अहंकाराला कर्माची फुंकर!

 अहंकाराला कर्माची फुंकर!

सुधीर मुनगंटीवारांचा सलग सातव्यांदा विजय!



बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपा महायुतीचे उमेदवार, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २६०४७ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला असून ते सातव्यांदा विधानसभेत पोहोचले आहे. सातव्यांदा विधानसभेत निवडून जाणारे ते एकमेव उमेदवार आहे. 

सलग सात वेळ विधानसभा निवडणुकीत विजयी होणारे ते  विदर्भातील एकमेव आमदार असून त्यांच्या विजयाचा उंच आलेख आहे.


सन्मान आणि पुरस्कार

मंत्री पदाच्या काळात राज्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा उत्कृष्ट आमदार पुरस्कार, राज्याच्या आर्थिक प्रगती मध्ये बहुमोल योगदान दिल्या बद्दल त्यांना इंडिया टुडे समूहातर्फे देशातील बेस्‍ट फायनान्‍स मिनीस्‍टर या पुरस्‍काराने सन्मानित करण्यात आले. आफ्टरनून व्हॉइस या वृत्त संस्थेतर्फे बेस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर, लोकमत चा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर, जेसीआय चा मॅन ऑफ द इयर अशा अनेक प्रतिषठेच्या पुरस्कारांनी सुधीर मुनगंटीवार यांना सन्मानित करण्यात आले.वनमंत्री पदाच्या काळातील त्यांच्या पुढाकाराने झालेल्या विक्रमी वृक्ष लागवडीची नोंद गिनीज बुक तसेच लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली.

विधानसभेतील यशस्वी संसदीय संघर्ष

राज्यात १९९९, २००४, २००९ असे पंधरा वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते तरी विधानसभेत विविध संसदीय आयुधांचा वापर करत  केवळ चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला भाग पाडले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव नागपूर विद्यापीठाला देणे, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचे नाव अमरावती विद्यापीठाला देणे, सवित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देणे, गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती, मातंग समाजासाठी आयोग नेमणे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वारसाना नोकऱ्या, भिडेवाड्याची दुरुस्ती, आदिवासी समाजासाठीची प्रलंबित पदभरती, क्रांतीवीर बाबुराव शेडमाके, संत संताजी जगनाडे महाराजांच्या स्मृत्यर्थ टपाल तिकीट प्रकाशित करणे असे अनेक निर्णय त्यांच्या संसदीय संघर्षातून घेण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्याचा चौफेर विकास

चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी अभूतपूर्व असा निधी अर्थमंत्री पदाच्या काळात त्यांनी खेचून आणला. सैनिक शाळा, वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बॉटनीकल गार्डन, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, चिंचडोह प्रकल्प, कोटगल बॅरेज, पळसगाव आमडी सिंचन प्रकल्प, चिंचाळा व सहा गावांसाठी पाईप लाईन द्वारे सिंचन सुविधा, मौलझरी सिंचन प्रकल्प, रस्ते व पुलांची सर्वाधिक कामे,एसएनडिटी महिला विद्यापीठाचे उपकेंद्र अशी विकासाची मोठी मालिका त्यांनी तयार केली. शिक्षण, आरोग्य, रोजगार, कृषी,सिंचन,पायाभूत सुविधा या क्षेत्रात चौफेर विकास त्यांनी केला.

गोंडवाना विद्यापीठातर्फे डि लीट ने सन्मानित

नुकतेच काही महिन्यापूर्वी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठातर्फे त्यांना मानद डॉक्टरेट अर्थात डी लिट पदवी देत त्यांना सन्मानीत करण्यात आले. सुधीर मुनगंटीवार हे नाव राज्याच्या विधानसभेला, महाराष्ट्राच्या राजकारणाला सुपरिचित आहे. आमदार म्हणून सातव्यांदा विजयी झाल्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

पहिल्या फेरीपासून आघाडी,राड्याचा विपरीत परिणाम?

दिनांक २३नोव्हेंबर रोजी मूलच्या प्रशासकीय भवन परिसरात मतमोजणी सुरू झाली आणि जसा पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आणि सुधीर मुनगंटीवार यांनी आघाडी घेतली ती अगदी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली, आणि त्यामुळे जनतेच्या आशा आकांक्षा वाढल्या होत्या आणि मूल शहरातील मतमोजणीचा निकाल हाती येताच तर उत्साहाला उधाण आलेले आणि विजयोत्सवाला सुरुवात झाल्याचा अनुभव मूल शहराने घेतला, जणूकाही सारी दारोमदार या मूल शहरावरच होती, आणि हे वास्तवही होते कारण निवडणूक प्रचारादरम्यान मूल शहराने अनुभवलेल्या राड्यानंतर जनमत कलुषीत करण्याचा जो प्रयत्न केला गेला होता तो जनतेच्या वर्मी लागला आणि जनतेने त्याला योग्य प्रत्युत्तर दिले आणि आमचा घात केला अशी कबुली विरोधकांच्या गोटातूनच बाहेर आली.

लाडक्या बहिणींनी दाखविलेला विश्वास कायम राखण्यासाठी त्यांची वहिणी तुमच्या सेवेत असेल हा विश्वास.

या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी दाखविलेला विश्वास कायम राखण्यासाठी त्यांची वहिणी त्यांच्या साठी इथे सतत उपलब्ध असेल आणि तुमच्या समस्यांची योग्य दखल घेतली जाईल असा विश्वास त्यांनी विजयी मिरवणूकीचा समारोप करताना स्थानिक गुजरी चौकात लाडक्या बहिणींना दिला आणि नारेबाजीने परिसर निनादून गेला.

आजपर्यंत केला नाही तेवढा विकास करण्याची हमी 

विरोधकांच्या विकासाच्या परिभाषेवर भाष्य करताना विरोधकांना चिमटे काढत जनतेसाठी आजवरच्या १५वर्षात झाला नसेल तेवढा विकास करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली, आणि पुन्हा एकदा परिसर निनादून गेला. सगळ्यांचेच आभार व्यक्त केले, अभिनंदन केले व हा विजय माझा नसून तो समस्त , मतदार , कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्षाचे नेतृत्व व महायुतीच्या विविध योजनांची फलश्रुती असल्याचे स्पष्ट केले.

जनतेने मात्र विरोधकांच्या अहंकाराला ही  कर्माची फुंकर! असल्याचे मत व्यक्त केले.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.