महाब्रेकिंग:- खड्डे / स्वच्छता आता लोकसेवा अधिनियमाच्या अंतर्गत !

 महाब्रेकिंग:-

खड्डे / स्वच्छता आता लोकसेवा अधिनियमाच्या अंतर्गत !

दीपक देशपांडे 

रस्त्यावरील खड्डे, गटारांची झाकणे तसंच स्वच्छतेबाबतच्या तक्रारी आता लोकसेवा अधिनियमाच्या अंतर्गत ! निपटारा करण्यासाठी कालमर्यादा विहित !!

खड्डे / स्वच्छता आता लोकसेवा अधिनियमाच्या अंतर्गत !

 ```लोकसेवा अधिनियमाच्या अंतर्गत शासनाने तीन सेवांचा समावेश केला असून संबंधित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी कालमर्यादा विहित केली आहे. त्यानुसार, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आणि गटारांना झाकणे बसवणेबाबतच्या तक्रारींचा निपटारा ५ दिवसांत करणं बंधनकारक आहे; तर स्वच्छतेबाबतच्या तक्रारींचा निपटारा एका दिवसात करणं बंधनकारक असणार आहे. सदर बाबतचा शासननिर्णय नगरविकास विभागाने २७ नोव्हेंबर २०२४ रोजी जारी केला आहे.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग

महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतीकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५. या कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पादरर्शक, गतिमान व कालवध्द सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरीता महाराष्ट्र सेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली.

या कायद्याअंतर्गत कोणत्या सेवा नागरिकांना प्राप्त करून घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे, ही माहिती आपण “आर.टी.एस. महाराष्ट्र” या मोबाईल ॲप वर किंवा “आपले सरकार वेब पोर्टल” वर पाहू शकता. सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसताना सेवा नामंजूर करण्यात आली तर नागरिक प्रथम/ द्वितीय अपील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व तिसरे आणि शेवटचे अपील आयोगाकडे दाखल करू शकतात.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.