Posts

Showing posts from July, 2026

माझंही मत विदर्भ साहित्य संघात आता सर्व व्यवहार पारदर्शी पद्धतीने व्हावे..

Image
  माझंही मत  विदर्भ साहित्य संघात आता सर्व व्यवहार पारदर्शी पद्धतीने व्हावे.. अखेर विदर्भ साहित्य संघाची या वर्षाची वार्षिक आमसभा रविवार दिनांक २६ जुलै रोजी पार पडली. ही सभा वादळी होणार असे भाकीत एका स्थानिक वृत्तपत्राने केले होते. मात्र वादळ तर सोडा पण साधी हवेची झुळूकही तिथे आली नाही, हे विशेष. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली.  साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांची तब्येत ठीक नसल्यामुळे कदाचित ते बैठकीला उपस्थितही राहणार नाहीत अशी शक्यता कार्यकारणीतीलच एक सदस्य बोलून दाखवत होते.. त्यामुळे माझ्यासारख्या अनेक पत्रकारांनाही ती शक्यता वाटत होती. मात्र सर्वांचे अंदाज खोटे ठरवत गिरीश भाऊ बैठकीला उपस्थित राहिले आणि त्यांनी अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये धडाकेबाज बॅटिंग करावी तसे सर्व विरोधकांचे प्रश्न सहज  टोलवले.  माझी तब्येत बिघडली होती हे मलाच माहीत नव्हते, असा दावाही गिरीशभाऊंनी या बैठकीत बोलताना केल्याची माहिती आहे. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी गिरीश भाऊंनी मला फोन करून देखील माझी तब्येत बिघडलेली नाही अशी माहिती दिली, आणि माझी तब्येत बिघडल...

मा. आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त मूल शहरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

Image
मा. आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त मूल शहरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन मूल, दीपक दे  शपांडे. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, चंद्रपूर जिल्ह्याचे विकासपुरुष तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या  दि.३०/०७/२०२६रोजी भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा, भाजपा महिला मोर्चा, विविध भाजपा आघाड्या व सेल, तसेच भाजपाचे पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख आणि विविध आघाड्यांचे प्रमुख यांच्या संयुक्त विद्यमाने मूल शहरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांची सुरुवात सकाळी ६.०० वाजता युवा मॅरेथॉन, ६.१५ वाजता महिला मॅरेथॉन आणि ६.३० वाजता युवती मॅरेथॉन यांनी होणार आहे. त्यानंतर सकाळी ८.०० वाजता सिद्धिविनायक मंदिर, मूल येथे भजन व आरती आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सकाळी १०.०० वाजता शालेय साहित्य वाटप, दुपारी १२.०० वाजता रामलीला सभागृह, मूल येथे आधार काठी वाटप, गुणवंत विद्यार्थी सत्कार, रक्तदान शिबिर, तसेच रक्त, बी.पी. व शुगर तपासणी शिबिर आयोजित...

आठवणींच्या हिंदोळ्यावर १०... आठवणी लक्ष्मणराव जोशींच्या...

Image
  आठवणींच्या हिंदोळ्यावर १०... आठवणी लक्ष्मणराव जोशींच्या... आज सकाळीच पत्रकार मित्र विनोद देशमुख याचा फोन आला‌."अविनाश लक्ष्मणराव जोशींची तब्येत क्रिटिकल आहे, ते विवेकानंद नगरच्या स्वास्थ्यम् हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत."  ही बातमी कळल्यावर आज दुपारीच त्यांना स्वास्थ्यम् हॉस्पिटलमध्ये भेटायला जाऊया असा विचारही केला. मात्र दुपारी बारापासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे तो बेत थोडा पुढे ढकलला गेला.  ...आणि अचानक दुपारी सव्वादोन च्या सुमाराला व्हाट्सअप ग्रुप वर सुधीर पाठक ची लक्ष्मणराव जोशी यांना देवाज्ञा झाल्याची बातमी वाचली. महाराष्ट्रातला एक ज्येष्ठ पत्र महर्षी आपल्याला सोडून गेल्याचे दुःख झाले.  लक्ष्मणरावांचा आणि माझा जवळजवळ ५४ वर्षांपासूनचा संबंध, १९७२ मध्ये मी फ्रीलान्स फोटोग्राफर म्हणून प्रेस फोटोग्राफी करू लागलो. त्यावेळी फोटो काढून मी वेगवेगळ्या वृत्तपत्रात नेऊन देत असे. तिथेच तरुण भारतात लक्ष्मणरावांची माझी भेट झाली. त्यावेळी ते मुख्य वार्ताहर होते. नंतर घरी आल्यावर ते आपल्या दूरच्या नात्यातही आहेत असेही कळले. तेव्हापासून सतत संबंध येतच राहिला. आज लक्ष्मणरांच...

