शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची अडतीसावी बैठक संपन्न .
शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची अडतीसावी बैठक संपन्न मूल ३०: दीपक देशपांडे. कृषी महाविद्यालय, मूल द्वारा आयोजित अडतीसावी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक २९ जानेवारी, २०२६ गुरुवार रोजी ग्राम बेलघाटा ता. मूल जि. चंद्रपूर येथे संपन्न झाली. याप्रसंगी कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे, प्रगतशील शेतकरी श्री रविंद्र गुरुनुले, जागृत ग्राहक राजा मूल तालुका शाखा पदाधिकारी श्री दिलीप उईके, इतर शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मुल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने “ उन्हाळी हंगामात विविध पिकांची लागवड व व्यवस्थापन ” या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी, शेतीत होणाऱ्या खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. उन्हाळी हंगामात पिकांची लागवड करताना योग्य वाणाची निवड करणे, पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. शेतीतील शाश्वत उत्पादनासाठी पारंपारिक पिकांसोबत फळझाडांची व भाजीपाला पिकांची लागवड करणे काळाची गरज आहे असे स...