Posts

Showing posts from October, 2026

स्पष्ट आणि परखड भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश नेतृत्वाने आता कठोर आत्मपरीक्षण करायला हवे...

Image
  स्पष्ट आणि परखड भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश नेतृत्वाने आता कठोर आत्मपरीक्षण करायला हवे... महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील पाच जागांसाठी झालेली निवडणूक आटोपली आहे. काल मतमोजणी पार पडली आणि सर्व निकालही जाहीर झाले आहेत. यात भारतीय जनता पक्षाला एक, शिंदे शिवसेनेला एक, काँग्रेसला एक आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. हे सर्व निकाल बघता राज्यात सत्यत असलेल्या महायुतीला आणि त्यातही सत्तेचे संचालन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जो काही फटका बसला तो बघता त्यांना कठोर आत्मपरीक्षणाची गरज आहे हे निश्चित.  भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत पाच पैकी तीन जागा लढवल्या होत्या. त्यात नागपूर पदवीधर पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक या तीन जागांचा समावेश होता. यातील फक्त पुणे शिक्षक हीच जागा भाजपला मिळवता आली आहे. उर्वरित नागपूर पदवीधर आणि पुणे पदवीधर या दोन्ही जागा भाजपने गमावल्या आहेत.  यातील पुणे पदवीधर मतदारसंघ आणि नागपूर पदवीधर मतदार संघ या दोन्ही आधी भाजपच्या खात्रीशीर जागा होत्या म्हटले तरी चालेल. नागपूरची जागा तर अगदी महाराष्ट्राचे गठन झाले तेव्हापासून आजच्या भारतीय...

मतपत्रिकेतही काँग्रेसची फजिती : लावला एक दिवा !

Image
  मतपत्रिकेतही काँग्रेसची  फजिती : लावला एक दिवा ! EVM fraud है... हिंमत है तो बॅलट पेपर फिरसे चालू करो... असं आव्हान वेळोवेळी सत्ताधारी भाजपाला देणाऱ्या कॉंग्रेसची मतपत्रिकेवरील विधान परिषद निवडणुकीतही दयनीय स्थिती झाली. 28 जागांमधील फक्त एक जागा (3.57 टक्के यश !) त्यांना कशीबशी मिळाली. देशाच्या मुख्य विरोधी पक्षाची लाज राखण्याचं हे कामही संघ मुख्यालय असलेल्या नागपूरनं केलं. खरं तर, अभिजित वंजारी यांनी लागोपाठ दुसऱ्यांदा हे करून दाखवून पक्षाला वाचवल्याबद्दल त्यांना कॉंग्रेसनं डोक्यावर घ्यायला पाहिजे. ते राहिलं बाजूला, काँग्रेसची नेतेमंडळी संघविरोधी टेंभा मिरवण्यातच मश्गुल आहे आणि वर समूह माध्यमांवर आपल्या प्रचारकांकडून विचारतही आहेत- "पंतप्रधान नरेन्द्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, भाजपाध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघांमध्ये भाजपाचा पराभव झाला, हे गोदी मीडिया लोकांना सांगत आहे का ?" अरे लेकहो, तुमच्या बुडाखाली काय अंगार लागली आहे ती आधी पाहा ना ! प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात झालेल्या पराभवानंत...

घ्या समजून राजेहो मल्लिकार्जुन खर्गे यांचे दर्जाहीन वक्तव्य

Image
 घ्या समजून राजेहो मल्लिकार्जुन खर्गे यांचे दर्जाहीन वक्तव्य काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील एक विधान सध्या प्रचंड वादग्रस्त ठरलेले आहे. त्यांच्या या विधानामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून ठिकठिकाणी खर्गे यांचे विरोधात आंदोलने सुरू आहेत, तर भाजपच्या सर्व राष्ट्रीय नेत्यांनी देखील खर्गे यांचा निषेध केला आहे. इतकेच काय पण खर्गे यांच्याच पक्षाचे एक ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील खरगेंच्या विधानाला असहमती दर्शवली आहे. बिहारमध्ये एका सभेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे यांनी सध्याच्या विरोधी पक्षांच्या कार्यक्रमानुसार मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर ज्ञानेश कुमारच काय पण मोदींनाही जावे लागेल असा दावा त्यांनी केला. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका मोदीप्रेमी नागरिकाने कुठून "मोदी कही नही जायेगा" असा आवाज दिला. हे ऐकताच खरगे संताप्त झाले आणि "मोदीही क्या मोदी का बाप भी जायेंगा" असे वक्तव्य त्यांनी ...

