कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथे पंतप्रधान किसान सन्मान समारंभात वर्षा लांजेवार सन्मानित .

 कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथे पंतप्रधान किसान सन्मान समारंभात वर्षा लांजेवार सन्मानित.

सिंदेवाही  येथे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपुर, बिहार येथे झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे करण्यात आले.

सदर कार्यक्रमास वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही डॉ. व्ही. जी. नागदेवते, तहसीलदार संदीप पानमंद, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी चंद्रपूर सी. एस. ठाकरे, पी. जी. गव्हारे, उपविभागीय कृषि अधिकारी,   नागभीड पी. जी. गव्हारे, सिंदेवाही तालुका कृषी अधिकारी के. एस. औटी उपस्थित होते. तहसीलदार संदीप पानमंद यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे योगदान खुप मोलाचे आहे, असे मत व्यक्त केले. तसेच जस्तीत जास्त शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टक वर नोंदणी करण्याचे आवाहन केले.

सदर कार्यक्रमात जिल्हयातील शेतकरी व गटांच्या माध्यमातुन उत्पादित केलेले विविध शेती उत्पादने व प्रक्रियायुक्त पदार्थ यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सदर प्रदर्शनाची पाहणी करुन मान्यवरांनी शेतकरी बांधव, शेतकरी व महिला गटांनी चांगल्या प्रकारे पिकविलेल्या व उत्पादीत केलेल्या शेतमालाची माहिती घेतली व शेतकऱ्यांचे कौतुक केले. या दरम्यान प्रगतीशील शेतकरी, माधवराव आदे, हेमंत शेंद्रे, वामन बोरकुटे, दिनेश शेंडे, वर्षा लांजेवार, छाया करकाटे, प्रज्ञा देवघरे आणि दिलीप उईके यांचा कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास विजय सिडाम, डॉ. सोनाली लोखंडे, स्नेहा वेलादी डॉ. वर्षा जगदाळे, सुशांत डबोले, निलकमल बारसागडे, चैतन्य धामणकर, कैलाश कामडी, संतोष पवार तसेच सिंदेवाही तालुक्यातील कृषि सहाय्यक व जिल्हयातील शेतकरी व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सोनाली लोखंडे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वी होणेसाठी कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.