Posts

Showing posts from December, 2025

अमृत महोत्सवानिमित्त राठी विद्यालय आणि मी .

Image
  अमृत महोत्सवानिमित्त  राठी विद्यालय आणि मी  अमरावतीच्या मोर्शी रोडवरील श्री गणेशदास राठी छात्रालय समितीच्या अमृत महोत्सवास प्रारंभ झालेला आहे. आमचे मित्र श्री महेंद्र भुतडा यांनी रक्तदान समितीतर्फे रक्तदान शिबीर आयोजित करून या अमृत महोत्सवाची सुरुवात केली आहे. या श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचा एक घटक म्हणून मी हा लेख लिहावयास घेतला आहे. श्री गणेशदास राठी छात्रालय समिती व मी यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि तो दीर्घकाळचा आहे.  मी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव येथे राहणारा. माझे वडील श्री विठ्ठलराव काठोळे हे श्री परसरामजी कासट यांच्याकडे घरगडी म्हणून काम करीत होते. त्यांना मरताना शेवटचे पाणी माझ्या वडिलांनी पाजले. श्री परसरामजी कासट यांना आपल्या चिरंजीवास म्हणजे प्रा. एस पी कासट यांना माझ्या वडिलांकडे लक्ष दे असे सांगितले. प्रा. एस पी कासट यांनी ही गोष्ट लक्षात ठेवून वडिलांना तेव्हाच्या राज महाविद्यालय म्हणजे आताच्या श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात चपराशी म्हणून नेमले. पगार होता फक्त २५ रुपये. पण त्या काळात २५ रुपयाला देखील खूप किंमत होती.  श्री गणेशद...

राम'व्यथा' १० ✍️विनोद देशमुख , त्रिभाजनाच्या विचित्र निर्णयावर हायकोर्टाला 'सुप्रीम' फटकार.

Image
  राम'व्यथा' १० ✍️विनोद देशमुख त्रिभाजनाच्या विचित्र निर्णयावर    हायकोर्टाला 'सुप्रीम' फटकार. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी संदर्भातील न्यायालयीन लढाईत १३४वर्षांमध्ये जे ७ प्रमुख दावे झाले, त्यातील ५ दावे एकत्रित सुनावणीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयानं स्वत:कडे घेतल्यानंतर २१ वर्षांनी दिलेल्या अजब निर्णयावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टाला कानपिचक्या देत त्यांचा निर्णय स्थगित केला आणि एक अतिशय दुर्मीळ घटना न्यायालयीन इतिहासात नोंदली गेली. फैजाबाद जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार रामललाच्या गर्भगृहाचं कुलूप उघडून रामभक्तांना मुक्तप्रवेश १९८६ मध्ये सुरू झाला. यानंतर १९८९ मध्ये ॲड्. अगरवाल यांचा दावा दाखल करून घेताना जिल्हा न्यायालयानं "रामलला विराजमान हे न्यायिक व्यक्ती असून, ते बालक असल्यामुळे त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार त्यांचे जवळचे मित्र/सखा ॲड्. अगरवाल यांना आहे" असा महत्त्वपूर्ण अभिप्राय नोंदविला. या दोन घडामोडी पाहून अलाहाबाद उच्च न्यायालयानं त्वरेनं सात पैकी पाच दावे एकत्रित सुनावणीसाठी स्वत:कडे घेतले आणि लखनौ खंडपीठाकडे वर्ग केले. लखनौ खंडपीठान...

खलबत्ता ✍️विनोद देशमुख, ये क्या चल रहा है महाराष्ट्रमें.

