मूल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालययेणारच !

मूल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येणारच!



  




दीपक देशपांडे 

नाम.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना तांत्रिक शिक्षण मिळून रोजगार उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे शासकीय तंत्रनिकेतन (Government polytechnic) महाविद्यालय सुरू करण्याबाबत दिनांक  २७/११/२०२४रोजी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा केली . याबाबतच्या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता देण्यात येईल असेही उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. लवकरच मूल शहरात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

निवडणूक काळात आणि त्यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शब्द पूर्ण करण्यासाठी उचललेले हे पाऊल असल्याचे दिसून येत असून परिसरातील जनता याविषयी समाधान व्यक्त करीत आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.