लक्षवेधी:-खुलासा.... मूल नगर परिषद, मूल.

Image
लक्षवेधी:- खुलासा.... मूल नगर परिषद, मूल. दीपक देशपांडे  मागील काही दिवसांपासून मूल शहरांत नगरपरिषद कार्यपद्धतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून प्रसारमाध्यमे आणि विरोधकांनी सत्तारुढ पदाधिकारी यांच्या विरोधात जणू एक मोहीम उघडली असून रोज एक नवीन विषय चर्चेला येत आहे,या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा एकता समर्थ यांचे वतीने त्यांचे पती बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी एक खुलासा प्रसिद्धी माध्यमांकडे व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठविला आहे आणि हाही एक स्वतंत्र चर्चेचा विषय ठरला असून यावरुन ही नवीन चर्चेला उधाण आले आहे. खरं तर आम्ही ह्या विषयावर लेखन केलेच नव्हते पण हा खुलासा आल्याने जनतेच्या मनातील प्रश्न आणि सत्ताधारी गटाचे नेतृत्व करणाऱ्यांचे मत यांची सांगड घालण्याचा हा लक्षवेधी प्रयत्न. काय आहे या खुलाशात ?असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे तर मग हा खुलासा असा.... प्रेसनोट. १५ व्या वित्त आयोगांतर्गत घनकचरा व्यवस्थापन निविदेबाबत वस्तुस्थिती व तथ्यांचा खुलासा सध्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीअंतर्गत मूल शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेबाबत काही प्रसारमाध्यमे व सामाजिक...

कालचक्र नीट परीक्षा घोटाळ्याचा अन्वयार्थ

Image
  कालचक्र  नीट परीक्षा घोटाळ्याचा अन्वयार्थ यावर्षी "नीट" परीक्षा नीटनेटकी पार पडली नाही. त्यात पेपर फुटीचे प्रकरण झाले. त्यावरून विद्यार्थ्यी नाराज झाले. त्यांचे आंदोलन राजकारण्यांच्या हातात गेले आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला गेला. त्यासाठी दिल्लीतही हिंसाचार झाला. देशभर आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न झाला. शेवटी धर्मेंद्र प्रधान यांनी काल आपला राजीनामा सादर केला आहे. मात्र या आंदोलनातून आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यामुळे परीक्षाग्रस्त विद्यार्थ्यांना नेमके काय मिळाले हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे. या आंदोलनाच्या आडून राजकारण्यांनी आपले राजकारण साधून घेतले. आपल्या देशात अस्थैर्य आणि अराजकता वाजवण्यासाठी परकीय शक्ती सक्रिय आहेत असे बोलले जाते. याला पुष्टी मिळावी अशा पद्धतीने परदेशातून एक भारतीय भारतात पाठवला गेला आणि त्याने जेन झी चे नेतृत्व केले‌ वस्तूतः परदेशात बसून कॉक्रोच जनता पार्टी गठीत करणाऱ्या अभिजीत दिपकेचा नीट परीक्षेशी अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. मात्र त्याने अमेरिकेतून भारतात येऊन आंदोलनाचे नेतृत्व केले. त्याचा येण्...

पटतंय का बघा....! डॉ. गिरीश गांधी.. संकुल प्रकरणात श्वेतपत्रिका काढण्याची आज घोषणा करा..

Image
  पटतंय का बघा....! डॉ. गिरीश गांधी.. संकुल प्रकरणात श्वेतपत्रिका काढण्याची आज घोषणा करा.. आज दुपारी एक वाजता विदर्भ साहित्य संघाची वार्षिक आमसभा होऊ घातली आहे. साहित्य संघातील म्हैसाळकर युग संपून गांधी युग सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच आमसभा असेल. त्यामुळे इथे काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  विदर्भ साहित्य संघात आणि त्या योगे विदर्भाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वर्तुळात सध्या एकच मुद्दा गाजतो आहे, तो म्हणजे साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलाचा. नुकतेच विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिक नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी नागपुरात एका पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना विदर्भ साहित्य संघ आता जुना राहिला नसून त्याचा मॉल झाला आहे अशी खंत व्यक्त केली होती. जाहीररीत्या कुळकर्णींनी अशी खंत व्यक्त करावी याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. आजच्या बैठकीत हे मुद्दे उपस्थित होतील याबद्दल शंका नाही.  विदर्भ साहित्य संघाची झाशी राणी चौकातील जुनी इमारत हे नागपूरचेच नव्हे तर विदर्भाचे एक सांस्कृतिक वैभव होते असे म्हटल्यास वावगे ठरु नये. १९९५ मध्ये ही इमारत पाडली गेली, आणि गेल्या ३१ वर्षात ही...

सहज सुचलं म्हणून... प्रकाशित साहित्याचे परिक्षण वृत्तपत्रात यायलाच हवे...