Image
  खलबत्ता:-विनोद देशमुख. ये क्या चल रहा है महाराष्ट्रमें. नुकत्याच झालेल्या नगर पालिका निवडणुकीत बऱ्यापैकी साधलेलं युती, महायुती, आघाडी यांचं गणित यावेळच्या महानगर पालिका निवडणुकीत बिघडताना दिसत आहे. जमत आलेलं असताना न जमणं, तिकिटासाठी स्वत:च्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं, नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देणं असे प्रकार सर्रास सुरू आहेत आणि त्यामुळे सारेच पक्ष ढवळून निघाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच या गोंधळाचा गाळ खाली बसून लढतींचं चित्र बरंचसं स्पष्ट होईल... चहाचा घोट घेता घेता पाटील गुरुजी आपल्या सहकारी शिक्षकांना सांगत होते. त्यावर जगनाडे सर म्हणाले- "मुंबई, नागपूर, पुणे या तीन प्रमुख महानगरांचेच हाल पाहा ना. आज अस्तित्वात असलेली महायुती आणि महा विकास आघाडी या तीनही शहरांमध्ये एकजुटीनं आजतरी दिसत नाही. (उद्याचं सांगता येत नाही) मले त काई समजतच नाई. असे काहून आपले नेतेलोक." यावर मानकर गुरुजींनी त्यांची समजूत काढली- "हे आजकालचं राजकारण आहे सर. इथं कोणी कोणाचा खरा मित्र नाही अन् शत्रूही नाही. पक्ष, विचार, तत्त्वज्ञान, धोरण, लागेबांधे हे सा...

राम'व्यथा' ०९ ✍️विनोद देशमुख , १३४ वर्षांच्या कायदेशीर लढाईतील ७ प्रमुख दावे.

Image
  राम'व्यथा' ०९ ✍️विनोद देशमुख १३४ वर्षांच्या कायदेशीर लढाईतील ७ प्रमुख दावे   १८५७ चं पहिलं भारतीय स्वातंत्र्ययुद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर, अवध प्रांतही इंग्रज सरकारच्या अधिकारात आला आणि मग अयोध्येचा श्रीराम जन्मभूमी - बाबरी मशीद वाद पहिल्यांदा आधुनिक न्यायालयात पोहोचला. त्यातील काही ठळक दावे असे- (एक) १८८५ : श्रीराम जन्मभूमीच्या जागेवर मंदिर उभारण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारा दावा महंत रघुबरदास यांनी न्यायालयात दाखल केला. परंतु, "साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या चुकीची दुरुस्ती आता करता येणार नाही," असं सांगत इंग्रज न्यायाधीशानं तो फेटाळून लावला.  (दोन) १९५० : डिसेंबर १९४९ च्या "रामलला प्रगटले" घटनेनंतर हिंदूंना दर्शन आणि पूजापाठाचा अधिकार मिळावा, यासाठी हिंदू महासभेचे नेते ठाकूर गोपालसिंग विशारद वकील न्यायालयात गेले. तसा अंतरिम आदेश न्यायालयानं दिला आणि रिसिव्हर नेमला. जिल्हाधिकारी के. के. नायर यांनी तो आदेश लगेच लागू केला. नंतर उच्च न्यायालयानं हा निर्णय कायम केला.  (तीन) याच वर्षी दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत रामचंद्रदास परमहंस यांनी यालाच पूरक असा दा...

ब्रेकिंग न्यूज ,सिंदेवाहीत वाघाचा हल्ला.

Image
  ब्रेकिंग न्यूज, सिंदेवाहीत वाघाचा हल्ला. सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव (जाट) येथील गुरख़्यावर वाघाचा हल्ला, गुराखी गंभीर जखमी. उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल. दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक              9403285344      ✍️ Ddbatmi-m2M ✍️

आयुष्यातले सांगाती ४४ ,प्रतापदादा सोनवणे.

Image
आयुष्यातले सांगाती ४४. प्रतापदादा सोनवणे सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीची जयंती आणि पुण्यतिथी याची एकच तारीख कधीच नसते. तसा योग फार थोड्या व्यक्तींच्या आयुष्यात येतो. अन्यथा बहुतेक सर्वांच्या आयुष्यात जयंती आणि पुण्यतिथी या तारखा  वेगवेगळ्या असतात. जयंती आणि पुण्यतिथी ही एकच तारीख असणारी मी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात पाहिली आहे, ती म्हणजे माझे एक सुहृद प्रतापदादा सोनवणे प्रतापदादा हे एक अभियंते होते. त्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते. तब्बल दहा वर्ष ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राहिले, तर पाच वर्ष देशाच्या लोकसभेचे सदस्य म्हणून देखील ते कार्यरत राहिले होते. २२ डिसेंबर ही प्रतापदादांची जयंती आणि पुण्यतिथी दोन्हीही आहे. नुकतीच २२ डिसेंबर होऊन गेली. त्यामुळे दादांच्या बऱ्याच आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. त्या आठवणी जाग्या करून देण्याचे काम देखील फेसबुकने केले. कारण २०२३ मध्ये २२ डिसेंबरला दादा गेले, त्या दिवशी मी त्यांच्या आठवणीत एक छोटेसे संस्मरण समाज माध्यमावर व्हायरल केले होते. २२ डिसेंबरला फेसबुकने माझे ते संस्मरण पुनरमुद्रित कर...

एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात, दोन मजूर ठार.

Image
  ताडोबा बफर झोन क्षेत्रात   एकाच दिवशी वाघाच्या  हल्ल्यात, दोन मजूर ठार मूल (चंद्रपूर) दीपक देशपांडे. बांबू कटाईचे काम करताना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या पाऊण तासाच्या फरकाने झालेल्या वाघाच्या हल्ल्यात दोन मजूर ठार झाले. शनिवारी ताडोबाच्या बफर क्षेत्रातील मामला व महादवाडी परिसरात या घटना घडल्या. प्रेमसिंग दुखी उदे (वय ५५, रा. बालाघाट), बुदसिंग श्यामलाल मडावी (वय ४१, रा. मुंडला, बालाघाट) अशी मृतांची नावे आहेत. बफर क्षेत्रात बांबू कटाईचे काम सुरू आहे. वनविभागाने बालाघाट येथून कामासाठी मजूर बोलावले आहेत. काही मजूर महादवाडी बिटात तर काही मामला बिटात बांबू कटाईचे काम करत आहेत. मामला बिटातील कक्ष क्रमांक ३८१ मध्ये दुपारी ३.४५ च्या सुमारास बांबू कटाईचे काम करण्यात मग्न असलेल्या बुदशिंग श्यामलाल मडावी यांच्यावर अचानकपणे वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना ताजी असताना व याबाबत चौकशी सुरू असतानाच पाऊण तासाच्या फरकाने  या घटनास्थळापासून काहीच अंतरावर महादवाडी बफर झोन कक्ष क्रमांक ३५७ मध्ये प्रेमसिंग दुखी उदे यांच्यावर दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास वाघाने...

खलबत्ता -विनोद देशमुख,फक्त मतलबाच्या वेळीच आम्हाला आठवतं मराठी.

Image
खलबत्ता:-विनोद देशमुख. फक्त मतलबाच्या वेळीच आम्हाला आठवतं मराठी. -- पाटील सर आज थोडं उशिराच शाळेत पोहोचले. त्यांना आधी आपल्या नेहमीच्या चार-पाच विद्यार्थ्यांच्या टोळक्याशी बोलायचं होतं. परंतु, वेळ नसल्यामुळे ते थेट वर्गात गेले. नंतर मध्यंतरात शाळेच्या मैदानावरील कोपऱ्यात घोळका जमवून ते मुलांशी बोलू लागले... पाटील : मुलांनो, आपल्या गावच्या नगर परिषदेची निवडणूक झाली. आता जानेवारीत कोणती निवडणूक आहे, सांगा पाहू. चारही मुलं ओरडली : मोठ्या शहरांमधील महानगर पालिकांची. आपलं चंद्रपूर, नागपूर, अमरावती आणि अकोला या चार ठिकाणी विदर्भात निवडणूक होत आहे, गुरुजी. पाटील : यातील सर्वात मोठी महानगर पालिका कोणती आहे महाराष्ट्रात ? चंद्या : मुंबई आहे गुरुजी. मुंबई फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशात आणि आशिया खंडात सर्वात मोठी महानगर पालिका आहे. आकारानं आणि उत्पन्नातही. त्यांच्याकडं २२७ नगरसेवक आहेत आणि उत्पन्न जवळजवळ एक लाख कोटी रुपये आहे म्हणतात. पाटील : तुला बरीच माहिती दिसते... चंद्या : पण गुरुजी, नंद्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. सांग बे नंद्या. नंद्या : निवडणुकीचा विषय निघाला म्हणून सां...