झाडाझडती ✍️विनोद देशमुख मोदींचा बाप आठवला ! स्वत:ची आई का नाही ?

Image
  झाडाझडती ✍️विनोद देशमुख मोदींचा बाप आठवला ! स्वत:ची आई का नाही ? आपले राजकीय नेते कृतिवीर कमी अन् वाचाळवीर जास्त होत चालले असल्याचं सध्या प्रकर्षानं जाणवत आहे. यात हा पक्ष की तो पक्ष, हा प्रश्न नाही. सर्वच पक्षांमधील नेत्यांची जीभ घसरण्यासाठी सारखी वळवळत असते, असाच अनुभव लोकांना वारंवार येत आहे. विरोधकांवर टीका करताना किमान भाषा तरी जपली पाहिजे, याचं भान नेत्यांनी ठेवणं अपेक्षित आहे. त्यातही, जास्त पावसाळे पाहणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांवरची जबाबदारी मोठी आहे. पण जेव्हा ज्येष्ठ मंडळीच वाटेल तसं बोलून जातात, तेव्हा नव्या पिढीला काय म्हणणार ? युवा नेत्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा ? अन् मग हा वाह्यातपणा खालपर्यंत झिरपत जाऊन वातावरण नासत जातं. नव्हे, आज ते पूर्णत: नासलेलंच आहे. याचं ताजं उदाहरण पाहा. सध्याच्या राष्ट्रीय राजकारणातील सर्वात ज्येष्ठ नेते (वय वर्षे 84), अर्धशतकापेक्षा जास्त काळ आमदार-खासदार-मंत्री राहिलेले, सध्याचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड्. मापन्ना मल्लिकार्जुन खडगे परवा असंच काहीतरी बोलून गेले. पाटण्याच्या सभेत त्यांनी पंतप्रधानांच...

माझंही मत बाळासाहेब आंबेडकरांनी अराजक निर्माण करणाऱ्या सूचना करू नये.

Image
  माझंही मत बाळासाहेब आंबेडकरांनी अराजक निर्माण करणाऱ्या सूचना करू नये. शेतकऱ्यांना आत्महत्या का करता? त्यापेक्षा दहा-बारा पुढार्‍यांना मारा, अशा आशयाचे विधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, माजी खासदार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आणि जनसामान्यांमध्ये देखील चर्चा सुरू झाली आहे. भारतासारख्या लोकशाही देशात बाळासाहेबांना आता जंगल राज आणायचे आहे काय असा प्रश्न देखील विचारला जाऊ लागला आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या देशात शेतीचा व्यवसाय हा तोट्यात चालला आहे हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळेच गेल्या जवळजवळ  वर्षांपासून महाराष्ट्रात त्यातही विदर्भात शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. त्यांच्या आत्महत्यांमागे नापीकी, त्यानंतर शेतमालाला योग्य असा भाव न मिळणे, परिणामी शेती व्यवसाय तोट्यात जाणे आणि शेतकरी कर्जबाजारी होणे ही प्रमुख कारणे आहेत. या कारणांवर उपाय शोधून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न आतापर्यंत प्रत्येक सरकारने केल्याचे दाखवले जरूर, मात्र आत्महत्या क...

खलबत्ता:- अराजकाचे हमीपत्र ?

