माझंही मत... राष्ट्रवादीचा अर्थखात्यासाठी हट्ट
माझंही मत... राष्ट्रवादीचा अर्थखात्यासाठी हट्ट महायुतीतील एक घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या जरा कुरकुर सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्याला कारण झाले आहे म्हणे अर्थमंत्रीपदाचे. आधी फडणवीस मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला त्यावेळी अर्थमंत्रीपद अजितदादांकडे सोपवले गेले होते. मात्र अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर अर्थ खाते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे म्हणजेच भाजपाकडे ठेवून घेतले. अर्थखाते आपल्यालाच परत मिळावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सर्वांचीच इच्छा असल्याची बातमी सध्या प्रसारित होते आहे. कोणत्याही राज्याच्या कारभारात अर्थ खाते, गृह खाते, महसूल खाते, आणि सामान्य प्रशासन खाते ही अत्यंत महत्त्वाची खाती मानली जातात. त्यामुळे साधारणपणे जबाबदार आणि अनुभवी आमदारांकडेच मंत्रिपद देऊन ही खाती सोपवली जात असतात. अजित पवार हे एक अनुभवी मंत्री म्हणून ओळखले गेले होते. जवळजवळ २५ वर्षाहून अधिक काळ त्यांनी विविध मंत्रिपदे भूषवली होती. प्रशासनाचा त्यांना दांडगा अनुभव होता. त्यातही अर्थमंत्रीपद हे महत्त्वाचे असते. आपल्या आमदारांना विकासासाठी निधी देऊ खुश करून ठेवत...