Posts

Showing posts from July, 2025

मोठी बातमी. वाघाचा हल्ला! पुन्हा एकदा गुराखी जखमी.

Image
  मोठी बातमी. वाघाचा हल्ला! पुन्हा एकदा गुराखी जखमी. दीपक देशपांडे  मूल तालुक्यातील वेगवेगळ्या गावात वाघाच्या हल्यात गुराखी आणि शेतकरी शिकार वा जखमी झाल्याच्या बातम्या अर्धा पावसाळा संपत आला तरी काही संपता संपत नाही. काही वर्षांपूर्वी उन्हाळ्यात जंगलात पाण्याची कमतरता असते त्यामुळे व जंगलात वन्य प्राण्यांना शिकार मिळवणे दुरापास्त झाल्याने ते गावांकडे धाव घेत असल्याचे शासकीय पातळीवरून बोलले जात होते मात्र सध्या वर्तमानात बाराही महिने शेतकरी व गुराख्यांना जंगलातच नव्हे तर आपल्या शेतशिवारात सुद्धा भयभीत होऊन वावरावे लागते,व आपल्या जीवाची बाजी लावून शेतात जावे लागत आहे. अशाही स्थितीत भरदिवसा वाघाच्या हल्यात गुराखी आणि शेतकरी सापडतच असून त्याचाच एक भाग म्हणून आज मूल तालुक्यातील परशुराम मडावी राह.काटवन वय ६० वर्षे या इसमावर गाई ढोरं चारतांना आज दुपारी ३-४० ते ४वा.दरम्यान मौजा,काटवन च्या जंगलात वाघाने  हल्ला चढविला , या हल्ल्यात  तो जखमी झाला असून मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे. पुढील चौकशी सुरू आहे. जनता भयभीत असून एका नवीन उद्रेकाची ठिणगी ...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत मूल बसस्थानकाचे दूसरे मुल्यांकन

Image
  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत मूल बसस्थानकाचे दूसरे मुल्यांकन    मूल, दीपक देशपांडे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यातील बसस्थानकावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानात आज ३०जूलै रोजी ‘अ’ वर्गात येणाऱ्या चंद्रपूर विभागातील मूल बसस्थानकाचे सर्वेक्षण करून दूसरे मूल्यांकन करण्यात आले.  प्रादेशिक मूल्यांकन समितीमधील छ. संभाजी नगरच्या  प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक २च्या अनघा बारटक्के , अशोक  पन्हाळकर छ. संभाजी नगरचे प्रादेशिक अभियंता क्रमांक २, यांचे समवेत जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष व प्रवासी महासंघाचे अध्यक्ष, दीपक देशपांडे, तसेच दै. लोकमत समाचार चे मूलचे पत्रकार चंद्रकांत मनियार   यांच्या चार सदस्यीय समितीने मूलच्या  बसस्थानकाची पाहणी केली.  या अभियानात 'अ' वर्गातील बसस्थानकाचे चार वेळा मूल्यांकन होणार आहे.  आज या प्रादेशिक समितीतर्फे मूल बसस्थानकाचे द्वितीय मूल्यांकन करण्यात आले. यानं...

कृषी महाविद्यालय, मूलचे वतीने टेकाडी येथे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची एकतीसावी बैठक संपन्न.

Image
  कृषी महाविद्यालय, मूलचे वतीने टेकाडी येथे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची एकतीसावी बैठक संपन्न मूल २९: दीपक देशपांडे    कृषी महाविद्यालय, मूल द्वारा आयोजित एकतीसावी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक २९ जुलै, २०२५ रोजी ग्राम टेकाडी ता. मूल जि. चंद्रपूर येथे संपन्न झाली. याप्रसंगी कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे , प्रगतशील शेतकरी श्री मनोज चौधरी, श्री सुनील गेडाम, इतर शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने “खरीप पिकांमधील आंतरमशागतीचे नियोजन” या विषयावर चर्चा करण्यात आली.   महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी, उत्पादनवाढीसाठी खरीप पिकांमधील आंतरमशागत करण्याचे महत्त्व शेतकऱ्यांना  पटवून दिले. तसेच शेतीसोबतच शेती पूरक व्यवसाय जसे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय करणे सुद्धा महत्वाचे असल्याचे सांगितले. कृषी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या कृषिसंवादिनीबाबत सविस्तर माहिती दिली व विद्यापीठाचे तंत्रज्ञान असलेली कृषिसंवादिनी शेतकऱ्यांना माहितीकरिता ठेवावी अशी विनंती याप्...

आयुष्यातले सांगाती ...१८ शुभांगीताई भडभडे

Image
  आयुष्यातले सांगाती ...१८ शुभांगीताई भडभडे २५ जुलैच्या सकाळी साधारणतः साडे अकराच्या सुमारास शुभांगी ताई भडभडेंचा फोन आला. त्यांना माझ्याकडून काही माहिती हवी होती. ती माहिती शेअर केल्यावर मग इतर गप्पा सुरू झाल्या. (शुभांगीताईंचा फोन म्हणजे पंधरा मिनिटाची तर निश्चिंती असायचीच) या गप्पांमध्येच सध्या समाज माध्यमांवर मी चालू केलेल्या "आयुष्यातले सांगाती" या लेखमालिकेचा विषय निघाला." तुम्ही खरंच खूप छान आठवणी लिहीत आहात. तुमच्या पन्नास वर्षाच्या पत्रकारितेत अनेक मोठ्या व्यक्तींची तुमचा संबंध आला. त्या आठवणी तुम्ही सामान्यांपर्यंत पोहोचवता. ही खरंच चांगली बाब आहे. असेच नियमित लिहा आणि मग त्याचे आपण पुस्तक करूया. बाकी तुमच्या आठवणीला मला दाद द्यावीशी वाटते. अगदी पन्नास वर्षांपूर्वीचे संदर्भ सुद्धा तुम्ही काल घडले अशा थाटात लिहिता" असे सगळे सांगून शुभांगी ताईंनी माझे कौतुक केले. फोनवरचे बोलणे थांबवता थांबवता त्या एक वाक्य बोलल्या. "तुमच्या या लेखमालिकेत कधीतरी माझ्यावर सुद्धा लिहा, आणि हो, ते जिवंतपणेच लिहा. नाहीतर मी गेल्यावर लिहिले तर त्याचा काही उपयोग नाही. शुभांगी ...

मिशन आयएएसतर्फे Upsc/ Mpsc उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न.

Image
  मिशन आयएएसतर्फे  Upsc /  Mpsc उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थी  सत्कार सोहळा संपन्न. दीपक देशपांडे      खानदेशातून यूपीएससी व एमपीएससी झालेल्या तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मिशन आयएएस गिरणा परिसर  सत्कार सोहळा समन्वय समिती व पालक समिती धामणगाव तालुका चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने  सोहळा संपन्न झाला. दरवर्षी गिरणा परिसरातील  वेगवेगळ्या गावांमध्ये मागील ८ वर्षांपासून असे कार्यक्रम घेतले जात आहेत.   या कार्यक्रमास *मा डॉ उज्ज्वल कुमार चव्हाण (Ex IRS) , Adv मुंबई हायकोर्ट, मा श्री प्रकाश बाविस्कर उद्योजक व  चेअरमन, बाविस्कर गृप मुंबई, मा श्री नरेशचंद्र काठोळे ,संचालक मिशन IAS व  राजेंद्र इंगोले उपाध्यक्ष मिशन IAS अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रेरणादायी सोहळा पार पडला. यावेळी या वर्षी Upsc परीक्षा उत्तीर्ण झालेल्या धामणगावच्या सुकन्या *श्रीमती मोहिनी सूर्यवंशी (IPS), व यावल (आमोदा) येथील योगेश पाटील (IRMS)* यांचा सत्कार करण्यात आला.   गावातील सुकन्या  सौ. मोहिनी सूर्यवंशी यांनी UPSC  मध्...

माहेरातील लहानपणीची नागपंचमी.

Image
  माहेरातील लहानपणीची नागपंचमी विविधतेने नटलेल्या आमच्या भारतात विवीध प्रांतात विवीध सणवार, उत्सव अत्यंत श्रध्देने साजरे केले जातात.अलीकडच्या काळात काही गोष्टी मागे पडत चालल्या.कालबाह्य झाल्या असे वाटते.माझ्या लहानपणीची माहेरातील माझी नागपंचमी मला दरवर्षी आठवणीत घेऊन जाते.महाराष्र्टातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे-बोरगाव माझे माहेर.घरोघरी सणवार उत्साहाने साजरे केले जायचे. श्रावणात शेतात पिके उगवून धरती सगळीकडे हिरवाईने नटलेली ,श्रावणात पावसाची रिमझिम, वातावरण कसे उत्साहीत, आनंदी, प्रफुल्लीत  असायचे. नागपंचमीच्या सणाला मुलींमध्ये तर खूप उत्साह असायचा.नवविवाहीता  नागपंचमीच्या सणाला माहेरी आलेल्या असायच्या. नागपंचमी पासुन भगिंनीचे झिम्माफुगडी खेळ सुरु होतात ते गौरी पर्यंत रोज खेळले जायचे. नागपंचमीला मातीचा मोठा नागोबा घरी आणला जायचा.    आमच्या घरी मोठा मातीचा नागोबा आणि छोटे दोन नागोबा  निवृत्ती मामा आणून द्यायचे.मातीच्या नागोबाची पुजा केली जायची.शिवाय घरोघरी मातीच्या भिंती सारवुन नागोबा काढला जायचा.आमच्या घरी नागोबा भिंतीवर काढण्याचे  ( चिता...

दिनविशेष. नाग देवता पूजन आणि मंगळागौर पूजन.

