विकासकामे आणि कल्याणकारी योजनांमुळे अभुतपुर्व यश.काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

 महाब्रेकिंग:-

विकासकामे आणि कल्याणकारी योजनांमुळे अभुतपुर्व यश:- काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.



दीपक देशपांडे 

केंद्राच्या सहकार्याने आणि सहकाऱ्यांच्या पाठबळावर आम्ही  महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारने थांबविलेली कामे आम्ही पूर्णत्वास नेली  आणि विकासगंगा  राबविली आणि कल्पयाणकारी  योजना राबविण्यात आलेले यश रिणामी लाडक्या बहिणींनी दाखविलेला विश्वास यांमुळे जनतेचा सहकारी म्हणून केलेली कामे आमच्या यशाची मुळ संकल्पना म्हणून आम्ही स्विकारलेला आहे.

केंद्र जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे.आम्ही कोणत्याही प्रकारची अट ठेऊन सरकार स्थापन करण्यात आडकाठी निर्माण करणार नाही अशी स्पष्टोक्ती त्यांनी या पत्रपरिषदेत बोलताना दिली.

सतत कार्यरत राहून जनतेत लाडका भाऊ म्हणून मिळालेली ओळख आयुष्यात फार मोठी देण असून C.M म्हणजे Common man सर्वसाधारण माणूस म्हणून आम्ही जनतेसाठी जनतेतील एक होऊन लाडका भाऊ आणि लाडकी बहिण ,लाडका शेतकरी, आणि विकासकामे व इतर सर्व योजना आम्ही यशस्वीपणे राबविल्या आणि कल्याणकारी योजनांमुळे एक नवीन कार्यप्रणाली विकसित केली, त्यामुळे महायुती सरकार स्थापन करायचे आहे आणि ते मजबूत सरकार पाच वर्षे चालवायचे आहे . त्यासाठी आम्ही एनडीए नेतृत्व जो निर्णय घेतला जाईल तो आम्हाला मान्य राहील.

आम्ही रडणारे नाही तर आम्ही लढणारे असल्याने एनडीए नेतृत्व जे नाव  मुख्यमंत्री पदासाठी पुढे करतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

उद्या महायुतीच्या नेत्यांची सभा आहे त्यात जो निर्णय होईल त्याप्रमाणे नवीन नेता निवड होऊन सरकार स्थापन केले जाईल.

मुख्यमंत्री भाजपचा होण्याची शक्यता बळावली आहे, आणि मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला असून ते महायुतीत सहभागी असणार आहेत.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.            ✍️Ddbatmi@m2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.