू कालगणनेनुसार संघ १०० वर्षाचा होईल. इंग्रजी कालगणनेनुसार संघ शंभर वर्षाचा होत असल्यामुळे काल नागपुरात २१ हजाराहून अधिक गणवेशधारी स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पथसंचालन केले. तर २ ऑक्टोबरला होणाऱ्या विजयादशमीच्या जाहीर कार्यक्रमात देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविद संबोधित करणार आहेत.  संघ १०० वर्षाचा होतो आहे, हा मुद्दा लक्षात घेत सध्या कोणतेही वर्तमानपत्र उघडा, किंवा टीव्ही ऑन करून कोणतीही वृत्तवाहिनी सुरू करा, संघाबद्दल मागोवा घेणाऱ्या चार दोन सकारात्मक बातम्या दिसतातच. सध्या सर्वच माध्यमांमध्ये संघावर लिहिण्याबाबत चढाओढ लागली आहे की काय असे वाटू लागते. हे  बघता आता संघाची स्वीकारार्हता चांगलीच वाढली आहे असे दिसून येते. फक्त माध्यमांमध्येच नाही, तर इतरत्र देखील संघाची स्वीकारावता वाढताना दिसते आहे. काल संघाच्या प्रार्थनेला ख्यातनाम गायक शंकर महाद...

नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा कालरात्री

Image
    नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा  कालरात्री               *कार्ला डोंगरावरील*       *एकविरा आईच्या मंदिरातून*       *आजची नवदुर्गा..'कालरात्री'*               *आजचा रंग 🧡*   *भुजेवामयुग्मे शिरोऽसिं दधाना*      *वरं दक्षयुग्मेऽभयं वै तथैव ।*     *सुमध्याऽपि तुङ्गस्तनाभारनम्रा*     *लसद्रक्तसृक्कद्वया सुस्मितास्या ॥*         जिच्या दोन्ही डाव्या हातात नरमुन्ड आणि खडग आहेत तर दोन्ही उजव्या हातात माळ आणि अभय मुद्रा आहे.         आजची नवदुर्गा कालरात्रि. शत्रू जसा वागेल तसेच त्याच्याशी वागावे. बघूनच धडकी भरावी असे रुप धारण करावे. पण सज्जन शक्तीला अभय दयावे हे सांगणारे हे कालरात्री नवदुर्गेचे रूप.           दानवी शक्ती प्रबळ होत विध्वंस करतात तेव्हा आपले स्वरुप शस्त्र अस्त्र संपन्न होता प्रत्युत्तर देताना अवतार भीतीदायक असावा हे सांगणारा हा कालरात्रि देवीचा अवतार.   ...

राजकारणावरील सकारात्मक आणि प्रसंगी टीकात्मक लेखनच जनसामान्यांचे प्रबोधन करणारे: हंसराज अहिर.

Image
  राजकारणावरील सकारात्मक आणि प्रसंगी टीकात्मक लेखनच जनसामान्यांचे प्रबोधन करणारे: हंसराज अहिर नागपूर दि २७ सप्टेंबर: दीपक देशपांडे. आजच्या लोकशाही व्यवस्थेत पत्रकारिता आणि साहित्यलेखन हे लोकप्रबोधनाचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे पत्रकार आणि साहित्यिकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून राजकारणावर लेखन करणे आणि साहित्य निर्मिती करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहिर यांनी केले.   ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि साहित्यिक अविनाश पाठक लिखित शह-काटशह या राजकीय कथासंग्रहाच्या साहित्य भारतीच्या वतीने आयोजित प्रकाशन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून अहिर बोलत होते. स्थानिक धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात काल शुक्रवारी आयोजित या कार्यक्रमात दै. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, आकाशवाणीचे निवृत्त वृत्त संचालक आणि साहित्य भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री नितीन केळकर, साहित्य भारती, विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष लखन सिंह कटरे, विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत लाखे, प्रांत म...

संघ शताब्दी निमित्त स्मरण श्रीगुरुजींनी रचला राममंदिराचा पाया...

Image
  संघ शताब्दी निमित्त स्मरण श्रीगुरुजींनी रचला राममंदिराचा पाया... ✍️ विनोद देशमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा आजच्या दिवशी  २७ सप्टेम्बर १९२५ रोजी लागून संघाचा शुभारंभ झाला. त्याची तारखेनुसार आज शताब्दी, त्यानिमित्ताने. भारताच्या माथ्यावरील सर्वात मोठा कलंक ठरलेल्या अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या विध्वंसानंतर त्याच्या पुनर्स्थापनेसाठी द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांनी अत्यंत दूरदृष्टीने विश्व हिंदू परिषद स्थापन करून या कार्याला चालना दिली. त्याची यंदा एकसष्टी नुकतीच झाली आहे. मोठ्या माणसांची स्वप्नंही मोठीच असतात. आणि, श्रीगुरुजी यांच्यासारख्या महापुरुषाची स्वप्नं तर मोठी असणारच. एक सबल हिंदू समाज, हे त्यांचं सर्वात मोठं स्वप्न होतं.‌ या ध्येयासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य झोकून दिलं. दिवसरात्र एक करून झपाटल्यागत काम केलं. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी लावलेलं हिंदू संघटनेचं रोपटं मोठ्या वृक्षात परिवर्तित करण्यासाठी तब्बल ३३ वर्षे संपूर्ण भारत कितीदा तरी (वर्षातून किमान दोनदा) पायाखाली घातला, हजारो माणसांशी संवाद-संपर्क केला आण...

