महिला दिन थाटात साजरा
* महिलांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करावा* * उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांचे आवाहन* * चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभेतर्फे जागतिक महिला दिनाचे आयोजन* चंद्रपूर m2Mन्यूजब्यूरो आजच्या महिला तसेच मुलींमधील वैचारिक शक्ती दिवसेंदिवस प्रगल्भ होतांना दिसत आहे. याचा फार मोठा प्रभाव हा समाजघटकांकडून व मुख्यत्वे शिक्षण तसेच घरच्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे ते शक्य झाले आहे. परंतू पुर्वीच्या काळात मात्र स्त्रीयांना बंधनाचे जोखड पार करुन जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना विविध गोष्टींची आवड असतांनाही पुरुषी मक्तेदारीमुळे त्याला बाजूला ठेवावी लागत असे. केवळ ‘चुल आणि मुल’ हेच तिचे विश्व बनले होते. आजही तशी परिस्थिती काही भागात सुरुच आहे. त्यामुळे महिलांची प्रगती खुंटत गेली, तिला तिचे अस्तित्वच तयार करता आले नाही. यापासून तिला सुटका हवी असल्यास मी कोण आहे ? याचा प्रथम तिने विचार करावा व त्या अनुषंगाने प्रयत्न करावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी केले. चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधू...