जागृत ग्राहक राजा या ग्राहक संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन २२व २३फेब्रुवारी रोजी पूणे येथे

जागृत ग्राहक राजा या ग्राहक संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन २२व २३फेब्रुवारी रोजी पुणे येथे 



पुणे,डीडीन्यूजब्यूरो..

ग्राहक चळवळीतील महाराष्ट्र राज्यातील एक अग्रगण्य संस्था जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शिर्षस्थ ग्राहक प्रतिनिधींचे राज्यस्तरीय पहिले अधिवेशन २२व २३फेब्रुवारी रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.

हे अधिवेशन आर्यन वर्ल्ड स्कूल भिलारे वाडी ,जूना कात्रज घाट पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे,या अधिवेशनात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे अध्यक्ष, दिलीप फडके,संघटक दिलीप पाटील, सचिव प्रा.नागनाथ स्वामी, महिला अध्यक्ष सौ.प्राजक्ता पाध्ये , उपाध्यक्ष सौ.नयन चव्हाण, आणि  दीपक देशपांडे यांनी विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️

              संपर्क:-९४०३२८५३४४

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.