मुख्याधिकारी साहेब,आठवडी बाजार अजूनही रस्त्यावरच?

 मुख्याधिकारी साहेब आठवडी बाजार अजूनही रस्त्यावरच?


मूल, दीपक देशपांडे 

२०१४-२०१९ व २०२२-२०२४ महायुतीच्या शासन काळातील चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासनिधी अंतर्गत करोडो रुपये खर्चून बांधलेल्या मूल येथील महात्मा फुले कृषी बाजार यार्डातील  जागा रिकामी ठेवून आठवडी बाजार , नागपूर मार्गापासून ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश द्वारा पर्यंत, कृषी उत्पन्न बाजार समिती ते समांतर सरळ मार्ग व  बाजार समिती व तेथून  पुढे महात्मा फुले मार्केट यार्ड आणि शासकीय धान्य भंडार व गणपती  मंदिरापर्यंत पूर्णपणे रस्त्यावर भरत असल्यामुळे एकतर नागपूर मार्गावरील वाहतूक विस्कळित होते आणि  दूसरे म्हणजे  सध्या धान मळणी हंगाम सुरू असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत धान घेऊन येणाऱ्या जड वाहनांना अडचणी येऊ शकतात म्हणजेच पर्यायाने बाजारात येणाऱ्या ग्राहकांना नाहक खोळंबणाऱ्या वाहनांमुळे अडचणीचे ठरु शकते.

ही बाब विचारात घेता आठवडी बाजार हा महात्मा फुले मार्केट यार्डातील जागेत कसा भरवता येईल आणि त्या मार्केट यार्डात ठोक व चिल्लर विक्रेते यांना मुलभूत सुविधा कशा प्रकारे पुरवता येतील याबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय घेतला जावा , असे या बाजारात सहभागी होणाऱ्या छोटेमोठे विक्रेते , चिल्लर विक्रेते आणि शेतकरी व ग्राहकांशी वार्तालाप करताना त्यांनी मनमोकळेपणाने स्पष्ट केले.

महात्मा फुले मार्केट यार्ड लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा मार्केट यार्ड म्हणजे त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात सुंदर मार्केट यार्ड बनविण्याचे स्वप्न साकारल्याचे स्पष्ट केले होते,मात्र या मार्केट यार्डाच्या  लोकार्पण सोहळ्यानंतर इतक्या काळानंतरही आज हा आठवडी बाजार रस्त्यावर भरत असल्यामुळे ते स्वप्न स्वप्नच राहणार काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या मार्केट यार्डात सोयीसुविधा उपलब्ध करून देत बाजार पूर्णपणे या यार्डातच कसा भरवता येईल याबाबत नवीन मुख्याधिकारी यांनी  पुढे येऊन या बाजारात येणाऱ्या ग्राहकांना, विक्रेत्यांना आणि शेतकऱ्यांना सोयीस्कर ठरेल असा निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतला तर आम्ही त्यासाठी तयार असल्याचे मत , ग्राहक , छोटेमोठे विक्रेते , आणि शेतकरी यांनी आमच्याशी चर्चा करताना व्यक्त केले .

आता मुख्याधिकारी साहेब निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. सहकार्याचा एक हात पुढे आलाय.... तेव्हा बघाच, काही उणीवा भरून काढत हा बाजार मार्केट यार्डात कसा नेता येईल याबाबत निर्णय घ्या.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2m✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.