खलबत्ता -विनोद देशमुख , युती झाली... युती‌ झाली...

Image
खलबत्ता:-विनोद देशमुख. युती झाली... युती‌ झाली... महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला आणि सत्तेवर पोहोचू न‌ शकलेला आंबेडकरवाद उत्तर भारतात यशस्वीपणे नेणारे आणि मायावतींना मुख्यमंत्रिपदी बसविणारे बसपानेते कांशीराम प्रारंभीच्या काळात युती संदर्भात एक गोष्ट आवर्जून सांगत असत. ते म्हणायचे- "बामसेफच्या कामासाठी एकदा मी नागपूर-विदर्भात आलो असताना रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मला सांगू लागले की, आमच्या पक्षाची कॉंग्रेसशी युती झाली आहे. मी विचारले- तुम्हाला किती जागा मिळाल्या ? उत्तर आले- एक जागा, उत्तर नागपूर विधानसभेची. किती जागांपैकी‌ एक ? तेव्हा ते म्हणाले- २८८ पैकी एक हे ऐकून मला फार वाईट वाटलं. फक्त एक (०.३४ टक्के) जागा पदरात पडल्यावरही आमचे आंबेडकरवादी कार्यकर्ते "युती झाली, युती झाली" म्हणत आनंद व्यक्त करीत असतील, तर आपलं राज्य येणार कसं ?" शेवटी कांशीरामांनी स्वत:चा बसपा हा पक्ष काढून‌ मायावतींना मुख्यमंत्री‌ बनवून दाखवलं, हा इतिहास आहे. अर्थात् युतीची ही पद्धत आता फार बदलली आणि तुल्यबळ, मोठ्या पक्षांच्या (तरीही छोट्या भावांचे हाल तसेच आहेत. उदा.- राष्ट्रीय लोकशाही ...

दिनविशेष. साने गुरुजी जन्मदिन

Image
दिनविशेष.  साने गुरुजी जन्मदिन                 पालगड हे ता. दापोली जि. रत्नागिरी जवळील दुर्गम भागातील गाव. इथे लोक आवर्जून भेट देतात कारण "जगाला प्रेम अर्पावे" म्हणत देशभरातील लोकांना सर्वच भाषा समजाव्यात.. त्यांचे एकमेकांशी हृदयस्थ नाते जोडले जावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या.. "बलसागर भारतासाठी" भूमिका मांडणाऱ्या पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्म झालाय (१८९९-१९५०). त्यांचे प्राथमिक शिक्षण येथेच झाले आणि जीवनातील अखेरच्या काळात वास्तव्यही झाले.*         *साने गुरुजी म्हणून जगाला त्यांची ओळख. अत्यंत कोमलहृदयी.. संवेदनशील.. निष्ठावंत व्यक्तीमत्व. त्यांच्या शब्दाशब्दातून मातृभूमिवर प्रेम व्यक्त होते. अत्यंत सुलभ भाषा.. समाजाविषयी कळवळा.. स्नेह.. प्रेम ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये. ज्या आईच्या संस्कारानी ते घडले, तिच्यावरचे लिहलेले 'श्यामची आई' हे बालसंस्कारी पुस्तक तर सदासर्वकाळ सर्वोत्तम पुस्तक ठरले आहे.*         *१९२४ साली एम.ए. झालेले गुरुजी अंमळनेरला शिक्षक आणि वसतीगृह प्रमुख झाले. पण नोकरी सोडून स्वातंत...