त्या निर्णयाचे काय?
महाब्रेकिंग:-
त्या निर्णयाचे काय?कोण अडवतयंआणि कशासाठी?
दीपक देशपांडे
निवडणूक काळात महायुती शासनाने शेतकरी हितासाठी धान खरेदी केंद्रावर महामंडळाच्या वतीने नावनोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला, परंतू मूल बाजार समितीचे वतीने ही प्रक्रिया सुरू करण्यात खोडा घालण्यात येत असून अजूनपर्यंत धान खरेदीसाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही.
परिसरातील शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात आणून दिली असता आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांकडे याबाबत विचारणा केली असता महामंडळाच्या वतीने मागील वर्षी खरेदी केलेल्या धानाची उचल बऱ्याच उशिरा केल्यामुळे धानाच्या वजनात घट आली आणि ती तूट महामंडळाने अमान्य करीत तेवढी रक्कम वसूल करण्याची बाजार समितीला नोटीस बजावली आहे ,ही तूट बाजार समिती कशी काय भरुन देणार?असा प्रश्न उपस्थित करीत आम्ही नवीन वर्षात नावनोंदणी करण्यास नकार दिला असल्याचे महामंडळाला कळविले असल्याने यावर्षी अजूनपर्यंत नावनोंदणी सुरू केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यांवर उपाय काय?या प्रश्नाचे उत्तर देताना बाजार समितीचे सचिव अजय गंटावार म्हणतात महामंडळासोबत याबाबत वाटाघाटी करण्यासाठी जिल्हाधिकारी चंद्रपूर सोमवार -मंगळवारी एक बैठक लावणार असून त्यात काय निर्णय होतो यावर नावनोंदणी प्रक्रिया केंव्हा सुरू होईल हे अवलंबून असल्याचे स्पष्ट केले.
आज बुधवार असल्याने कालपर्यंत काहीतरी निर्णय घेतला गेला असावा आणि आम्हाला ठोस काही तरी हाती लागेल म्हणून आम्ही परत एकदा बाजार समितीच्या सचिवांनी संपर्क साधला....असता आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून बैठकीत काय निर्णय होतो यावर नावनोंदणी प्रक्रिया अवलंबून आहे मात्र शेतकरी हितासाठी आम्ही उद्यापासून नावनोंदणी सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी यांनी बोलावलेल्या बैठकीत ठोस असा निर्णय होऊ शकला नसला तरीही आम्ही उद्यापासून नावनोंदणी प्रक्रिया सुरू करणार असल्याचे मूल कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांनी जाहीर केले आहे.
शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असली तरीही यावर्षी शासनाने धान खरेदी केंद्रावर महामंडळाच्या वतीने धान खरेदीची मर्यादा कमी केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे, परिणामी यांचा परिणाम शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि नवीन शेतकऱ्यांना या नावनोंदणी प्रक्रियेत सहभागी होताना अडचणी येऊ शकतील काय?असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर यांतील सत्य बाहेर येईल तोपर्यंत...... समस्त शेतकरी बांधवांना नावनोंदणी साठी शुभेच्छा.
आम्ही यावर लक्ष ठेवून असणारच आहोत.... तुम्ही सहकार्य करावे ही विनंती.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2m✍️


Comments
Post a Comment