महाब्रेकिंग! वाघाच्या दहशतीत शेतकरी बळीराजा?
महाब्रेकिंग!
वाघाच्या दहशतीत शेतकरी बळीराजा?
मूल,दीपक देशपांडे
मूल उमा नदीच्या काठावर मरे गावचे बाजूला तिन पिलासहीत वाघिणीचे दर्शन झाले असल्याने मरेगाव वासिय शेतकरी बळीराजा चिंताक्रांत झाला असून वनविभागाच्या वतीने काळजी घेण्याची सुचना जारी करण्यात आली असून, परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
या परिसरात दुबार धान व कठाण माल काढणीला आला असल्याने शेतकऱ्यांनी या वाघिणीच्या तातडीने बंदोबस्ताची मागणी केली आहे,कारण यापूर्वी याच परिसरात वाघाच्या हल्ल्यात दोन गुराखी ठार मारण्याची घटना घडून गेली होती.
वनविभाग याबाबत जागरुकतेने कशी कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment