शाळेच्या सहलीला जाण्यापूर्वी हे जाणून घेणे आवश्यक!
शाळेच्या सहलीला जाण्यापूर्वी हे जाणून घेणे आवश्यक!
शासनाची नवी नियमावली, खासगी वाहनाने सहल नेण्यास बंदी
नागपूर,दीपक देशपांडे
साधारणतः डिसेंबर -जानेवारी महिन्यात शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येते त्यात,
प्रामुख्याने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक भौगोलिक आणि सांस्कृतिक व शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येते. या सहलींचे आयोजन करण्यापूर्वी विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने हा शासनाने काही नियम ठरवून दिलेले आहेत.
हे आदेश काय आहे, आपल्या पाल्याची सुरक्षा कशी करता येईल यावर उपाययोजना सूचवल्या आहेत.
सर्व माध्यमाच्या तसेच सर्व मंडळाशी संबधीत शाळातील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे, भौगलिक, सांस्कृतीक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यास मिळाव्यात व त्यांची माहिती मिळावी यासाठी शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येत असते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करताना खालील प्रमाणे दक्षता घेण्यात यावी असे आदेश नागपूरच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी काढले आहेत. हे आदेश काय आहे, आपल्या पाल्याची सुरक्षा कशी करता येईल यावर उपाययोजना सूचवल्या आहेत.
अशी आहे नवी नियमावली. एका वर्षात एकच शैक्षणिक सहल आयोजित करण्यात यावी. विद्यार्थ्यांना सहलीला येण्याची सक्ती करण्यात येवू नये. विद्यार्थी व पालकांचे संमती पत्र घेण्यात यावे, तसेच सहभागी विदयार्थ्यांची यादी व संपर्क क्रमांक सोबत संलग्न करण्यात यावा. शाळा व्यवस्थापन समिती शाळा समिती यांच्या समंतीच्या ठराव घेवूनच सहलीचे आयोजन करण्यात यावे. सहलीसाठी १० विदयार्थ्यांसाठी एक या प्रमाणात शिक्षकांची संख्या असावी. विद्यार्थ्याच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी संबंधीत विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सहलीतील सर्व शिक्षक यांची राहील. सहलीस विद्यार्थिनींचा सहभाग असल्यास महिला शिक्षिका सोबत असणे अत्यावश्यक राहील. सहल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसनेच नेण्यात यावी. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी जादा शुल्क आकारू नये.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment