आनंदवार्ता :-अखेर डोनी,गाव महसूल विभागाच्या मूल तहसील कार्यक्षेत्रात समाविष्ट!
आनंदवार्ता:- मोठी बातमी.
अखेर डोनी गाव महसूल विभागाच्या मूल तहसील कार्यक्षेत्रात समाविष्ट!
दीपक देशपांडे मूल.
आता शासनाने एक परिपत्रक काढून डोनी हे गाव मूल तालुक्यात समाविष्ट करण्यासाठी मान्यता दिली असल्याने शासनाच्या या निर्णयामुळे डोनीवासीयांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करीत धन्यवाद दिले आहेत व आनंद व्यक्त केला आहे.
बराच काळ प्रलंबित असलेला हा प्रश्न मूलचे तहसीलदार डॉ रविंद्र होळी यांच्या कार्यकाळात प्राधान्यक्रमाने शासन दरबारी पोहोचविण्यात आला आणि शासकीय स्तरावर महसूल विभाग बदलासाठी प्रक्रिया आरंभ झाली होती, शासनदरबारी सततचा पाठपुरावा केल्यानंतर, मागील वर्षी जिल्हाधिकारी यांचे उपस्थितीत चंद्रपूर व मूल तालुका प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवली व बऱ्याच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी डोनी वासियांना वेगवेगळ्या महसुली दाखल्याचे वाटप करण्यात आले होते, तेंव्हा डोनी गाव मूल तालुक्यात समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे ठरविण्यात आले होते,आज त्याचीच पूर्तता करीत तहसीलदार मृदूला मोरे यांच्या कार्यकाळात बोनी गाव मूल तालुक्यात समाविष्ट करण्यात आले त्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे कारण आँनलाईन शासकिय दस्तऐवज मूल तहसील कार्यालयातून मिळू लागले आहेत तर चावडीची कामे ,७/१२ व इतर दस्तऐवज लवकरच मूल तालुक्यातून मिळायला सुरुवात होणार आहे.
"शासकीय स्तरावरून सर्व दस्तावेज व कार्यभार मूल तालुक्यातील विविध विभागांकडे सोपविण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली असून चावडीची कामे,७/१२व इतर महसुली दाखलेही लवकरच मूल तालुक्यातून मिळायला सुरुवात होणार आहे.तुर्तास जात प्रमाणपत्र , उत्पन्न दाखला व इतर आँनलाईन दाखले मूल तालुक्यातून मिळायला सुरुवात झाली आहे," , मात्र इतर विभागांच्याही कामाच्या हस्तांतरणासाठी काही वेळ लागू शकतो परंतु प्रक्रिया प्रारंभ झाली आहे" हे खरे आहे असे मत नंदकिशोर कुंभारे,नायब तहसीलदार मूल यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले आहे.
डोनी हे गाव मूल तालुक्यात समाविष्ट झाल्याने या गावातील नागरिकांना सर्वप्रकारच्या शासकीय कामकाजाकरीता चंद्रपूर येथे जाण्याची व वेळ व पैसा वाया घालवण्याची आवश्यकता राहणार नसून , शासनाच्या इतरही विभागातील शासकीय कामे लवकरच मूल तालुक्यातून सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती लवकरच लवकर पूर्ण केली जावी अशी डोनीवासीय जनतेची मागणी आहे.
*दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक*
*✍️Ddbatmi@m2M✍️*
.jpg)
Comments
Post a Comment