अज्ञातांनी पूंजणे जाळले , गुन्ह्याची नोंद , पुढं काय?

 अज्ञातांनी पूंजणे जाळले, गुन्ह्याची नोंद,पूढे काय?



दीपक देशपांडे 

मूल पासून १०-११किलोमिटर अंतरावर असलेल्या चांदापूर हेटी येथील शेतकरी जयेंद्र लहानूजी निमकर व महेंन्द्र लहानूजी निमकर, आणि विजय एकनाथ देशमुख, यांनी  शेतातील धानपिकाची  कापणी बांधणी करून ठेवलेल्या पुंजण्याला अज्ञान इसमांनी आग लावल्यामूळे ते पुंजने आगीत जळून खाक झाले.

   यामध्ये  तिन्ही शेतकऱ्यांचे प्रत्येकी पाऊन  एकर  जागेमधील साधारण ३५-४०क्विंटल म्हणजे अंदाजे ८० हजार किमतीचे धान जळून खाक झाले असून मूल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे.

तलाठी,कृषी अधिकारी यांनी घटना स्थळी भेट देवून पंचनामा केलेला आहे.अज्ञान इसमाविरूध्द मूल पोलीसांनी गुन्हा नोंदविलेला असून पूढील चौकशी चालू आहे.

 पीडित शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे.

भरकटलेल्या मानसिकतेतून ज्या अज्ञातांनी हे पूंजणे जाळले,त्यांचा शोध कधी व कसा लागणार ? त्यांच्यावर कारवाई नेमकी कधी काय  व कशी असणार आहे?अशा विकृत मनोवृत्ती असणाऱ्यांनी निश्चित कुठल्या उद्देशाने  असा प्रकार  घडवून आणण्यात  आला आहे आणि यांतून  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नेमका  यांचा लाभ कसा मिळणार आहे,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.        ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.