Image
  सहज सुचलं म्हणून... प्रकाशित साहित्याचे परिक्षण वृत्तपत्रात यायलाच हवे... नुकतेच माझ्या म्हणजेच अविनाश पाठक लिखित "आयुष्यातले सांगाती" भाग १,२, आणि ३ या तीन पुस्तकांचे माजी राज्यपाल आणि भारतीय विद्या भवन चे राष्ट्रीय अध्यक्ष बनवारीलालजी  पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन पार पडले. यावेळी बोलताना बनवारीलालजी पुरोहित यांनी चांगल्या साहित्याची दखल घेत सर्व वृत्तपत्रांनी त्यावर समीक्षणे प्रकाशित करायला हवीय, अशी अपेक्षा व्यक्त केली.  पुरोहित यांची ही अपेक्षा अगदी रास्तच म्हणावी लागेल. मात्र आजच्या काळात वृत्तपत्रात बातम्या आणि लेख यांच्यापेक्षा जेव्हा जाहिरातींना जास्त महत्त्व आले आहे. त्या परिस्थितीत या समीक्षणांना जागाच दिली जात नाही असे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. विशेषतः मोठ्या राज्यव्यापी वृत्तपत्रांमध्ये तर आता कशाला पाने वाया घालवायची अशीच भूमिका घेतलेली दिसून येते. त्यामुळे पुरोहित यांची ही अपेक्षा आजची वृत्तपत्रे कितपत पूर्ण करतील हा देखील प्रश्नच आहे.  मला आठवते, जुन्या काळात प्रत्येक वृत्तपत्रात नव्या पुस्तकांचे परीक्षण किंवा परिचय दिला जात असे. त्...

दिनविशेष :- आज आषाढी एकादशी पंढरीच्या वारीत स्मरण होणाऱ्या संतकथा

Image
      दिनविशेष :- आज आषाढी एकादशी         पंढरीच्या वारीत स्मरण होणाऱ्या संतकथा         *संत कृपा झाली ।*         *इमारत फळा आली ।*         *ज्ञानदेवे रचिला पाया ।*         *भारिले देवालया ।*         *नामा तयाचा किंकर ।*         *तेणे विस्तरिले आवार ।*         *जनी जनार्दन एकनाथ ।*         *स्तंभ दिला भागवत ।*         *तुका झालासे कळस ।*         *भजन करा सावकाश ।*         *बहिणा फडकती ध्वजा ।*         *तेणे रूप केले ओजा ॥*        जगात सचोटी.. परस्परावरील विश्वास.. श्रद्धा याचा लोप होत असताना आज पंढरीत पापभीरू सश्रद्ध भक्तांची भगव्या पताका फडकवणारी प्रचंड निशस्त्र सेना जमलीय. या गर्दीची कुणाला भीती नाही. सुखोपभोग सारत वायूवेगाने धावणाऱ्या जगात निसर्गाशी मैत्री करत शेकडो कि.मी. पायी चालणाऱ्यांच्या श...

आठवणींच्या हिंदोळ्यावर..९. किस्सा विदर्भ साहित्य संघातील सहा आजीवन सदस्यांच्या निष्कासनाचा.

Image
  आठवणींच्या हिंदोळ्यावर..९. किस्सा विदर्भ साहित्य संघातील सहा आजीवन सदस्यांच्या निष्कासनाचा गेल्या काही महिन्यांपासून विदर्भातच विदर्भ साहित्य संघ, त्याची निवडणूक, नवीन कार्यकारिणी, , जुन्या भानगडी आणि अर्धवट असलेले संकुल या विषयाची चर्चा साहित्य वर्तुळात आणि सामान्य नागरिकांमध्ये देखील रंगते आहे. आता येत्या रविवारीच साहित्य संघाची वार्षिक आमसभा आहे. त्यामुळे तर या चर्चांना जास्तच जोर चढला आहे.  विदर्भ साहित्य संघाचे अर्धवट असलेले संकुल आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या यावर सध्या जोरात चर्चा सुरू आहे. ती चर्चा काही आजची नाही‌. या प्रकरणात २००२ साली साहित्य संघाच्या काही आजीवन सदस्यांनी जोरदार आवाज उठवला होता. त्यात अस्मादिक देखील होते. विशेष म्हणजे या प्रकारात सहा  आजीवन सदस्यांना कायमचे निष्कासित करण्यात आले होते. त्यातही मी देखील होतो. त्यामुळे आज त्या काळातल्याच आठवणी शेअर करायचे ठरवले आहे.  विदर्भ साहित्य संघाचा मी आजीवन सदस्य १९८३ मध्येच झालो होतो. त्यावेळी विदर्भ साहित्य संघात मी अधून मधून जात देखील असे. तिथल्या अनेक पदाधिकाऱ्यांशी माझे व्यक्तिगत मैत्रीचे ...