आकाश निरीक्षण:- * *उल्का वर्षाव* *

 आकाश निरीक्षण

मिथुन राशीतील

*** *उल्का वर्षाव* ***

डीडिन्यूजब्यूरो.

  निरभ्र  रात्री आकाशात अचानक चमकणाऱ्या प्रकाशरेषेला आपण तारा तुटला असे म्हणतो‌. प्रत्यक्षात याचा तार्‍याशी काही एक संबंध नसतो तर ती एक प्रकारची उल्का असते.  आकाशातील विविध वस्तूंचे काही कण पृथ्वीच्या भ्रमण मार्गाच्या जवळ येतात, तेव्हा ते गुरुत्वाकर्षणामुळे ओढले जाऊन वातावरणात पेट घेऊन आपल्याला विविध रंगाच्या उल्का तुटताना दिसतात. त्यांचे रंग लाल, पिवळा, निळा व पांढरा असतात .आणि त्या अत्यंत चमकदारपणे आपलं लक्ष वेधून देत असतात येत्या १३ आणि १४ डिसेंबर रोजी मिथुन राशी समुहातून आपल्याला रात्री ११ नंतर पूर्व आकाशात असाच एक उल्का वर्षा चांगल्यापैकी पाहता येईल पहाटे त्याचा वेग वाढलेला असेल.

*अशी असेल आकाश स्थिती*

दि.१ ते १५.डिसें.२४.

दि.२.शूक्र ग्रह मकर राशीत.

दि.४.चंद्र आणि शूक्र युती. ISS अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन दर्शन रात्री ७-१६ वा.वायव्य ते आग्नेय दिशेला.

दि.५.संध्या.६.२८ वायव्य ते आग्नेय दिशेला.

दि.७.मंगळ ग्रह वक्री. ISS दर्शन.. संध्याकाळी ६-२७ पश्चिम आकाशात. शूक्राजवळून जाईल.

दि.८.चंद्र आणि शनी युती.

गुरु, पृथ्वी आणि सूर्य एका रेषेत.उत्तम गुरु दर्शन.

दि.११.बुध ग्रहाचा पूर्वेस उदय.

दि.१२.चंद्र पृथ्वी जवळ. ISS दर्शन पहाटे ६-०९.नैॠत्य आकाशात.

दि.१३.चंद्र आणि चित्रा युती.

दि.१४.चंद्र आणि गुरु ग्रह युती. ISS दर्शन पहाटे. ६-०८ पश्चिम आकाशात.

दि.१३-१४.मिथुन राशीतुन उल्का वर्षाव.रात्री ११ नंतर पहाटे अधिक प्रमाणात.

दि.१५.सूर्य धनु राशीत.

पहाटे..५-२३ वा. ISS दर्शन.पश्चिम आकाशात.

*हेमंत ॠतूतील गुलाबी थंडीत आकाश दर्शनाचा आनंद घ्या*.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.