मूल येथे निराधार योजनेच्या बैठकीत १६८प्रकरणे मंजूर.
मूल येथे निराधार योजनेच्या बैठकीत १६८प्रकरणे मंजूर.
मूल, दीपक देशपांडे
मूल तालुका संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना समितीची मासिक बैठक दिनांक २३/०८/२०२४रोजी तहसील कार्यालय मूल येथे संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षा वंदना आगरकाटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सभेमध्ये एकूण १८१अर्जाची छाननी करण्यात आली१६८ प्रकरण निकाली काढण्यात आले असून नामंजूर प्रकणाची संख्या एकूण १३आहे.
समितीपुढे दाखल प्रकरणाबाबत गोषवारा खालील प्रमाणे आहे.
१) संजय गांधी निराधार योजना ६१ पात्र प्रकरण
२) इंदिरा गांधी विधवा योजना १७ पात्र प्रकरण
३) इंदिरा गांधी अपंग योजना ०
४) श्रावण बाळ योजना ८७ पात्र प्रकरण १२ नामंजूर प्रकरण एकूण ९९
५) वृध्दापकाळ योजना ३पात्र प्रकरण नामंजूर प्रकरण १ एकूण प्रकरण ४
असे एकूण १६८ मंजूर प्रकरण नामंजूर १३ एकूण प्रकरण १८१.
या वेळी तहसीलदार मृदुला मोरे, गट विकास अधिकारी , संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार ओंकार ठाकरे , समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य, संजय गांधी निराधार योजनेमधील कर्मचारी आदी उपस्थित होते.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment