शासकीय ध्वजारोहण व नगरपरिषद मूल द्वारे १५ऑगस्टला देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा.
शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम, व नगरपरिषद मूल द्वारे १५ ऑगस्टला देशभक्ती पर गीत गायन स्पर्धेचे आयोजन, बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन.
भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापनदिन सोहळा
मूल दीपक देशपांडे
यादिवशी प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात, मूल चे उपविभागीय अधिकारी, मान. विशालकुमार मेश्राम यांचे शुभहस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी ठिक ९.०५ वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार मृदूला मोरे व सहकारी नायब तहसीलदार यांनी केले आहे.
ह्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर,
हर घर तिरंगा २०२४
कर्मवीर कन्नमवार सभागृह मूल येथे नगर परिषद मूल घ्या वतीने , राबविण्यात आलेल्या हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत सकाळी १० वाजता शहरातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या गटात व सर्वसामान्य नागरिकांना एका स्वतंत्र गटात देशभक्ती पर गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार असून या स्पर्धेत वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना (महिला व पुरुष)स्वतंत्रपणे सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन यशवंत पवार, मुख्याधिकारी मूल यांनी केले आहे.
नावनोंदणी आजपासून सुरू झाली असून त्यासाठी ,अभय चेपूरवार , श्रीकांत समर्थ व आलेख बारापात्रे यांचेकडे प्रत्यक्ष भेटून वा भ्रमणध्वनी द्वारे नोंदणी करता येणार आहे.
ही नावनोंदणी दिनांक १४/०८/२०२४ च्या सायंकाळी ५वाजेपर्यंत करता येणार आहे.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️


Comments
Post a Comment