सत्यशोधक समाज स्थापन दिवस साजरा.

Image
  सत्यमेव जयते ' ध्वजारोहण कार्यक्रम  प्रथमच  चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा.  दीपक देशपांडे  सत्यशोधक समाज स्थापना दिवस व १५२ वा ' सत्यमेव जयते ' ध्वजारोहण कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील केळझर येथे प्रथमच  बुधवार दिनांक २४/०९/२०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .                                         क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.व ' सत्यमेव जयते ' ध्वजाची मिरवणूक १७ मार्च १८८५ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी पुणे शहरात काढली. व त्यामध्ये बॅड पथक, वसतीगृहातील मूले,समाजाचे अनुयायी कार्यकर्ते मित्र, शिस्तीने सहभागी झाले होते.झेंड्याच्या मिरवणूकीचे वॄत ' दीनबंधू' पत्रातून अगोदर प्रकाशित झाले.त्या मिरवणूकीत ' शिवाजी महाराज की जय ' आणि ' सत्यशोधक समाज की' जय, या उत्स्फूर्त घोषणा देण्यात आल्या होत्या.त्या झेंडा मिरवणूकीचे मुख्य आयोजक कॄष्णराव भालेकर होते. महात्मा फुले यांची प्रसंगोचीत भाषण...

नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा कात्यायनी.

Image
नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा कात्यायनी.       शाश्वत सुखाच्या नवरात्रीची      मुंबादेवीच्या मुंबापुरीतून       आजचा रंग..राखाडी 🩶       आजची नवदुर्गा..कात्यायनी         *कात्यायनी महामाये,*         *महायोगिन्यधीश्वरी ।*         *नन्दगोपसुतं देवी,*         *पति मे कुरु ते नमः ॥*              नवरात्र आनंद पर्व सुरु आहे. सध्या नऊ दिवस कन्या पूजनाचा सुखद.. अनुपम.. अवर्णनीय आनंद बालिकाच नाहीतर घरातील सारेच अनुभवत आहेत. देवीच्या कृपेने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत. इच्छापूर्ती करणे ही आदिमातेची ख्याती. पण त्यासाठी तेवढी उपासना हवी.         कात्यायन हे विश्वप्रसिद्ध महर्षी. त्यांनी देवीच्या कृपेसाठी कठोर तप केले. देवीनी आपल्या घरी कन्या रूपात जन्म घ्यावा ही त्यांची मनोकामना देवीने पूर्ण केली. आजही सर्वच कन्याना देवीस्वरूप मानल्या जाते. आपल्याला किमान एक तरी कन्या असावी ही सर्वांची इच्छा असते. महर...

नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा स्कंद माता.

Image
नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा स्कंद माता.   स्कंदमाता देवीचा मंत्र सिंहासना गता नित्यं पद्माश्रितकरद्वया। शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी।। या देवी सर्वभू‍तेषु मां स्कंदमाता रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।। चंद्रपूरच्या महाकाली मंदिरातून  आज  ललिता पंचमी कुमारिका पूजनाची आजचा रंग हिरवा 💚 आजची नवदुर्गा..स्कंदमाता   नील कौशेयवसनां हेमाभं कमलासनाम् ।         भक्तांना वरदां नित्यं ललितां चिन्तयाम्यहम् ॥         कमळावर अधिष्टित, निळे रेशमी वस्त्र परिधान करणाऱ्या, सुवर्णकांतीच्या, भक्तांना नित्य वर देणाऱ्या अशा ललितादेवीचे मी चिंतन.. पूजन करतो.         आदिशक्तीवर भक्तांची नितांत श्रद्धा आहे. जीवनात अनेकदा संकट येतात.. परिक्षा होते पण तीच तारते हा भक्तांना विश्वास आहे. याचेच प्रत्यंतर नवरात्रात येतेय.         भल्या पहाटे देवीच्या मंदिरात काकडा आरतीसाठी जाणाऱ्या भक्तांची रस्त्यावर गर्दी आहे. मंदिरात दर्शनासाठी रांगा आहेत. सर्वांची मन प्रफुल्लीत आहेत. महिला वर्ग तर नि...