Image
दिनविशेष. नाग देवता पूजन आणि मंगळागौर पूजन         आज श्रावणातील असा दिवस ज्याची वाट सर्वजण बघतात. आज नवविवाहितां पहिल्या मंगळागौर पूजनासाठी आतुर आहेत. तर आजच श्रावणातील पहिला मोठा सण नागपंचमी पण आहे. हा योग येणे हे भाग्यच.         भारतीय संस्कृतीच्या चालीरीती.. रुढी.. परंपरांचा उद्देश कुटुंबात.. समाजात एकोपा नांदावा हा आहे. आपल्या संस्कृतीत वैवाहिक जीवनाचा प्रारंभ होतो तो विधीवत लग्नाने. लग्नानंतर या नवदांपत्यांचे जीवन सुखी.. समृद्ध.. आनंदी व्हावे म्हणून सणासोबत आदर्शासाठी कथांचा आधार घेतला गेलाय.         संसारातील असेच प्रेमळ आदर्श जोडपे म्हणजे शंकर पार्वती. प्रेमाची परीक्षा होते ती कष्ट.. त्याग, तपश्चर्येत. याच उमाशंकराचे प्रेम नवदांपत्याला प्राप्त व्हावे म्हणून आहे हे मंगळागौर पूजन.         नवविवाहिता पतीला हृदयाच्या देव्हाऱ्यात ठेवून प्राणज्योतींनी मी आरती करीन असं म्हणत.. त्यासाठी मला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आशिर्वाद देण्याचं साकडे या मंगळागौर पूजेत देवीला घालणार.         'वसुधैव क...

कालचक्र पुण्यातल्या रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई सहभागी.

Image
 कालचक्र पुण्यातल्या रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई सहभागी पुण्याच्या खराडी परिसरात एका उच्चभ्रू इमारतीत सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर आज पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून एकुण सात जणांना अटक केली असल्याची माहिती माध्यमांवर येते आहे. विशेष म्हणजे त्या सात जणांमध्ये महाराष्ट्र विधानसभेतील माजी विरोधी पक्ष नेते, युती सरकारमधील माजी मंत्री, भाजपचे माजी नेते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे. प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत. खेवलकरांच्या नावानिशी वृत्त प्रसारित होताच राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.  प्रस्तुत छाप्यात या आरोपींसह फक्त मद्याच्या बाटल्याच नाही, तर कोकेन, गांजा यासारखे मादक पदार्थ, हुक्का इत्यादी साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणात आपला जावई खरोखरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी, आपण काहीही हस्तक्षेप करणार नाही असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्याचवेळ...

आज पहिला श्रावणी सोमवार .

Image
      आज पहिला श्रावणी सोमवार       ‼ *ॐ नमः शिवाय* ‼       *सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।*         *उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम् ॥१॥*         *परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम् ।*         *सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥*         *वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे ।*         *हिमालये तु केदारम् घुश्मेशं च शिवालये ॥३॥*         *एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः ।*         *सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥*         *...... शिवस्तोत्र*        *सनातन भारतीय संस्कृतीची साक्ष.. शिवाच्या बारा ज्योर्तिलिंगाची ही नावे असलेला हा श्लोक.*         *भक्तांचे दैवत म्हणजे भगवान भोलेनाथ. चातुर्मासातील हा श्रावण महिना शिव उपासनेचा. शिवाला प्रत्येक स्थानावर वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते.*   ...

पटतेय का बघा.... पार्किंग समस्येवर तातडीने तोडगा काढायलाच हवा.

Image
  पटतेय का बघा.... पार्किंग समस्येवर तातडीने तोडगा काढायलाच हवा. दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पार्किंगच्या वादावरून तलवारी निघाल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवर दाखवली गेली. रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेवर वाहन पार्क केले म्हणून तिथे फुटपाथवर धंदा करणाऱ्यांनी वाहनचालकावर तलवार उभारली होती. विशेष म्हणजे पार्किंग करू नको म्हणून तलवार उभारणारे तिथल्याच एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात होते.  सध्या हा प्रकार फक्त ठाण्यातच नाही तर सर्वत्र सुरू असल्याचे कानावर येत आहे. नुकताच म्हणजे ११ जुलै रोजी नागपुरातही एक असाच प्रकार घडला. त्यात मर्चंट नेव्हीत इंजिनियर असलेल्या एका तरुणाला आम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहोत असे सांगणाऱ्या दोन वकिलांनी दांडुक्याने मारहाण केली. त्यामुळे त्या तरुणाचा डोळा तर फुटलाच, पण डोक्यालाही इजा झाली होती.  ११ जुलै रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिंग रोडवर चौधरी लाईफ स्टाईल या मॉलच्या बाजूला मोकळ्या जागेत सौरभ सुरंगळीकर नामक मर्चंट नेव्हीतील तरुण इंजिनियर आपली कार पार्क करायला गेला. त्यावेळी बाजूलाच वकिलाचे कार...