Image
  अराजकाचे हमीपत्र ? दोनशेवर राष्ट्रांचा समूह असलेल्या जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता ? तर, आपला भारत (148 कोटी). सर्वात  मोठा लोकशाही देश कोणता ? तर, पुन्हा भारतच. लोकशाहीची, कायद्याच्या राज्याची सर्वाधिक थट्टा करणारा देश कोणता ? तोही भारतच ! लोकशाहीच्या नावाखाली जेवढे अपप्रकार आपल्याकडे चालतात, तेवढे जगातल्या दुसऱ्या कोणत्याही देशात पाहायला मिळत नसावेत. येथे लोकशाहीच्या नावाखाली घराणेशाही अनेक ठिकाणी सुखाने नांदत आहे. कायदा सर्वांसाठी समान असल्याचे भासवले जाते; पण तो तसा नाही. All are equal, but some are more equal हाच अनुभव भारतीय जनता गेली पाऊणशे वर्षे घेत आहे. त्यामुळे लोकांमधील आर्थिक, सामाजिक, धार्मिक दरी फक्त कायमच नसून, उलट ती वाढत असल्याचेच दिसत आहे. तरीही मेरा भारत महानच आहे ! या महान भारतात कायद्याची अंमलबजावणी सर्वसमान होते, असं म्हणता येण्यासारखी परिस्थिती‌ दिसत नाही. काही लोक पैशाच्या जोरावर कायदा स्वत:ला पाहिजे तसा वाकवून घेतात. तर, इतर काही गट राजकीय वजन वापरून‌ किंवा दादागिरीच्या मार्गाने‌ बेकायदा कामे करून घेतात. खऱ्या अर्थाने कायद्यांचा लाभ मध्यमवर्ग...

कालचक्र फारुख अब्दुल्लांचे देशद्रोही विधान गांभीर्यानेच घ्यायला हवे..

Image
कालचक्र  फारुख अब्दुल्लांचे देशद्रोही विधान गांभीर्यानेच घ्यायला हवे.. काश्मीरचा शेजारी पाकिस्तान ठिकठिकाणी जाऊन काश्मिरी नागरिकांचा आवाज उठवत आहे, त्यामुळेच जम्मू-काश्मीरा तील लोकांचे जीव वाचत आहेत, आपल्या काश्मिरी नागरिकांबाबत भारताचा हेतू योग्य नाही, असा दावा करत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष तथा जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी नवा वाद उभा केला आहे. बारामुल्ला येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषण करताना त्यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. सहाजिकच त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी भाजपसह विविध भारतप्रेमी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर हा भारताचा भाग नसून तो पाकिस्तानचाच भाग आहे असे मानणारा एक फार मोठा वर्ग पाकिस्तानात आजही अस्तित्वात आहे. फारूक अब्दुल्ला हे याच मंडळींचे नेतृत्व करणारे नेते आहेत. फारूक अब्दुल्लाच काय पण त्यांचे वडील शेख अब्दुल्ला किंवा त्यांचे चिरंजीव ओमर अब्दुल्ला हे देखील याच भूमिकेचा पाठपुरावा करत असतात. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळून आता ८०वर्षे व्हायला आली आहेत, मात्र काश्मिरातील काही वर्ग अजूनही भावनिकदृष्ट्या भारता...

माझंही मत काँग्रेसच्या रामलीला मैदानावरील रॅलीने नवे मुद्दे उपस्थित होणार..

Image
  माझंही मत काँग्रेसच्या रामलीला मैदानावरील रॅलीने नवे मुद्दे उपस्थित होणार.. १ नोव्हेंबर २०२६ रोजी काँग्रेस पक्षाने दिल्लीतील रामलीला मैदानावर व्होट बचाओ, देश बचाओ रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीला दिल्लीतील रामलीला मैदान परिसरातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. ही रॅली दिवाळीनंतर घेण्यात यावी अशी विनंती व्यापाऱ्यांनी केली आहे. याला कारण म्हणजे रॅली झाल्यास त्या दिवशी त्या भागातील वाहतूक पूर्णतः विस्कळीत होईल, दिवाळीचा मोसम असल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात येतात, त्यांना दुकानात येण्यास अडचण होईल आणि परिणामी व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, असा व्यापाऱ्यांचा दावा आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक दिवस जर व्यापार बंद राहिला तर त्या काळात दहा हजार कोटीची उलाढाल थंडावेल. त्यामुळेच व्यापाऱ्यांचा रॅलीला विरोध आहे. मात्र लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी १ नोव्हेंबरलाच रॅली घेण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता नवा संघर्ष उपस्थित होईल काय असे चित्र दिसत आहे. सध्या काँग्रेस पक्षाचे निवडणूक आयोगाविरुद्ध दंड थोपटले आहेत. त्यांच्या मते देशात जी म...